Skip to main content

विडंबन

प्रतिसादांचा महामेरू । सकल फेक-आयडीस आधारू । अखंड जिल्बिचा निर्धारु । श्रीमंत डूआयडी ।।

लेखक चामुंडराय यांनी रविवार, 03/09/2017 20:52 या दिवशी प्रकाशित केले.
डूआयडीचे आठवावे लेख । डूआयडीचा आठवावा ताप । डूआयडीचा आठवावा प्रतिसाद । मिपामंडळी ।।१।। डूआयडीचे कैसें लिहिणें । डूआयडीचे कैसें पिंकणें । डूआयडीचे काडी टाकणे । कैसें असे ।।२।। मुळायडीचा केला त्याग । म्हणोनि साधिजें ट्यार्पीचा योग । जिल्बी पाडण्याची लगबग । कैसीं केली ।।३।। वापरावे विविध आयपी । तेव्हा मिळे डूआयडी । वापरावे फेक आयडी । पाडण्या जिल्बी ।।४।। सकल डूआयडी आठवावे । फेकायडी डिलीटवत् मानावे । आंजालोकी मिपालोकी उरावे । पिंकरूपें ।।५।। प्रतिसादांचा महामेरू । सकल फेक-आयडीस आधारू । अखंड जिल्बीचा निर्धारु । श्रीमंत डूआयडी ।।६।।

माजलेल्या बाबाची कहाणी

लेखक बाजीप्रभू यांनी बुधवार, 30/08/2017 06:32 या दिवशी प्रकाशित केले.
WA वर एक पोस्ट वाचली कि, संदीप खरे यांना विनंती आहे कि, जेलमधे एकत्र आलेल्या बाबांसाठी "जमलेल्या बाबांची कहाणी" असं एखादं गाणं आहे का? ती वाचून किडे वळवळले आणि जमलेल्या बाबांऐवजी "माजलेल्या बाबांची" असं विडंबन करण्याची इच्छा झाली. कृपया बदल सुचवा म्हणजे WA वर मित्रांवर शायनिंग मारता येईल.

वदनि पेग घेता ....

लेखक चामुंडराय यांनी रविवार, 20/08/2017 03:52 या दिवशी प्रकाशित केले.
सध्याच्या नवप्रथे प्रमाणे ..... © चामुंडराय, मिसळपाव. (कृपया नशापाणी न करता, वारुणीला साथीला न घेता हे काव्य वाचू नये.
काव्यरस

(तो मला खूप आवडतो)

लेखक रुपी यांनी शनिवार, 12/08/2017 03:11 या दिवशी प्रकाशित केले.
तो मला आवडतो जेव्हा लाडिकपणे अंगाशी झोंबतो, तेव्हा तो मला खूप आवडतो. जेव्हा किरकोळ लागलं की बँड-एड लावायला सांगतो, तेव्हा तो मला खूप आवडतो. मी योगासने करताना पोटावर येऊन बसतो, तेव्हा तो मला खूप आवडतो. मी जरासं आवरून बाहेर जाताना "आई...

((तो मला आवडत नाही))

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी शुक्रवार, 11/08/2017 23:34 या दिवशी प्रकाशित केले.
पेर्णा- निओ यांची कविता "ती मला आवडते" जेव्हा तो त्याच्या पार्टीनंतर तर्राट होऊन माझ्या अंगाशी कसाही झोंबतो तेव्हा तो मला आवडत नाही जेव्हा किरकोळ वादातून तो मला हिंसकपणे Get out you bitch म्हणतो तेव्हा तो मला आवडत नाही माझ्या खरं बोलण्यावर, समजावल्यावर मलाच लाथाबुक्क्याचा प्रसाद मिळतो तेव्हा तो मला आवडत नाही मी एकटीच आवरून बाहेर जाताना तो एकटक संशयानं बघतो तेव्हा तो मला आवडत नाही जेव्हा माझ्या कुठल्याही कामाचा विचका होतो त्याला कशी जिरली हिची असाच आसुरी आनंद होतो तेव्हा तो मला आवडत नाही माझ्या मनस्थितीचं आणि विचाराचं त्याला काहीच सो

भाग मिल्खा भाग!!

लेखक बाजीप्रभू यांनी सोमवार, 07/08/2017 08:19 या दिवशी प्रकाशित केले.
टेक-१, वर्ष १९६०. रोम ऑलिम्पिक्सचे दृश्य. पिळदार शरीरयष्टीचा मिल्खा सिंग "द फ्लाईंग सिख" एखादया बाणासारखा सुटतो. पण फिनिशिंग लाईनजवळ आल्यावर, रेस ट्रॅकवर त्याला फाळणीच्या वेळी दिसणारी पळापळ दिसते. 'भाग मिल्खा भाग' च्या आरोळ्या मिल्खाला विचलित करतात. जुने काही तरी आठवते आणि शर्यतीतील लक्ष उडते. मिल्खा जिंकता जिंकता मागे पडतो, हरतो. देशभरात नैराश्य, संतापाची लाट येते. मिल्खा नुसता हरत नाही तर मनाने देखील खचतो. संपूर्ण देशामधे मिल्खाच्या हरण्याची चर्चा होते. "मिल्खा लॉस्ट" अशी "भाग मिल्खा भाग" चित्रपटाची रोमांचक सुरुवात सगळ्यांना आठवत असेल.

जेथे जातो तेथे....

लेखक चामुंडराय यांनी शुक्रवार, 04/08/2017 07:37 या दिवशी प्रकाशित केले.
जेथे जातो तेथे तो माझा सांगाती चालतो तयाला हाती धरुनिया गेलो कोठेही तरी देतो आधार दाखवितो मार्ग सदैव मजला सगळे ते नम्बरं ठेवी ध्यानी नीट कनेक्टेड रात्रंदिन केलो देवा तयासी मी सदा खेळतो कौतूके नेट वरी सुखे संचार अंतर्बाही बॅटरी होता डाऊन जीव कासावीस धाव घेतो सत्वर चार्जर कडे इंग्रजी, मराठी टाईपतो वेगे त्यानेची अंगठे बहाद्दर केलो देवा जगात नेटवर्क्स विविध अनेक ड्युएल सिमकार्ड वापरी प्रसंगी बॅलन्स तो संपतो असा भरभर रि-फिलचे बळ अंगी देई देवा रात्री साथ देई माझिया उशाशी प्रभाते आन्हिकाआधी दर्शन तयाचे फोन अलार्म संगीत प्रसंगी वाटाड्या नानाविध रिंग-टोन भुलवी मजला फोटो, चलतचित्रे ठेवीतो
काव्यरस

नम्मू तुला भारतावर भरोसा नाय काय?

लेखक शब्दबम्बाळ यांनी मंगळवार, 25/07/2017 13:35 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा : इथे आणि इकडे तिकडे... नम्मू तुला भारतावर भरोसा नाय काय? नम्मूचे विमान किती भारी... भारी फिरतंय तेही दुनिया सारी... सारी दुनियेचा आकार कसा गोल गोल नम्मू तू भारताशी गोड बोल! नम्मू तुला भारतावर भरोसा नाय काय? नम्मूनी बंद केल्या नोटा... नोटा आरबीआयच्या हाती आला गोटा... गोटा गोट्याचा आकार कसा गोल गोल नम्मू तू भारताशी गोड बोल! नम्मू तुला भारतावर भरोसा नाय काय? नम्मूला आवडे पुरण पोळी... पोळी पण भलत्याच महाग झाल्या डाळी...

आला पावसाळा आला पावसाळा

लेखक पाषाणभेद यांनी शुक्रवार, 14/07/2017 00:47 या दिवशी प्रकाशित केले.
(आदरणीय कवी कुसूमाग्रजांची क्षमा मागून) || आला पावसाळा आला पावसाळा || आला पावसाळा आला पावसाळा प्रवाशांनो तुमची कंबर सांभाळा मनपाचे रस्ते खड्डेरी दुचाकी तयामध्ये घातली चुकवित चालली पाणी गाळा समोरून पहा कोण येतसे त्याचीही अवस्था तशीच असे उडविल पाणी; त्याला तुम्ही टाळा चारचाकीवालाही सुरक्षित नसे खड्डयात आदळता शिव्या देत असे न जाणो मोठी खोक ये कपाळा जनांच्या स्मृती गौरवे वंदुनी पुढिल ऋतूची वाट पाहूनी आरोग्यासी वित्त आपले जाळा - पाषाणभेद

ही कविता फॉरवर्ड करा

लेखक vcdatrange यांनी बुधवार, 12/07/2017 18:53 या दिवशी प्रकाशित केले.
ही कविता फॉरवर्ड करा ही कविता फॉरवर्ड करा, नाही तर पाप येईल रात्री झोपल्यानंतर, तुमच्या घरात साप येईल पाच जणांना फॉरवर्ड करा, हरवलेली वस्तु सापडेल नाही केली तर, भुत तुमच्या कानाखाली झापडेल दहा जणांना फॉरवर्ड करा, सोन्याचा हार मिळेल नाही केली तर, पाठीवर मार बेसूमार मिळेल पंचवीस जणांना फॉरवर्ड करा, स्टॉक मार्केट चढेल, नाही केली तर कावळ्याचं शिट डोक्यावर पडेल पन्नास जणांना फॉरवर्ड करा, नोकरीत प्रमोशन होईल नाही केली तर, सकाळ संध्याकाळ लूज मोशन होईल शंभर जणांना फॉरवर्ड करा, लॉटरी मिळून जाईल नाही केली तर, बायको तिच्या मित्राबरोबर पळून जाईल