Skip to main content

विडंबन

(ग़ज़ल - म्हटलेच होते)

लेखक चतुरंग यांनी मंगळवार, 21/03/2017 23:33 या दिवशी प्रकाशित केले.
२१ मार्च हा जागतिक कविता दिन आहे(च), म्हणून एखादी ताजी कविता आपणही शोधू म्हटलं. सादर आहे.... (म्हटलेच होते...) सुबक दिसता, दे हृदय म्हटलेच होते नाइलाजाला सवय म्हटलेच होते खीर देती ते पुन्हा घेता पुरी मी मीहि चरण्याला विजय म्हटलेच होते एक मिटता नयन अन खुलताही दुसरा उमटते गाली वलय म्हटलेच होते वाटली होतीच भीती या क्षणाची त्या कडीने ना अभय, म्हटलेच होते!! 'परतुनी' जा(ये)ती कशा समजे न रंग्या सासवांना मी प्रलय म्हटलेच होते! -चतुरंग २१-३-१७
काव्यरस

इथेच जमवा कंपू, इथेच टाका तंबू !

लेखक लीना कनाटा यांनी शनिवार, 25/02/2017 20:49 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेर्ना - पिरा तैं चा धागा मूळ कविता - गदिमा चला जाउ द्या पुढे हि चर्चा अजुनी नाही धागा संपला इथेच जमवा कंपू इथेच टाका तंबू ! आणखी थोडा व्हिजा वाढवू काही वर्षं अजून थांबू इथेच जमवा कंपू इथेच टाका तंबू ! नाही गर्दी नाही प्रदूषण जीवन इथले असे विलक्षण उतरा ओझी, विसरा नाती डॉलर पळभर चुंबू इथेच टाका तंबू ! घट्ट धरूया आपली संस्कृती सण वार अन रितिभाती ढोल ताशे जोरात वाजवू हिरव्या नोटा छापू इथेच टाका तंबू ! नॉस्टलजीक कधी होऊ आंजा वरती धागे काढू हिअर ऑर टू गो असे संभ्रमु भारत प्रेमाची नशा झिंगु इथेच जमवा कंपू इथेच टाका तंबू !
काव्यरस

परग्रह जरूर जैयो ...! (बट व्हाय ?)

लेखक लीना कनाटा यांनी सोमवार, 20/02/2017 06:01 या दिवशी प्रकाशित केले.
बर्यााच दिवसांपासून मनात एक प्रश्न आहे. अनेक लोक त्याला झैरात किंवा हुच्चभ्रु किंवा तांबड्या लोकांचे तांबडे प्रश्न (अॅज इन मंगळवाल्यांचे प्रश्न!) म्हणुन उडवुन लावतीलही. पण हा आयुष्यातला महत्वाचा प्रश्न होऊन बसलाय आणि मला एक ठाम उत्तर मिळत नाहीये. माझं स्वतःचं मंगळा वर जावं असं काही स्वप्नं नव्हतं. मी मूळात फार मोठी स्वप्नं बघणारी, मंगळाकांक्षी व्यक्ति नाही. माझा नवराही काम उत्तम आणि मनापासुन करणारा माणुस आहे, पण मंगळ ओरियंटेड वगैरे नाही. एनटी (न्यूरो टेक्नॉलॉजि) मधले बहुतांश लोक वारी करुन येतातच तसे आम्ही मंगळा वर पोहचलो. पासप्लॅनेट वर शिक्का बसला ह्याहुन जास्त आम्हाला फार काही वाटले नाही.

आम्ही कोण?-निवडणूक उमेदवाराचे मनोगत (कविश्रेष्ठ केशवसुता॓ची क्षमा मागून)

लेखक अनन्त्_यात्री यांनी रविवार, 19/02/2017 20:18 या दिवशी प्रकाशित केले.
आम्ही कोण म्हणोनि काय पुसता? आम्ही असू लाडके- "श्रेष्ठींनी" दिधले असे कुरण हे आम्हास पोसावया पैशाने तुमच्याच आम्ही मिरवू चोहीकडे लीलया दुष्काळातही अर्थप्राप्ती आमुची पार्टी कराया शके // सारेही विधी, कायदे, नियम हे आम्हा तृणासारखे हस्तक्षेपच आमुचा शकतसे राष्ट्राप्रती द्यावया अस्थैर्यातिशया अशी वसंतसे जादू करा॑माजि या पोटार्थी प्रति-सूर्य पाळु पदरी - सत्तेपुढे जे फिके // सत्तेमाजि वसाहती वसविल्या गु॓डा॑च्या कोणी बरे?
काव्यरस

होतकरू नगरसेवकानची भरली होती सभा,

लेखक मूखदूर्बळ यांनी गुरुवार, 16/02/2017 13:04 या दिवशी प्रकाशित केले.
होतकरू नगरसेवकानची भरली होती सभा, व्होटर होता सभापती मधोमध उभा. व्होटर म्हणाला, व्होटर म्हणाला, "मित्रांनो, देवाघरची लूट..
काव्यरस

म्हादूचं घर

लेखक जव्हेरगंज यांनी सोमवार, 06/02/2017 23:13 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा नक्की कौलारु का छप्पर हे सांगता यायचा नाही. पण सुर्य मात्र पिल्यासारखा तिरपा उगवायचा. अडगळीला एक ठोंबा होता. त्याच्यावर ब्याटरी मारायचा. मग म्हादू उठायचा. अडगळीचा ठोंबा उचलून आईला द्यायचा. मग त्याची आई "लवकर उठलास की रे ठोंब्या" असं म्हणायची. घराच्या शेजारीच एक मोठा गोठा होता. तिथल्या म्हशीसारखी म्हैस कोणी बघितली नसावी. ती ओट्यावर येऊन पो टाकायची. त्या पो सारखा पो कोणी बघितला नसावा. पडवीत एक मोठा गणपती होता. येता जाता म्हादू त्याच्या बेंबीत हात घालायचा. गणपतीला ठेवलेला निवद सगळ्यात आधी तोच खायचा.

(वंचनांचे खर्चही पडताळणे आता नव्याने)

लेखक चतुरंग यांनी शुक्रवार, 03/02/2017 08:13 या दिवशी प्रकाशित केले.
विशाल भौंची नेहेमीप्रमाणेच सुरेख गजल वाचली 'वंचनांचे खर्चही पडताळणे आता नव्याने' आणि आमच्या काही वंचनांचा बांध फुटला!
काव्यरस

(मी सध्या काय करते?)

लेखक रुपी यांनी शुक्रवार, 27/01/2017 06:39 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा अर्थातच. आमचा एक क्षीण प्रयत्न! म्हटलं तर विडंबन, म्हटलं तर दुसरी बाजू... मी सध्या काय करते? नुकत्याच आलेल्या "ती सध्या काय करते?" या चित्रपटामुळे अश्या अनेक "तीं"वरचे जोक आंतरजालावर धुमाकूळ घालत आहेत. 'तेव्हाच अमके केले असते तर आज हा प्रश्न पडलाच नसता' अशा आशयाचे कित्येक फॉरवर्ड्स कित्येकांना 'ती'च्या आठवणी व्याकूळ करुन सोडत असतील! एवढ्या सगळ्या आठवणींत माझी आठवण आमच्या गल्लीतही कुणालाच येणार नाही, हे मी आधीच कळून चुकले. कारण खरं तर आमचं घर कुठल्या गल्लीत नव्हतंच.

(कुणाच्या फांदीवर कुणाची आर्ची)

लेखक स्वामी संकेतानंद यांनी मंगळवार, 17/01/2017 20:38 या दिवशी प्रकाशित केले.
अत्यंत अर्थहीन, स्वैर आणि अजागळ विडंबन सादर आहे! कुणाच्या फांदीवर कुणाची आर्ची? कशासाठी चढवावे टेकू देऊन? झाड होते कुणासाठी मूळ रोवून? जमतात येथे कुणी मुव्हीज बघून! तरी कशी आणतात घरातुनी खुर्ची? लोक सारे येती येथे बुलेटवरून वृक्ष जाती वजनाने वाकून झुकून फांदीवर घेती सेल्फी झोकून झोकून म्हणती हे वेडे पीर, 'चढू फांदी वरची!' अंत झाला फोटोसाठी, जन्म एक सेल्फी पारध्याची वाणी म्हणजे बेचवच कुल्फी फांदी तीच परी तिची पडे गड्या ढलपी परश्यापरी आयुष्य हे फांदीमुळे खर्ची - स्वामी
काव्यरस