Skip to main content

विडंबन

कवी नडू पाही...

लेखक चतुरंग यांनी मंगळवार, 13/01/2009 21:28 या दिवशी प्रकाशित केले.
'हंस उडू पाही...' हे काव्य वाचून आमच्या कल्पनेचा हंस विडंबनप्रांती उडू लागला! ;) 'रंग्या'चा पहारा विडंबनी कायदे कवी नडू पाही अवघड इरादे! असे कसे शब्द? अर्थ कुणीकडे? कल्पनेपल्याड झेपावती वेडे ओळी सैरभैर, बाभळीचे काटे धिटाईने लिही कुणी एकटे एकटे लावले कुलुप, बंद केली दारे असल्या कविता कशाला करा रे! चतुरंग
Taxonomy upgrade extras

बर्फ जादाचा जणू...

लेखक केसुरंगा यांनी मंगळवार, 13/01/2009 01:30 या दिवशी प्रकाशित केले.
मिल्याचे 'स्वप्न एखादे जणू...' वाचताना आम्हाला सत्याची जाणीव झाली! ;) चार चौघांसारखे माझे पिणे हे चालले चार चौघांसारखे मी चार प्याले ढोसले स्तब्ध आहे केवढे पाणी तुझ्या ग्लासातले बर्फ जादाचा जणू घालून आहे गोठले टेबलाला धडकुनी पडलो कितींदा मी जरी भंगले नाही तरी प्याले कधी हातातले घेतली काढून त्यांनी बाटली हातातली वाटले मी टुन्न झालो; ग्लास सारे तोडले दोष हा माझा कसा? जर पाजले त्यांनी मला मीच हवर्‍यासारखे प्याले 'विरोधी' ढोसले? मी किती ठोठावले पण दार ती उघडेच ना का असे अमुचे कलत्र आज ही रागावले? हाय!
Taxonomy upgrade extras

( निवडणुकीचा एक दिवस )

लेखक अमोल केळकर यांनी सोमवार, 12/01/2009 13:28 या दिवशी प्रकाशित केले.
ज्ञानदा कुलकर्णीं यांची एक दिवस ही सुंदर कविता नव्या रुपात निवडणुकीचा एक दिवस ... लढु द्या मला मतांसाठी... तो दिवस राखून ठेवलाय मी माझ्या प्रभागातले बुथ लुटण्यासाठी तो दिवस राखून ठेवलाय मी माझ्या विरोधकांवर कुरघोडीकरण्यासाठी मी नसेन आता एकटा काही पाचेक वर्षांसाठी दुसरे कोणीही असले सोबत 'ते' मंत्रीपद उपभोगान्यासाठी इच्छा नाही मला त्या नंतर समाजसेवा करण्याची इतरांसाठी इच्छा नाही मला share करण्याची ते टेंडर कोणाही सोबत जे मी lock केले असतील बिल्डरांसाठी पण आता थोडीच वाट पहायची मला त्या दिवसाची आता प्रत्य

गोल्डफ्लेक्स

लेखक घाटावरचे भट यांनी बुधवार, 24/12/2008 01:14 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा: सुवर्णमयी यांची कॉर्नफ्लेक्स ही कविता. गोल्डफ्लेक्स पाकिटातून नुकत्याच बाहेर आलेल्या गोल्ड्फ्लेक्स कधीही असतात ताज्या निकोटिनने भरलेल्या उत्साहाच्या चार झुरक्यांनंतर स्वतःच्याच राखेत बुडून शेवटी केवळ फिल्टर उरलेले असतात.... थंडगार फुक्यांच्या चेहेर्‍यावर हसू उमलतं त्यांना पाहून. मिंटने धुराचा वास झटकून पाकिटात बंद होतात उरलेल्या गोल्डफ्लेक्स पुन्हा पुढच्या सुट्ट्यासाठी... - घाटावरचे भट
Taxonomy upgrade extras

(संपेल ना कधीही , हा खेळ दहशतीचा!! )

लेखक अमोल केळकर यांनी शनिवार, 20/12/2008 17:07 या दिवशी प्रकाशित केले.
चाल : रात्रीस खेळ चाले, या गूढ चांदण्यांचा ----------------------------------------- रात्रीत गेम झाला, वस्तीतल्या गुंडाचा! संपेल ना कधीही , हा खेळ दहशतीचा!! हा गुंड ना स्वयंभू, जामिन राहतो हा दंग्यात माणसांच्या, जाळपोळ करतो हा पोलीस होई साथी, हा दूत शासनाचा संपेल ना कधीही , हा खेळ दहशतीचा!! खंडणी मागती हा, बॉलीवुडला शाप जे 'भाई' सांगती ते करती आपोआप हसतात नशिबाला हा दोष जाणीवांचा!

सासरेबुवा

लेखक अंकुश चव्हाण यांनी शनिवार, 20/12/2008 11:18 या दिवशी प्रकाशित केले.
सासरेबुवा सासरेबुवा सासरेबुवा काय तुमची कथा, अहो काय तुमची कथा? तुमची होते गंमत मात्र आमची होते व्यथा. अहो काय तुमची कथा. सासरेबुवा सासरेबुवा काय तुमची शिस्त, अहो काय तुमची शिस्त? एकावेळी नाश्त्याला दोन कोंबड्या फस्त. अहो काय तुमची शिस्त? सासरेबुवा सासरेबुवा काय तुमची करणी, अहो काय तुमची करणी? तुमच्या आकारापुडे फिकी पडते बरणी. अहो काय तुमची करणी? सासरेबुवा सासरेबुवा काय तुमची पोट, अहो काय तुमची पोट? एकावेळी लागतात तुम्हाला चार जणांचे कोट. अहो काय तुमचे पोट? सासरेबुवा सासरेबुवा काय तुमच्या मिशा, अहो काय तुमच्या मिशा? आता कळले सासुबाई घाबरतात कशा. अहो काय तुमच्या मिशा? सासरेबुवा सासरेबुव
Taxonomy upgrade extras

(विचारणा)

लेखक चेतन यांनी शुक्रवार, 19/12/2008 11:51 या दिवशी प्रकाशित केले.
स्वाती ताइंची संवेदना!! वाचुन नको त्या संवेदना!! जाग्रुत झाल्या. आणी पडले विडंबन लाल भडक तर्रीवाली तिखट मिसळ... खाल्ली आहेस कधी? ती ज्वालामुखी नंतरच्या लाव्हारसा सारखीच दिसते.. लाल! तिखट रस्स्याचा रसरसता रंग दाखवणारी.. जिभेचे चोचले पुरवणारी.. तिच टोचते.. जखमेच्या ठणक्यापेक्षा जास्त! त्या भळभळत्या वेदने पुढे.. हे सात्विक बुळबुळीतपणच वाईट..! सोसत नसुनही खाल्ल्यावर वारंवार लागते ना घाई.. ही तर फक्त संपलेली... आतडी.. ! गळून जाणारी. गळेलच..!!! मग पुन्हा होइल..
Taxonomy upgrade extras

चारवांतर

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी गुरुवार, 18/12/2008 11:28 या दिवशी प्रकाशित केले.
चारवांतर = चार ओळी अवांतर मी टोमणा मारला नाही मी अपमान हि केला नाही मी स्वप्नात सुद्धा माझ्या कधी अवांतरपणा केला नाही ! महाकवी टारवांतर आमची प्रेरणा :- मी मोर्चा नेला नाही मी संप हि केला नाही .... कवी (?) संदीप खरे
Taxonomy upgrade extras