Skip to main content

अथ: चिखल कथा/ शतशब्द कथा

गुरुवार, 24/10/2013 या दिवशी प्रकाशित केले.

चिखलात होते कमळ, बुडवुनी चिखलात सर्वांग, तोडले तयाने कमळ, कमळाला लागले चिखल. सायकल वर होउनी स्वार, तक्क्षणी पोहचला घरी. सायकलला लागले चिखल. देवावर वाहिले पुष्प, चिखल पोहचला देव्हाऱ्यात. चिखलात बरबटलेले वस्त्र फेकले अस्तव्यस्त, हात आणि घड्याळाला ही लागले होते चिखल. चिखलाने बरबटलेले घर पाहुनी, आठवण झाली बायकोची. करायास घर साफ घेतली हातात झाड़ू, चिखल लागले झाडूला. भिंतीवर उडले शिंतोडे, हत्तीच्या चित्रफलका वर. चिखलाने शोभिवंत झाले घर, कृपा झाली चिखल लक्ष्मीची. इति.

लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 2470
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

In reply to by प्यारे१

७३ शब्द आहेत. पण ७३ = १००. सिद्ध करून दाखवतो. १. सिद्धांत :० = ० ० = ०० (कितीही ०००० लागले तरी उत्तर हेच राहील) २. ७ + ३ = १० ३. १० = १०० ( ० = ००) ४. १ = १ सिद्ध झाले ७३ = १००

झालं, समाधान.

धनुष्य बाण आणि इंजिन वाचले वाट्त चिखलापासुन त्यांना का सोडल ?

In reply to by पप्पु अंकल

+१

मिपाकरांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिल्याबद्दल धन्यवाद ! मिपावर सुरुवातीला ह्या कथा खपायच्या. आता तुम्हासी उशीर झाला.. =)

अजून काही गोष्टी चिखलात पडलेल्या लिहायच्या राहिल्या ना भौ! धनुष्यबाण, विळाहातोडा, चष्मा, सिंह, विमान, सायकल, बाण, नांगर वगैरे वस्तूंबद्दल लिहा की!