खाज!
Taxonomy upgrade extras
'माज!' वाचल्यावर 'खाज' सुटली नाही तर रंग्या कसला? तेव्हा सादर आहे ..
कालचा 'गजकर्ण' थोडा आज आहे ,
आणि त्याची फार मोठी 'खाज' आहे ॥
कोणत्या वैद्याकडे मी जात नाही,
आपल्या वैदूगिरीचा माज आहे ॥
आणि त्याची फार मोठी 'खाज' आहे ॥
कालच्या 'पेल्यातले' तात्पर्य थोडे,
अन उद्याचा 'बेवडा' अंदाज आहे॥
आणि त्याची फार मोठी 'खाज' आहे ॥
घोरण्याचा ध्यासही आहे कधीचा,
अंगणातच घोंगडी अन 'बाज' आहे॥
आणि त्याची फार मोठी 'खाज' आहे ॥
तोंड मी कोठे कधी लपवू पाहातो
ना जनाची वा मनाची 'लाज' आहे ॥
आणि त्याची फार मोठी 'खाज' आहे
चतुरंग
वाचने
2431
वाचनखूण
प्रतिक्रिया
6
हा हा..
हेच म्हणते..
In reply to हेच म्हणते.. by प्राजु
नुसती
रंगोबा, चाल
प्रतिसाद देणार्या आणि न देणार्या सर्व रसिकांचे आभार!
जबरदस्त