Skip to main content

विडंबन

<नवविवाहिताचे बाबांस पत्र>

लेखक राजेश घासकडवी यांनी मंगळवार, 03/12/2013 06:01 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा (शुद्धलेखनाचा दर्जा मूळ लेखनाबरहुकुम ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे) प्रिय बाबा, प्रत्येक मुलाप्रमाणे मी ही लग्नाबद्द्ल लहानपणापासुन खुप उत्सुक होतो. माझ्या बेबी डॉल, ड्रीम गर्लची स्वप्ने रंगवत होते. पण आज मला जाणिव होते आहे की लग्न म्ह्णजे फक्त अमर्याद सेक्स न्ह्वे. लग्न म्हणजे केवळ तुमच्या लाडक्या व्यक्ति सोबत हवे तेव्हा हवे ते करणे न्हवे.

तु तुझे मन फक्त गच्च ठेव, बाकी घोड्यावर सोड

लेखक संजय क्षीरसागर यांनी गुरुवार, 14/11/2013 12:19 या दिवशी प्रकाशित केले.
( स्वच्छ मन या लँडमार्क लेखाचा स्वैर अनुवाद. ) मी ओंफ्फसमधुन घेरीत जात होतो. पुढे काही आंतरावर मेंदू ज्याम होणार होता. मी माझ्या बायकोचा वेग कमी केला आणि तिला सोफ्यावर थांबवली. तशी त्या ज्याम मधून प्रत्येकजण बाहेर येण्याचा प्रयत्न करु लागला. बॉडीचा आवाज, आतल्या गर्दीचा आवाज येत होता. तिथे जवळच एका म्हशीच्या ॐ चा आवाज येत होता. मी विचार केला, आयला, प्रत्येकाचा आवाज वेगळा असतो. मला प्रत्येक आवाज काय सांगतोय ते जाणून घेण्याची इच्छा झाली.

तू आलीस त्याला सोडून

लेखक दिपक.कुवेत यांनी मंगळवार, 12/11/2013 12:37 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, आज परत फा......र दिवसांनी विडंबनाचा मूड जमून आलाय तो कितपत जमलाय हे तूम्हिच ठरवा. खालील विडंबनाचं मूळ श्री. वडापाव ह्यांच्या ह्या कवितेत आहे. सदर विडंबन श्री. वडापाव ह्यांची माफि मागुन. प्रेमाचा त्रिकोण / एक फुल दो माली हि नेहमीच एखाद्यासाठि वेदनामय घटना. त्यातुन प्रेयसी आपल्या सख्ख्या मित्राची झाली तर अजूनच नैराश्य येतं. पण कालांतराने तीला मित्राच्या प्रेमातील फोलपणा जाणवतो आणि मग ती परत त्याच्याकडे येते........कायमचीच!
काव्यरस

अथ: चिखल कथा/ शतशब्द कथा

लेखक विवेकपटाईत यांनी गुरुवार, 24/10/2013 19:31 या दिवशी प्रकाशित केले.

चिखलात होते कमळ, बुडवुनी चिखलात सर्वांग, तोडले तयाने कमळ, कमळाला लागले चिखल. सायकल वर होउनी स्वार, तक्क्षणी पोहचला घरी. सायकलला लागले चिखल. देवावर वाहिले पुष्प, चिखल पोहचला देव्हाऱ्यात. चिखलात बरबटलेले वस्त्र फेकले अस्तव्यस्त, हात आणि घड्याळाला ही लागले होते चिखल. चिखलाने बरबटलेले घर पाहुनी, आठवण झाली बायकोची. करायास घर साफ घेतली हातात झाड़ू, चिखल लागले झाडूला. भिंतीवर उडले शिंतोडे, हत्तीच्या चित्रफलका वर. चिखलाने शोभिवंत झाले घर, कृपा झाली चिखल लक्ष्मीची. इति.

(खंड्याचे मनोगत)

लेखक तिमा यांनी शनिवार, 19/10/2013 12:32 या दिवशी प्रकाशित केले.
आमचे प्रेरणास्थानः खंड्या जन्मल्यापासून,आकाशात भाईबंधांबरोबर थव्याने स्वच्छंद उडायचे आणि फळे खायची हा माझा दिनक्रम होता. फार छान दिवस चालले होते. एके दिवशी आम्ही सग़ळे एका झाडावर येऊन बसलो. खाली काहीतरी चकाकत होते. आमचा ग़टनेता, 'खाली बघू नका" असे ओरडून सांगत होता. तरी आम्ही एकदोघांनी खाली डोकावून पाहिलेच. खाली एक फासेपारधी आरसा हातात घेऊन सूर्याचे प्रतिबिंब आमच्या डोळ्यावर पाडण्याचा प्रयत्न करत होता. अचानक, माझ्या डोळ्यांवर ती तिरीप पडली आणि जी भोवळ आली! तिरमिरत खाली पडलो. पडताना एका फांदीचा फटका माझ्या डाव्या डोळ्याला लागला, एवढे आठवते आहे. त्यानंतर जो शुद्धीवर आलो तो एका पिंजर्‍यात!

( चला नांगरूया शेत सारे )

लेखक मोदक यांनी मंगळवार, 15/10/2013 15:49 या दिवशी प्रकाशित केले.
आमचे लाडके लोककवी हभप श्री धनाजीराव यांच्या काव्यजीवनातील चरणकमलांचे तंतोतंत अनुकरण करण्याच्या आमच्या छोट्या प्रयत्नांचे हे पुढचे पाऊल. चल परत नव्याने सुरू करू सारे या काव्यातून पेरणीचा मनोदय व्यक्त करणार्‍या धनाजीरावांनी नांगरणीवर काहीच भाष्य केले नसल्याने धनाजीरावांच्या गोधडीला ठिगळ लावण्याचा हा प्रयत्न गोड मानून घ्यावा.. *************************************************** बाई पाटाला आलंय पाणी वाफ्यात कुदळ मारुन घे वरच्या अंगाची दोन मोठी ढेकळं माझ्या मोंगर

(चल परत नव्याने सुरू करू सारे)

लेखक धन्या यांनी सोमवार, 14/10/2013 18:26 या दिवशी प्रकाशित केले.
चल परत नव्याने सुरू करू सारे नांगरले नव्हते कधीच शेत असे पुन्हा नांगरु पाटाला येईलच पाणी वरच्या त्या पाण्या समेच आपलं बियाणं पेरुन टाकू खुप केले आपण नियोजनाने पीक घेणे त्या पल्ल्याड जाऊन फक्त पीकासाठी राबू असेल अजूनही सळसळता जोम आपल्यातही त्या रगेल पणाची थोडी चव चाखून पाहू चल बरोबर मिळून राबू जरासे भूगर्भातील अंकुरापर्यंत पर्यन्त असेच आपण पोहोचू शेतात असणारच उंचसखल थोडेसे खोलगट त्यातूनच आपल्या मेहनतीचा अर्थही नव्याने उमजू
काव्यरस

मित्रास पत्र (सन 2045- एक झलक)

लेखक बबन ताम्बे यांनी शुक्रवार, 04/10/2013 15:02 या दिवशी प्रकाशित केले.
ब. र. ता. दिनांक : 8 जानेवारी 2045 प्रिय मित्रा , आज 8 जानेवारी 2045. बघता बघता ८० वय झाले . जुलै २०१३ साली तारेची अखेर झाली आणि २०२३ साली पोस्ट ऑफिस चे ब्यान्केत रुपांतर झाले . पत्र पाठवणे वगैरे कालबाह्य झाले म्हणून सरकारने पोस्त ऑफिसच बंद करायचा निर्णय घेतला .

नासाचे अभंग

लेखक रमताराम यांनी गुरुवार, 03/10/2013 08:17 या दिवशी प्रकाशित केले.
(काल काही मिपाकरांशी गप्पा मारता मारता 'नासा म्हणे' ची आठवण आली नि अचानक हे असं झालं.) डावीकडे भारत, उजवीकडे लंका सेतू मधोमध नासा म्हणे गणकी श्रेष्ठ भाषा, गीर्वाण ही थोर जळो भूतकाळ नासा म्हणे किरणोत्सारी भेव नाही मुळी वाव गोमयाच्या आड नासा म्हणे जगी या शिक्षण श्रेष्ठ एका स्थानी हिंदुस्थानी आज नासा म्हणे भारती थोरियम पडले हो विपुल आणा ढापून नासा म्हणे ऐशा नासा नरे ररा झाला त्रस्त पोचे वॉशिंग्टनी करे रुजवात कोण हा रमत्या? नि कोणता भारत? जाणतो संस्थान! नासा म्हणे हाकलला ररा परतुनी ये घरा नका काही सांगू नासा म्हणे परि ऐसे देखो संतुष्ट 'हा' फार भली मोडे खोड नासा म्हणे श्रेष्ठ आमच्या देशा
काव्यरस