मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

नासाचे अभंग

रमताराम · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
(काल काही मिपाकरांशी गप्पा मारता मारता 'नासा म्हणे' ची आठवण आली नि अचानक हे असं झालं.) डावीकडे भारत, उजवीकडे लंका सेतू मधोमध नासा म्हणे गणकी श्रेष्ठ भाषा, गीर्वाण ही थोर जळो भूतकाळ नासा म्हणे किरणोत्सारी भेव नाही मुळी वाव गोमयाच्या आड नासा म्हणे जगी या शिक्षण श्रेष्ठ एका स्थानी हिंदुस्थानी आज नासा म्हणे भारती थोरियम पडले हो विपुल आणा ढापून नासा म्हणे ऐशा नासा नरे ररा झाला त्रस्त पोचे वॉशिंग्टनी करे रुजवात कोण हा रमत्या? नि कोणता भारत? जाणतो संस्थान! नासा म्हणे हाकलला ररा परतुनी ये घरा नका काही सांगू नासा म्हणे परि ऐसे देखो संतुष्ट 'हा' फार भली मोडे खोड नासा म्हणे श्रेष्ठ आमच्या देशा कोसे* हा फार सूर्या शनिश्वर नासा म्हणे ररा म्हणे आता गांजलो मी फार नको व्यर्थ चर्चा नासा म्हणे ररा झाला निवांत मिळे थोडी उसंत इतक्यात कानी येई 'नासा म्हणे'

वाचने 3663 वाचनखूण प्रतिक्रिया 13

रमताराम 03/10/2013 - 08:18
* हा मटामराठीचा चलाखीने केलेला वापर आहे हे सुज्ञांच्या ध्यानी आले असेलच.

चौकटराजा 03/10/2013 - 09:13
जगी या शिक्षण श्रेष्ठ एका स्थानी हिंदुस्थानी आज नासा म्हणे " सीए " च्या प्रवेश परीक्षेला त्रिकोणमिती आहे म्हणे या देशात ! स्वस्त हे हमाल मिळती जेथून भारत नेशन नासा म्हणे .........

In reply to by रमताराम

चौकटराजा 03/10/2013 - 09:57
तुमचा वायला म्हंजी कन्चा वो ? आम्च्या सारख्या 'देहाती" ला जरा सांगा ना राव ! त्ये यिथुल्ल्या येकांद्या आयडी ला नासा म्हंत्यात काय मालक ?

In reply to by चौकटराजा

रमताराम 04/10/2013 - 11:16
जरा 'नासा म्हणे' चे वर लिष्टलेले दावे पाहिलेत (खासकरून पहिला) तर आमचा 'नासा म्हणे' कोण याचा तर्क करणे फार जड जाऊ नये. :)

निवांत पोपट 03/10/2013 - 09:18
साष्टांग नमस्कार ! मांडीवर 'सिंथसायझर'रुपी वीणा, आणि हातात 'डिजिटल' चिपळ्या घेतलेले रमताराम साक्षात सामोरे आले..धन्य हो! :)

पैसा 03/10/2013 - 09:53
हे म्हणजे "नाठाळाच्या माथा हाणू काठी" क्याटेगरीतले ठणठणपाळी टोले आहेत. मस्त!
किरणोत्सारी भेव नाही मुळी वाव गोमयाच्या आड नासा म्हणे
हा शोध लै भारी आहे. भारतातली रस्त्यावरची गुरेढोरे रशिया आणि जपानला पाठवून देऊया. पण नासाने रमतारामाला हाकलून लावला हे काय आवडलं नाय बघा. नासाची ही हिंमत?

धन्या 03/10/2013 - 10:08
भारीच! तुम्हाला असाच निवांत वेळ मिळो आणि तुमचे अभंग वाचायला मिळोत. रच्याकने तुम्हाला अभंग कुठल्या डोंगरावर स्फुरतात? ;)

In reply to by धन्या

रमताराम 04/10/2013 - 11:19
रच्याकने तुम्हाला अभंग कुठल्या डोंगरावर स्फुरतात? >> वेताळ टेकडीवर. रच्याकने आमचे बाकीचे अभंग लवकरच प्रकाशित होणार्‍या 'एका दुभंगाचे अभंग' या शीर्षकाच्या गाथेत समाविष्ट केले आहेत त्यात वाचायला मिळतील.