Skip to main content

विडंबन

(होता खमंग, होता चकणाहि खास बाकी)

लेखक चतुरंग यांनी मंगळवार, 04/11/2008 22:26 या दिवशी प्रकाशित केले.
मिलिंद फणसेंची अप्रतिम कारागिरी 'होता वसंत, होता सुमनात वास बाकी' वाचून आम्ही भारावून गेलो आणि त्या खुषीतूनच हे पहिल्या धारेचे विडंबन जन्मले! ;) होता खमंग, होता चकणाहि खास बाकी सारेच टुन्न होती पण आसपास बाकी जाईन घरकुला मी, अद्याप आस बाकी उरलेत मात्र आता थोडेच ग्लास बाकी मी प्यायलो किती ते? उमजे मला न काही हातात फक्त काजू करणे खलास बाकी! फुटलेत पेग सारे अन्‌ फोडलेत काही उरला तिथेच माझा 'रीगल शिवास' बाकी धुंडाळ नीट डावा पुढला खिसाच माझा अजूनी असेल तेथे 'चपटीच' खास बाकी ओठांवरी तिच्याही घनघोर युद्ध भाषा सांगू तिला कसे मी?

( कणा )

लेखक अमोल केळकर यांनी सोमवार, 03/11/2008 11:53 या दिवशी प्रकाशित केले.
( कणा ) कवी - कुसुमाग्रज ------------------------------------------ ओळखलस का देवा मला?'- स्वर्गात आला कोणी शरीर होते सोडलेले, आत्म्याचीच वाणी क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून : पृथ्वीवरुन आत्ताच आलो.

बघ तुला आठवण येते का ?

लेखक मूखदूर्बळ यांनी सोमवार, 03/11/2008 09:00 या दिवशी प्रकाशित केले.
(सौमित्र ह्यांच्या 'बघ तुला माझी आठवण येते का' ह्या कवितेच स्वैर विडंबन करण्याचा एक प्रयत्न) कर्जवसूली साठी येणारे गूंड खिडकीत उभ राहून पहा बघ तुला घेतलेल्या ग्रुहकर्जाची आठवण येते का? खिडकी बंद करून घे. दिवे पंखे मालव. सर्व नळ बंद करून टाक. बघ तुला घेतलेल्या ग्रुहकर्जाची आठवण येते का? थडथडणार काळीज जागेवर आणायचा प्रयत्न कर. डोळे मीटून घे. देवाचा धावा कर. राम रक्षा म्हण. नाहीच आठवली तर भीमरूपी महारुद्रा म्हण. बघ तुला घेतलेल्या ग्रुहकर्जाची आठवण येते का? मग हळूच मागच्या दाराने बाहेर पड. चालत रहा भिती कमी होईपर्यंत. ती कमी होणार नाहीच. मग घरी ये. साडी बदलू नकोस.
Taxonomy upgrade extras

(तसा कुठे मी....)

लेखक चतुरंग यांनी सोमवार, 03/11/2008 01:07 या दिवशी प्रकाशित केले.
गझलेच्या विशेषांकातली अनंत ढवळे ह्यांची 'तसा कुठे मी..' ही गजल वाचली आणि माझे जिवापाड चालवूनही फसलेले अनेक प्रयत्न डोळ्यांसमोर येऊन गेले!

तेंव्हाही - २

लेखक आजानुकर्ण यांनी रविवार, 02/11/2008 22:07 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या आवडत्या संकेतस्थळाचा दिवाळी अंक प्रकाशित झाला आणि त्यातली ही कविता वाचून आम्हाला आमचे गेलेले तें दिन याद आले. आणि आम्ही सुटकेचा निश्वास सोडला... हाय :) दिवाळी अंकाला, गझलकारांना आणि विडंबनकारांना शुभेच्छा झाले होते जरि माझे मुंडण तेंव्हाही उगाच नव्हते केले मी भांडण तेंव्हाही! मला ठोकण्यासाठी जरि तू फिरून थकलिस मिटले नव्हते डोळे... तू कारण तेंव्हाही... कशास वाटे काळ थांबला कालच्यापरी असह्य झाले होते... सारे.. क्षण तेंव्हाही... तुझे नि माझे हिशेब होते चुकते झाले (तुझेच भरले पाकिट...

विडंबन - सांग सांग भोलानाथ

लेखक श्रीमंत दामोदर पंत यांनी शनिवार, 01/11/2008 15:19 या दिवशी प्रकाशित केले.
सांग सांग भोलानाथ... मार्केट चढेल काय? स्टॉक्सच्या दरात वाढ होऊन पैसा मिळेल काय? सांग सांग भोलानाथ... भोलानाथ Reliance रिझल्ट सांगेल काय? Investors ना बख्खळ divident देईल काय? भोलानाथ... भोलानाथ... भोलानाथ Reliance मार्केट चढेल काय? Investors ना बख्खळ Divident देईल काय? भोलानाथ... भोलानाथ... सांग सांग भोलानाथ... मार्केट चढेल काय? स्टॉक्सच्या दरात वाढ होऊन पैसा मिळेल काय? सांग सांग भोलानाथ... भोलानाथ उदया आहे महत्त्वाचे Chapter... ONGC म्हणेल का रे "उत्तम होते Quarter"? भोलानाथ... भोलानाथ... भोलानाथ उदया आहे महत्त्वाचे Chapter... ONGC म्हणेल का रे "उत्तम होते Quarter"? भोलानाथ...
Taxonomy upgrade extras

भोंडल्याची (डोंबलाची ) गाणी

लेखक मूखदूर्बळ यांनी शनिवार, 01/11/2008 11:18 या दिवशी प्रकाशित केले.
(थोडस चर्‍हाट : भारत- ऑस्ट्रेलीया कसोटी मालिका सध्या रंगतदार अवस्थेत आहे. गेल्यावेळेची मालिका ही रंगतदार झाली होती. पण ती मालिका जास्त गाजली ती खेळा व्यतीरिक्त इतर कारणांमूळे. कांगारूंची शेरेबाजी (स्लॉजींग) , हरभजन- सायमंडस वाद , पंच स्टीव्ह बकनर ह्यांचे पक्षपाती निर्णय इत्यादी इत्यादी.
Taxonomy upgrade extras

कुणी एक गझलाकार

लेखक दत्ता काळे यांनी शुक्रवार, 31/10/2008 20:09 या दिवशी प्रकाशित केले.
हे जे काही मी रचलं आहे, ते नक्की कुठल्या काव्यप्रकारात बसेल हे माझ्या ल क्षात येत नाहीये. पण जसं सुचलं, तसं लिहिलं. घ्या सांभाळून दादानु गझलांची चळ्त रचतोच आहे छापण्या पुढे व्हा, मी येतोच आहे कुणी सांगण्या येई, गझल दे करुनी मागण्याआधी मी देतोच आहे लिहिण्यास पाने पड्ली, जराही कमी ती मुलांच्या वह्या मी उसवतोच आहे भिऊनी पळाले शब्द ओळीमधुनी गचांडी धरुनी, त्यांना बसवतोच आहे ओळ्खून गझलाकारास, प्रतिक्रिया जर दिली 'तिलाही' धुवाधार धुतोच आहे

(आशिक मी अन माल भेटली होती 'कविता')

लेखक चतुरंग यांनी बुधवार, 29/10/2008 23:30 या दिवशी प्रकाशित केले.
अनिरुद्ध अभ्यंकरांची 'आवरताना काल मिळाल्या काही कविता' वाचली आणि आम्हाला भेटलेल्या काही 'कविता' डोळ्यांसमोर तरळून गेल्या!

भैया हलेना

लेखक मूखदूर्बळ यांनी बुधवार, 29/10/2008 18:20 या दिवशी प्रकाशित केले.
(श्री. भा रा तांबे ह्यांची क्षमा मागून त्यांच्या 'चाफा बोलेना' ह्या कवितेचे/ गीताचे स्वैर विडंबन ) भैया हलेना भैया चालेना भैया खंत करी काही केल्या परतेना गेले 'जोगेश्वरी' च्या गोठी म्हटली म्हशींसवे गाणी आम्ही दूधात पाणी मिळवून रे आले सप च्या मनी अबू बरळला जनी राजास पाहून गळाले हातपाय रे हा तर संजय निरूपम करी जिवाची तगमग म्हणे राहू आपण दोघे जण रे. चल ये रे मूलायमा घालू आपण छट पूजा लाठया काठ्यांनी करू दांडगाई रे अमर सिंगाचे किडे ह्यांचे लक्ष मतांकडे आपण करू एकगठ्ठा मतदान रे भैया फूली (xxx) आला खूलून गेल्या सर्व दिशा आटून इथे भैया मग कुठे मुंबईकर रे.
Taxonomy upgrade extras