Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by मिसळलेला काव्यप्रेमी on गुरुवार, 03/17/2011 - 12:22
प्रलय निनादतो शंख कुणाचा डमडमतो डमरू संगे महारुद्राने का उघडला तिसरा नेत्र नि:संगे विखार तो डंख शेषाचा कडकडतो दामिनी संगे सागराने का बुडवला भयभीत मित्र अंतरंगे पसरतो पंख तमाचा घणघणतो मृदुंग संगे कालाग्नी का चेतवला भाजूनी आकाशछत्र दुभंगे ढळतो पंथ पृथ्वीचा धडधडतो उल्काप्रपात संगे हलाहल तो पचवलेला कंठही लालीत आज रंगे |- मिसळलेला काव्यप्रेमी -| (१७/०३/२०११)

Submitted by अवलिया on गुरुवार, 03/17/2011 - 12:24

Permalink

मस्त !

मस्त !
  • Log in or register to post comments

Submitted by नगरीनिरंजन on गुरुवार, 03/17/2011 - 12:34

Permalink

वा! मस्त आणि समयोचित!

वा! मस्त आणि समयोचित!
  • Log in or register to post comments

Submitted by प्रकाश१११ on गुरुवार, 03/17/2011 - 13:11

Permalink

मिसळलेला काव्यप्रेमी -मस्त

मिसळलेला काव्यप्रेमी -मस्त जमलीय विखार तो डंख शेषाचा कडकडतो दामिनी संगे सागराने का बुडवला भयभीत मित्र अंतरंगे
  • Log in or register to post comments

Submitted by हरिप्रिया_ on गुरुवार, 03/17/2011 - 13:18

Permalink

छान... आवडली कविता....

छान... आवडली कविता....
  • Log in or register to post comments

Submitted by गणेशा on गुरुवार, 03/17/2011 - 13:18

Permalink

रौद्ररस जबरदस्त ... एकदम

रौद्ररस जबरदस्त ... एकदम शब्दाशब्दात अंगार भरलाय
  • Log in or register to post comments

Submitted by कवितानागेश on गुरुवार, 03/17/2011 - 16:17

Permalink

आवडली.

आवडली.
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on गुरुवार, 03/17/2011 - 23:33

Permalink

वाह!रौद्ररस जबरदस्त!!

वाह!रौद्ररस जबरदस्त!!
  • Log in or register to post comments

Submitted by निनाव on Fri, 03/18/2011 - 03:25

Permalink

उंच कविता आहे. जब्बरदस्तच.

उंच कविता आहे. जब्बरदस्तच. विखार तो डंख शेषाचा कडकडतो दामिनी संगे सागराने का बुडवला भयभीत मित्र अंतरंगे भन्नाट सुचले आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by चित्रा on Fri, 03/18/2011 - 17:25

Permalink

छान कल्पना

कल्पना आवडली. हे कोणते वृत्त आहे?
  • Log in or register to post comments

Submitted by अनिदेश on Tue, 10/08/2013 - 10:13

Permalink

ही वाचायची राहिली होती.....:)

ही वाचायची राहिली होती.....:).....प्रेमा कडून प्रलयाकडे कस वळलास रे बाबा :)
  • Log in or register to post comments

Submitted by सार्थबोध on Tue, 10/08/2013 - 10:18

Permalink

कडक

खूप छान कविता
  • Log in or register to post comments

Submitted by मिसळलेला काव्यप्रेमी on Tue, 02/26/2019 - 16:18

Permalink

आठवण

आज या कवितेची फार आठवण झाली.
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on Tue, 02/26/2019 - 16:53

Permalink

चपखल.

चपखल.
  • Log in or register to post comments

Submitted by ज्ञानोबाचे पैजार on Tue, 02/26/2019 - 17:02

Permalink

कविता आवडली

पण आज इतके काही विशेष झाले नाही. (म्हणजे प्रलय वगेरे म्हणण्या एवढे) झुरळे झाली की बेगॉन मारावेच लागते आणि ते संपले तर पॅरागॉन असतेच ना जवळ? पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 4708 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com