Skip to main content

आला पावसाळा आला पावसाळा

लेखक पाषाणभेद यांनी शुक्रवार, 14/07/2017 या दिवशी प्रकाशित केले.
(आदरणीय कवी कुसूमाग्रजांची क्षमा मागून) || आला पावसाळा आला पावसाळा || आला पावसाळा आला पावसाळा प्रवाशांनो तुमची कंबर सांभाळा मनपाचे रस्ते खड्डेरी दुचाकी तयामध्ये घातली चुकवित चालली पाणी गाळा समोरून पहा कोण येतसे त्याचीही अवस्था तशीच असे उडविल पाणी; त्याला तुम्ही टाळा चारचाकीवालाही सुरक्षित नसे खड्डयात आदळता शिव्या देत असे न जाणो मोठी खोक ये कपाळा जनांच्या स्मृती गौरवे वंदुनी पुढिल ऋतूची वाट पाहूनी आरोग्यासी वित्त आपले जाळा - पाषाणभेद

वाचने 975
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया