Skip to main content

विडंबन

" किती अडवू मी अडवू कुणाला ... (विडंबन)

लेखक विदेश यांनी शुक्रवार, 13/09/2013 07:41 या दिवशी प्रकाशित केले.
(चाल- किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला -) "किती अडवू मी अडवू कुणाला, आज सिग्नलहि का बंद झाला द्या हो बाजू चला, रस्ता सोडा मला" - आला ओरडत पोलीस आला ..... पावसाळी खड्ड्यांत, रस्त्याच्या काठी, पोलीस अवतरले नाही हसू गालात, नाचवती चिखलात, सर्वजण कुरकुरले पोलीस दिसतो दुरून, शिट्ट्या झाल्या फुंकून, साऱ्या ट्र्याफिकचा गोंधळ झाला .....
काव्यरस

उसवला शर्ट नवीन पुन्हा –

लेखक विदेश यांनी गुरुवार, 05/09/2013 19:36 या दिवशी प्रकाशित केले.
( चाल – उगवला चंद्र पुनवेचा ) “उसवला शर्ट नवीन पुन्हा, मज देई शिवुनिया-“ उखडला पति तिचा || "काही सुया अशा घुसल्या, सटकुनी अडकुनी तुटल्या, मम बघा रुधिर क्षती बोचल्या-" करुणरस तो गळु पडे, खवळता, पत्निचा || .
काव्यरस

मोरया मोरया (चेन्नई एक्सप्रेस इश्टाईल)

लेखक वेल्लाभट यांनी गुरुवार, 05/09/2013 12:40 या दिवशी प्रकाशित केले.
फिल्लमी गाण्यांवर देवादिकांची भजनं (?) ऐकायला येणं तुम्हा आम्हाला नवीन नाही. कुठल्याही 'फेमस' देवळाच्या परिसरात अशा कलाकृती ऐकायला मिळतात. तर या संगीतप्रकारात माझ्याकडून एक भर पडण्याचा योग असावा; म्हणून मला हे जे गणपतीचं भजन (हा शब्द योग्य न वाटल्यास जो शब्द योग्य वाटेल तो इथे वाचावा) स्फुरलं, ते आपणापुढे मांडत आहे. चूक भूल माफ असावी. चेन्नई एक्सप्रेस च्या लुंगी डान्स या रचनेच्या चालीवर आधारित. कपाळावर; लावुनि गंध बाप्पाचा; घेऊनि छंद सेवा करू प्रेमभावाने म्हणू सारे एकमुखाने तूच अमुची शान... (रे बाप्पा) तूच अमुचा प्राण...(रे बाप्पा) तूच अमुची शान... (हे) तूच अमुचा प्राण...

डासाचे मनोगत

लेखक भ ट क्या खे ड वा ला यांनी मंगळवार, 20/08/2013 22:19 या दिवशी प्रकाशित केले.
उद्यानातील बाकावरती द्वन्शिले मी तुला मम द्व्नशाने व्याकूळ होता ,एकांत तुझा भंगला || अफाट जगती क्षुद्र तू मानव किती जाळसी म्येट नि कासव जीव भुकेला रक्ता वाचून झोपे मधुनी उठता तुजला बागेत गाठला ||१|| मारशील तू मजला कितीही वंश माझा टिकतो तरीही तव अस्त्रांची न मजला भीती तप्त तुझे ते रुधिर प्राशुनी गुण तव घेतला ||२||
काव्यरस

फितुरी ( त्या सावळ्या तनुचे वर आधारीत )

लेखक स्वाती३५११ यांनी रविवार, 18/08/2013 21:39 या दिवशी प्रकाशित केले.
त्या काळ्या मनीचे मज लागले पिसे ग न कळे मनास आता कोठे शोधू त्यास ग येते ऐकण्यास जेंव्हा गोड म्याव-म्याव चोही कडे बघे मी, पकडण्यास घेते धाव ग हलते शेपटी ही लडीवाळ करते चाळा दुध पिउन तट्ट ती, माझ्यावर फिस्करी ग खुपते मनास माझ्या ती मटण खाई शेजारी डोळ्यात दिसते मग तिच्या, मलाच फितुरी ग

अशी वाहने येती - ( विडंबन )

लेखक विदेश यांनी मंगळवार, 13/08/2013 14:26 या दिवशी प्रकाशित केले.
(चाल - अशी पाखरे येती - ) अशी वाहने येती, आणिक ढुशी देऊनी जाती दोन दिशांनी धावत थांबत, दोष दुजाला देती ... खांब तो मला कधि ना दिसला, ताठा कोठे अता राहिला जरा खालुनी, जाय उखडुनी, तारा वरच्या झुकती ... पुढून येता पोलिस दिसले, मी स्कूटरवर मला तोलले नव्हते लायसन्स, घरीच ते तर, कुंठित झाली कुमती ... हात एक तो पुढेच सरला- काठीवर खात्रीने फिरला- देवघेवीतील सवयी अजुनी, कुठून मज त्या कळती ... पुढे तयांच्या खाण्यासाठी, मीच हात ते धरले हाती त्या घडल्या तोडीची आता, दूर पसरली ख्याती ... .
काव्यरस

मोदी आणि मोदी

लेखक श्रीगुरुजी यांनी गुरुवार, 18/07/2013 15:43 या दिवशी प्रकाशित केले.
रॉयटर्सचा वार्ताहर मोदींची मुलाखत घेत आहे. मुलाखतीचे थेट प्रक्षेपण सुरू आहे. वार्ताहरः मोदीजी, तुमचे आवडते फळ कोणते? मोदी: आंबा क्षणार्धात सर्व वाहिन्यांवर ब्रेकींग न्यूज येते. "मोदींना पेरू आवडत नाही" . . . पुढच्या क्षणी प्रतिक्रिया येऊ लागतात. जितेंद्र आव्हाडः महात्मा गांधींना केळ्यासारखे साधे आणि स्वस्त फळ आवडत असे. मोदी हे मुळातच महात्मा गांधींच्या विरोधात आहेत. त्यामुळे त्यांच्या आवडत्या फळात केळ्याचा उल्लेख नाही याचे आश्चर्य वाटत नाही.

मिपास्तोत्र

लेखक जेपी यांनी मंगळवार, 16/07/2013 12:13 या दिवशी प्रकाशित केले.
नम्स्कार , बरेच दिवस आम्चा मनात होते कि सर्वना उपयुक्त असेल असे 'मिपा स्तोत्र' येथे द्यावे . याचा स्तोत्राच फायदा मला झाला. तुम्हि हे स्तोत्र रोज वाचुन स्वतः अनुभव घ्याव.

आनंदाचे डोही आनंद तरंग (तीन)

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी रविवार, 14/07/2013 16:10 या दिवशी प्रकाशित केले.
उनक जे समोर आहे ते बिनशर्त खाणे हा बायकोच्या जाचातुन सुटायचा सर्वोत्तम मार्ग आहे. तीने जे बनवले ते बिनशर्त खाल्ले की मग तक्रारीला जागाच रहात नाही. पण मुकाट खायला तुमचे मन धजवत नाही. आणि "तुम्हाला माझे कौतुकच नाही" असे म्हणत बायको हॉटेल मधुन पार्सल आणु देत नाही. आपले लगाम बायको कडे आहेत हे आपण उघडपणे नाकारतो (किंवा चारचौघात तसे कबुल करायला लाजतो). पण त्या मुळे सत्य लपुन रहात नाही आणि मग चारचौघात बायकोच्या इशार्‍यावर नाचत नाही हे दाखवणार कस?

" बया आज माझी नसे वात द्याया .."

लेखक विदेश यांनी शनिवार, 13/07/2013 09:17 या दिवशी प्रकाशित केले.
. (चाल : प्रिया आज माझी नसे साथ द्याया -) बया आज माझी नसे वात द्याया असो बंद डोळे मिटो पापण्या या.. नको गाणी आता जरा झोपतो मी सुरांची तिच्या आज ती हूल नाही बयेवीण ना त्रास होईल आता.. किती छान म्हटले तरी त्रास होतो जरी कान बंदी तरी बोल येतो शिरा त्या गळ्याच्या फुगाव्या किती त्या.. न भांडी धुवाया,न कामा उशीर कसा आज हातास येईल जोर मुखी यातना रात्र जागेल गाया.. किती आठवू मी अशा भांडणांसी पुरे लाटण्यावीण शब्दांस खाशी कशाला उभी ती मनीं महामाया..! .
काव्यरस