प्यार कुणावर...
'वार कुणावर...' झालेले बघून मला अगदी कसेसेच झाले आणि मग आम्हाला उमाळा आला! ;)
प्यार कुणावर माझ्याच्याने करवत नाही
खूप शेकलो म्हणून आता मिरवत नाही...
'सल्लू'सारखे बनणे नाही जमले मजला
उगीच नंबर कुणाचेच मी फिरवत नाही...
हातभट्टिचे सेवन करतो, 'हिमेश' सुनतो
हट्ट 'बिपाशा'चे मी आता पुरवत नाही...
चलन मागणारे मी बहुदा टाळत असतो
शब्द दिलेला कधीच मजला अठवत नाही...
ब्रँड धुराचा का बदलत जातो असा तुझा?
सवाल असले उत्तरण्याचे ठरवत नाही...
गप्प जाहलो म्हणून कविजन करती थट्टा?
विडंबनाने खोड सारखी जिरवत नाही...
दिसता 'कविता' हात लागला लगेच चोळू
धीर मुळीही 'रंगा'ला मग धरवत नाही...
चतुरंग
वाचन
3650
प्रतिक्रिया
0