मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

वाङ्मय

वॉल्डन....

जयंत कुलकर्णी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
लेखक - - अभिषेक धनगर आपले जीवन किती का क्षुद्र असेना? त्याला सामोरे जा आणि ते जगा. त्याच्यापासून तोंड वळवून दूर जाऊ नका; आणि त्याला नांवेही ठेवीत बसू नका. जीवन कसेही असले तरी तें काही तुमच्या आमच्या इतके खचित वाईट असत नाही.[१] हेन्री डेव्हिड थोरो हेन्री डेव्हिड थोरो हा प्रख्यात अमेरिकन लेखक आणि विचारवंत. मागील वर्षी त्याच्या जन्माला दोनशे वर्षे पूर्ण झाली. उणेपुरे ४५ वर्षांचे आयुष्य थोरोच्या वाट्याला आले. मात्र त्यानंतरच्या दीड शतकावर थोरोच्या विचारांचा अमीट ठसा उमटला आहे. काळ लोटेल तसे त्याच्या विचारांचे महत्त्व अधिकाधिक सुसंगत ठरत आहेत.

जर्नी इस द रिवॉर्ड

महासंग्राम ·
लेखनप्रकार
जगातले काही शोध असे आहेत, ज्यामध्ये पूर्ण समाजाला बदलूंन टाकायची शक्ती असते. कम्प्युटरचा शोध या महत्वाच्या शोधांपैकीच एक. कम्प्युटर जेव्हा प्राथमिक अवस्थेत होते तेव्हा कोणी विचारही केला नसेल, कि येत्या काही दशकांत तुम्ही घरबसल्या दुसऱ्या खंडातल्या लोकांशी संवाद साधू शकाल, खिशात १००० गाणी ठेवून फिरू शकाल. खरं तर तेव्हा अशी कोणी कल्पना असती तर त्याला अगदी वेड्यात काढलं असतं, पण म्हणतात ना वेडी माणसंच इतिहास घडवू शकतात.

मी तुझा विचार करते

शिव कन्या ·
मी तुझा विचार करते, मी तुझ्या वयात रमते.... माझे खळाळणारे हसू अनुभवांच्या भोवऱ्यांतून तरून सुशांत जलाशयातल्या शांत स्मितासारखे तुझ्या ओठांशी येऊन थांबेल...... मी तुझा विचार करते, मी तुझ्या वयात रमते......

बालकथा - पहिला प्रवास

बिपीन सुरेश सांगळे ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
बालकथा - पहिला प्रवास ही बालकथा आहे . ( छोटा वयोगट ). मुलांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी . खास उन्हाळी सुट्टीनिमित्त . मला मुलांच्या प्रतिक्रिया कळवा हं . .. आवर्जून ! आणि तुमच्या सुद्धा . --------------------------------------------------------------------------------------------------------------------- पहिला प्रवास -------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- राजूच्या शाळेला उन्हाळ्याची सुट्टी होती. तो मामाच्या गावी निघाला होता. त्याचा मामा मुंबईला राहायचा. त्याने हिरव्या रंगाचा टी शर्ट घातला होता.

शुद्धलेखनाच्या आग्रहाबद्दलची प्रश्नचिन्हे -३

माहितगार ·
लेखनविषय:
शुद्धलेखनाच्या आग्रहाबद्दलची प्रश्नचिन्हे - २ हा धागा लेखात पुरेशा भाषा तज्ञांचे दाखले नमुद केल्या नंतर क्रमांक ३ चा लेख टाकण्याचा प्रसंग इतक्यात माझ्यावर येईल असे माझे मलाही वाटले नव्हते.

घडलंय असं आज...

किसन शिंदे ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
आॅफिसला जाण्याची सकाळची गडबड. लवकर कसं पोहचू? ट्रेन उशीर तर करणार नाहीत ना? आजचं काम व्यवस्थित होईल का? असे सगळे प्रश्न डोक्यात ठेवून आपण धावत सुटतो, अगदी आजूबाजूचं जग विसरून. इतकं की आपल्या सभोवती घटणाऱ्या चांगल्या वाईट गोष्टींकडेही आपलं लक्ष जात नाही इतके आपण यांत्रिकपणे पळत सुटलोय. पण आज समोर घटणाऱ्या दोन घटनांनी या यांत्रिक आयुष्यातून किंचितही का होईना मला बाहेर पडण्यास मदत झाली. सकाळी स्टेशनला आत शिरताना बाहेर ठाणं मांडून बसलेल्या विक्रेत्यांचा अडसर हा रोजचाच.

कवितेपलिकडील कविता - २

आनन्दा ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
या कवितेपलिकडील कवितेची प्रेरणा वेगळी होती - पण आज मी खरेच अश्या काही कविता, मला भावलेल्या आणणार आहे. काही अवांतर विषय पण येतील, पण ते कृपया सहन करून घ्या. ========================================================================================= मे महिन्यात कार ने फिरणे बरेच होते, त्यामुळे अर्थात रेडीओ पण खुप ऐकला जातो. गेल्या वर्षी का आदल्या वर्षी याच सुमारास हेट स्टोरी मधले "आज फिर तुमपे प्यार आया है" हे गाणी ऐकलं होतं.

तथाकथित शुद्धलेखनाच्या अवाजवी आग्रहाबद्दलची प्रश्नचिन्हे २

माहितगार ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
*शुद्धलेखनाच्या आग्रहाबद्दलची प्रश्नचिन्हे -१ हि धागा मालिका शुद्धलेखनवादी ट्रोलांसाठी नाही. शुद्धलेखन समर्थक चर्चा या धाग्यात टाळून सहकार्य करावे, हि विनंती वाचूनही मनमोकळे करण्याची इच्छा झाल्यास शुद्द्धलेखनप्रियकर मिपाकरांच्या या धाग्यावर जावे. ज्यांना शुद्धलेखन नियमात विधायक सुधारणा व्हाव्यात असे वाटते त्यांनी बिरुटे सरांच्या या धाग्यावर आपली मते नोंदवावीत.

आरश्यातल्या आरश्यात : एक आस्वाद

डॉ. सुधीर राजाराम देवरे ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
- डॉ. सुधीर रा. देवरे आरश्यातल्या आरश्यात वारले बेवारशी... - मनोहर ओक (‘आयत्या कविता’ मधून) मनोहर ओक यांच्या ‘आयत्या कविता’ या कविता संग्रहातील ही पहिली कविता. एका ओळीची. या एका ओळीच्या कवितेतील शेवटचा ‘बेवारशी’ हा शब्द ओळीत पहिला असता तर ते केवळ एक वाक्यश झाले असते: ‘बेवारशी आरश्यातल्या आरश्यात वारले!’ असे ते वाक्य झाले असते. पण ‘बेवारशी’ हा शब्द ओळीच्या शेवटी गेल्याने या वाक्याला एक लय प्राप्त झाली आहे. मात्र केवळ हा शब्द शेवटी गेल्यानेच लय निर्माण झाली असे मात्र नव्हे. तर या एवढ्याश्या ओळीतच नाद लयीचे सुंदर मिश्रण आहे. म्हणून ही एकच एक ओळ संपूर्ण कवितेची अट पूर्ण करते.

शतजन्म शोधितांना....

शिव कन्या ·
'झाडाच्या फांद्यांना जमिनीला आलिंगन देता येत नाही. म्हणून ती बेहद्द असोशीने वाढत जातात ….आणि मुळांना निरोप पोहचतो, मग मुळे खोल खोल पसरत जातात. मुळे खोल खोल जातात, फांद्या बहारदार होत जातात. मुळांचा निरोप फांद्यांना, फांद्यांचा निरोप मुळांना मिळत जातो. जमिनीतली ओल फांद्यांपर्यंत,आणि हवेतला गंध मुळांपर्यंत पोहचत राहतो. त्यांच्यातले हितगुज अत्तर होते. एके दिवशी, फांदीवर कळी उमलते. त्यासरशी सगळ्या फांद्या मोहरतात. मग, कळीचे फूल होते. वाऱ्यावर डुलते. आपल्या रंगरूपाने आसमंत भारून टाकते. फांद्या जमिनीकडे पहात राहतात. किती असोशी! फांद्यांना वाटते, आता तरी आपण जमिनीला स्पर्श करू.