वदनि पेग घेता ....
लेखनविषय:
काव्यरस
सध्याच्या नवप्रथे प्रमाणे .....
© चामुंडराय, मिसळपाव.
(कृपया नशापाणी न करता, वारुणीला साथीला न घेता हे काव्य वाचू नये.
अतिबाल्य आणि अतिसंवेदनशील तसेच हे कंबख्त मैं पीता नही अश्या व्यक्तींनी हे काव्य वाचू नये.
विसू: Drink responsibly, Drive sober)
.
.
वदनि पेग घेता
चव घ्या चखण्याची ।
सहज किक बसते
मिळता पिण्या फुकाची ।
सातत्ये करि मैफिल
दारू हि झिंगब्रह्म ।
सुरापान नोहे
जाणिजे नशाकर्म ॥१॥
पेगवर पेग घेता
नाम घ्या साकियाचे |
पिताना स्मरण ठेवा
आम्हा बांधवांचे |
रम जीन व्हिस्की
सोनेरी पेय्य चषकात |
त्रास चिंता काळजी
विसरा या नशेत ॥२॥
वारुणी हि वैरिणी
असे जे सांगतात |
बियर वाईन टकिला
वर्ज्य मानतात |
स्मरण करुनी त्यांचे
दारू प्या खुशाल |
सुरापान करील
चित्तवृत्ती विशाल ॥३॥
वाचने
3615
वाचनखूण
प्रतिक्रिया
11
!!!
In reply to !!! by एस
मूळकवी आणि तुम्ही....धन्य =))
In reply to मूळकवी आणि तुम्ही....धन्य =)) by टवाळ कार्टा
बसुया
In reply to !!! by एस
आवडली हो ....
In reply to !!! by एस
जय जय वृद्ध संन्यासी समर्थ!
मस्त रचना !
चीयर्स!!
छान.
वा वा वा! लई म्हणजे लईच फालतू
In reply to वा वा वा! लई म्हणजे लईच फालतू by अमरेंद्र बाहुबली
अबासाहेब
जय जय पिऊबिअर स्मिर्नोफ्