.

तथाकथित शुद्धलेखनाच्या अवाजवी आग्रहाबद्दलची प्रश्नचिन्हे २

Primary tabs

माहितगार's picture
माहितगार in जनातलं, मनातलं
6 Jun 2019 - 2:16 pm

*शुद्धलेखनाच्या आग्रहाबद्दलची प्रश्नचिन्हे -१

हि धागा मालिका शुद्धलेखनवादी ट्रोलांसाठी नाही. शुद्धलेखन समर्थक चर्चा या धाग्यात टाळून सहकार्य करावे, हि विनंती वाचूनही मनमोकळे करण्याची इच्छा झाल्यास शुद्द्धलेखनप्रियकर मिपाकरांच्या या धाग्यावर जावे. ज्यांना शुद्धलेखन नियमात विधायक सुधारणा व्हाव्यात असे वाटते त्यांनी बिरुटे सरांच्या या धाग्यावर आपली मते नोंदवावीत. ट्रोलींग शिवाय ज्यांना शुद्धलेखन संदर्भात रचनात्मक काम करावयाचे आहे त्यांनी विकिवरील येथे अथवा येथे रचनात्मक सहभाग घ्यावा. मात्र कृपया या धागा मालिकेत प्रतिसाद, खरडी अथवा व्यनिने सल्ले देऊ नयेत ही नम्र विनंती. अनुषंगिक अवांतरा व्यतरीक्त इतर अवांतर चर्चा टाळण्यासाठी धन्यवाद.

* धागालेख मालिका शुद्धलेखनवादी ट्रोलांसाठी नाही याची विशीष्ट सुचना लिहुनही एखाद दुसरा दुसरा अपवाद वगळता त्यांनी हजेरी लावून लेखातील मुद्यांना सोडून टिका केली आहे त्यापैकी एकासही लेखात नमुद केलेले व्याकरणकाराम्चे मुद्दे खोडता आलेले नाहीत याची सुज्ञ वाचक नोंद घेतीलच

*** *** ***
एवढ्या लेखापुरतं माफ करा. पुढे व्याकरणविषयक चर्चा तिकडे होईल याची काळजी घेऊ.
ठीक आहे! मिपावरील एक्स पंचायत समिती सदस्य हा आपला रुतबा ध्यानात घेऊन आम्ही तूर्तास काहीच बोलत नाही. चालू द्यात चर्चा..!
परंतु या पुढे कृपया कुणीही भाषा, भाषेचा विकास, भाषेचं यांव, भाषेचं त्यांव, शुद्धलेखन, व्याकरण या विषयांवरील चर्चा मिपावर करून मिपाचं वातावरण घाण करू नये अशी सर्वांना हात जोडून, नम्र व कळकळीची विनंती!
मिपा जसं आहे तसंच राहू द्या! त्याला विद्वान संकेतस्थळांच्या रांगेत नेऊन बसवायचा प्रयत्न करू नका एवढीच विनंती! :)
तात्या.
29 May 2008 - 8:09 am | विसोबा खेचर https://www.misalpav.com/comment/26304#comment-26304

तात्या आपले पूर्ण मत माहित नाही पण अभिव्यक्ती स्वातंत्र्यास आपण प्राधान्य देत प्रमाण भाषेच्या मक्तेदारीतून सर्वसामान्याच्या अभिव्यक्तीस व्यक्त होऊ देण्यास आपण प्राधान्य देत आपल्या परोक्ष आपली जुनी बाजू लावून धरण्याचा पुनरपी प्रसंग येतो आहे. आपले आशिर्वाद असावेत.

भाषिक अभिव्यक्तीचे आकलन स्थलकाल निरपेक्ष करता यावे म्हणून लिपी एक साधन असते. साधन आणि साध्य यात गल्लत करून लिपी हेच अंतीम साध्य असल्याप्रमाणे टोकाचे आग्रह जगभर पाहण्यास मिळतात.
यात आपलीच लिपी श्रेष्ठ असल्याच्या अहंगंडापासून ते समयोचित लिपी बदल विचारात घेण्यास अंगिकारण्यास नकार ते इतर लिपींना आणि ते वापरणार्‍यांना तुच्छ लेखणे किंवा अगदी धर्म आणि लिपींचा सहसंबध जोडून लिपी लादल्या जाणे इथ पर्यंत मजल जाताना दिसते. मग अरेबिक लिपी स्वराक्षरांनाच स्विकारणार नाहीत, तमीळ कमी व्यंजनात उच्चारणे बसवण्याचा घोळ घालतील, गुजराथी डोक्यावर शिरोरेषा नको एवढ्यावर अडतील तर देवनागरी बरीच उच्चारणे स्विकारुनही बरीच उच्चारणे बाकी आहेत आणि मुख्य म्हणजे माणूस शब्द वाचन चित्र स्वरुपात करत असतो चित्रचिन्हवाचन हे अधिक सुलभ आणि वेगवान असू शकते हे वास्तव समजून घेणार नाहीत, तर चिनी लोक चित्रलिपीसाठी चिन्हांची भयंकर संख्येची गरज भासते हे लक्षात घेत नाहीत. रोमन आणि अरेबीक लिपीच्या आग्रहा मागचे धार्मीक आग्रह काही वेळा उघड काही वेळा छुप्यापद्धतीने लादले जातात बर्‍याच स्थितीत या लिपी स्थानिक भाषांना न्याय देऊ शकत नसल्या तरीही.

मूलत: की प्रत्येकाकडे काहीना काही (योग्य अथवा अयोग्य) माहिती ज्ञान विचार असू शकतो आणि माहिती ज्ञान विचार यांच्या देवाण घेवाणीत त्यांचा सहभाग असण्याची गरजेचा जाणता अजाणता विसर पडलेला दिसतो. परीणामी लिपी आणि प्रमाण भाषा विषयक बंधनांची इन्च्लुजिव्हीटी साठी शिथीलता आणण्याकडे चांगलेच दुर्लक्ष होते की घडवले जाते म्हणण्यासारखी परिस्थिती निर्माण होते. कायदा, व्यापार विज्ञान इत्यादी विशीष्ट व्यवहारात प्रमाण भाषेची गरज असते, हे कुणालाही सहसा मान्य करावे लागते, इथे जमीन मऊ लागण्याची जणू गॅरंटीच असते. आणि तथाकथित प्रमाणभाषा आणि लिपींवर अप्रत्यक्ष विशीष्ट वर्गाची मक्तेदारी राबवली जाते. मऊ लागलेली जमीन सर्वसामान्याम्च्या अभिव्यक्तींच्या दमनासाठी कोपराने खणून पद्धतशीरपणे वापरली जाते.

जिथे काँटेक्स्टवरून बोध होणे शक्य आहे तिथेही अभिव्यक्ती अथवा व्यक्तीला डिसक्रेडीट करण्यासाठी छोट्यामोठ्या चुकांचे बवंडर माजवले जाते. व्यक्तीस घृणास्पद, अपमानास्पद वागणूक देणे जेणेकरून व्यक्ती हिनत्वाची भूमिका इंटर्नलाईज करेल पुन्हा कोणताही वेगळा विचार मांडणार नाही मक्तेदारांची मक्तेदारी स्विकारेल अशा प्रकारचे दुष्टचक्र व्यवस्थित राबवले जाते ज्यात ९८ टक्के लोकांची अभिव्यक्ती दूर सारता येणार असते.

स्मरणशक्तीचेही प्रकार असावेत प्रत्येक प्रकारची गोष्ट सर्वांना स्मरणात ठेवता येणे आणि नेमक्यावेळी वापरता येणे कठीण असू शकते. नेमके स्पेल्लींग शुद्धलेखन नेमक्यावेळी न जमणे म्हणजे बाकी बुद्धीमत्तेचा अभाव असा अर्थ नसावा. वस्तुतः बहुतांश वेळा उर्वरीत विचार आणि बुद्धीमत्ता यास अधिक प्रियॉरीटी मिळावयास हवी त्या एवजी विचार , बुद्धीमत्ता माहिती ज्ञान यांचा अभाव असलेली मंडळी प्रमाणभाषेच्या टेंभ्यावर केवळ भावच खाऊन जात नाही ज्ञानावर आपलीच मक्तेदारी असून आपण म्हणू ती पूर्वदिशा अशा अहंकारात वावरू लागलेली दिसतात.

या तथाकथित शुद्धलेखन कलेचा एक मोठा गैरवापर वादविवादात जेव्हा तुमच्याकडे मुद्दे नसतात तेव्हा तुम्ही दुसर्‍यांच्या शुद्धलेखनातल्या चुका काढण्यासाठी केलेला वारंवार आढळून येतो. मिपासारख्या संस्थळावर लेख अथवा लेखकास हाणूनपाडण्यासाठी या अस्त्राचा सढळ उपयोग केलेला आढळून येतो. आपल्या भूमिकेला चिटकून राहायचे आहे मनाचा खुलेपणा नको आहे तर मग दुसर्‍याचे शुद्धलेखन सुद्धा बोचण्याचे दावे पुढे केले जाऊ लागतात.

या व्यवस्थेत भीमराव आंबेडकर एवजी भिमराव अंबेडकर लिहिले की कुत्सितपणे हसता येणार असते. तथाकथित प्रमाण उच्चारणे करता आली नाही आणि स्वतः जसे उच्चारण करतो तसे लेखन केले की टिंगल करता येते. हि निवडलेली प्रमाणभाषा सहसा मूळात उमराव संमत उच्चश्रेणी निष्ठ असते आणि सर्वसामान्यांना कष्टानेच तेही काही प्रमाणातच अवगत होऊ शकते . मला एका तथाकथित प्रमाणभाषा पंडीताने प्रमाण मराठीची व्याख्या जातिय नसून व्यासपिठीय मराठी असल्याचे सांगितले माझा लगोलग प्रश्न होता किती प्रकारच्या व्यासपिठांवरील मराठीचा अभ्यास करून केव्हा ताळेबंड काढला गेला आणि व्यासपिठांवरील मराठीत जसे बदल झाले त्यातील किती बदल प्रमाण मराठीने स्विकारले कालानुरुप होनारे बदल आणि बहुजनांची मराठी प्रमाणमराठीत दिसेल यासाठी कोणती व्यवस्था उपलब्ध आहे याचे उत्तर सहाजिकच त्या महोदयांकडे नव्हते.

हे चक्र राबवण्याचा मोठा मार्ग प्रकाशन संस्था आणि पारितोषिक प्रणाली असते. पारितोषिके देणारा आणि विकत घेऊन वाचन करणार्‍या वर्गाच्या मानसिकतेवर प्रमाणभाषेची प्रमाणता ठरत असते. त्यापुढे प्रकाशकांना आणि लेखकांना सहसा मान झुकवावीच लागते. मग तेही या दुष्ट चक्राचा भाग बनून जातात. बहुजनांचे प्रतिनिधीत्व न करणार्‍या शब्दसमुह आणि नियमावलींना प्रमाण का मानावे हा प्रश्नच कुणास पडेनासा होतो पडलाच तर शाऊट डाऊन करण्याचा मार्ग मोकळा असतोच.

मी या भाषाशास्त्राच्या दृश्टीने प्रश्न करण्याजोग्या अवाजवी आग्रहांना मराठी प्राध्यापक मंडळी शिंगावर का घेत नाहीत असा प्रश्न विचारला तर एका मराठी प्राध्यापकांनी आम्हाला स्वतःला शुद्धलेखन जमत नाही असा अर्थ काढून प्रचार करून आम्हालाही डिसक्रेडीट केले जाते त्यामुळे कुणि या भाषाशात्रज्ञातून दुष्टचक्रास भेदण्याची हिम्मत करू शकत नाही अशी तक्रार नोंदविली. बहुसंख्य वरीष्ठ भाषातज्ञ शुद्धलेखनाच्या संकल्पनेतील त्रुटी दाखवून देताना दिसतात पण प्रकाशकांच्या आणि प्रमाणभाषा मक्तेदाराम्च्या दबावा खाली त्यांना पुन्हा एखादे तथाकथित शुद्धलेखनाची बाजू घेणारे प्रकरण टाकावे लागते. मध्ये एका प्राध्यापक महोदयांनी र्‍हस्व दिर्घ म्हणजे टोपीच्या दिशेला महत्व देण्यासारखे आहे म्हटले पण सदर प्राध्यापक पुन्हा काही महिन्यात प्रमाणभाषेच्या मक्तेदारांपुढे नतमस्तक झालेले दिसले. भाषाशास्त्र तज्ञ,मंडळी कधी शुद्धलेखनाच्या नियमांची श्रद्धेय पुजा बांधणे व्यर्थ आहे हे सर्वासमक्ष कधी कबूल करुन दाखवणार ? हा प्रश्न मला सदैव पडत असतो

अशुद्धलेखन म्हणजे काय? जे लेखन व्याकरणदृष्ट्या शुद्ध समजले जात नाही ते लेखन म्हणजे अशुद्धलेखन. मराठी शुद्धलेखनाचे काही टप्पे आहेत. मराठी शुद्धलेखन या संकल्पनेचे एक मूळ संस्कृतातील पाणिनी व्याकरणाला मानले जाते. पाणिनीच्या व्याकरणानंतर जे त्या व्याकरणाच्या नियमात बसते ते शुद्ध आणि बसत नाही ते अशुद्ध हा स्वाभाविक नियम बनला. अशा स्वरूपाच्या व्याकरण व्यवहाराला आदेशात्मक व्याकरण म्हणले जाते."मराठी व्याकरण"च्या व्याकरणकार लीला गोविलकर यांच्या मते शुद्धलेखनाचे सार्वजनिक व्यवहारात महत्त्व आहे, पण फक्त आदेशात्मक व्याकरण म्हणजे भाषेचे व्याकरण नव्हे; आणि व्याकरण विषयक नियम शिकून शुद्धलेखन जमतेच असेही नव्हे.
वस्तुतः आपली जी अभिव्यक्ती आहे त्यावरून व्याकरणाचा अंदाज बांधणे एवढाच खरेतर वैय्याकरणींचा मर्यादीत रोल असू शकतो. फार फार तर दुसर्‍या भाषिक लोकांना मराठी भाषेचे शिक्षण देण्या पुरते अथवा कायद्यापुढे किस काढण्यापुरता आणि विद्यार्थ्यांना प्रमाणभाषेच्या व्याकरणाची सर्वसाधारण माहिती व्हावी हा इथपर्यंत व्याकरणाची मर्यादा झाली. माझ्या किंवा कुणाच्याही लेखनातील व्याकरण काय असावे हे सांगण्याचा कुणालाही कदापि मी अधिकार देणार नाही. मी आणि माझ्या सारखे अन्य जे लिहितात त्यातील साम्यस्थळे शोधून व्याकरणाची दखल घेणे एवढेच वैय्याकरणींची मर्यादा आहे. त्यामुळे व्याकरण विषयक उपदेश घालणार्‍यांना मी माझ्या धागा लेखात उभेसुद्धा करत नाही.
स्मरणशक्तीचेही प्रकार असावेत प्रत्येक प्रकारची गोष्ट सर्वांना स्मरणात ठेवता येणे आणि नेमक्यावेळी वापरता येणे कठीण असू शकते. नेमके स्पेल्लींग शुद्धलेखन नेमक्या वेळी न जमणे म्हणजे बाकी बुद्धीमत्तेचा अभाव असा अर्थ नसतो. वस्तुतः बहुतांश वेळा उर्वरीत विचार आणि बुद्धीमत्ता यास अधिक प्रियॉरीटी मिळावयास हवी त्याएवजी विचार , बुद्धीमत्ता माहिती ज्ञान यांचा अभाव असलेली मंडळी प्रमाणभाषेच्या टेंभ्यावर केवळ भावच खाऊन जात नाहीत ज्ञानावर आपलीच मक्तेदारी असून आपण म्हणू ती पूर्वदिशा अशा अहंकारात वावरू लागलेली दिसतात.

'मराठी लेखन-कोशा'त कोशकार अरुण फडके पान ४४ वर दाखवून देतात की महामंडळाने घालून दिलेले शुद्धलेखनविषयक नियमही सर्वबाजूने परिपूर्ण नाहीत. ते म्हणतात "शुद्धलेखन आणि आजची परिस्थिती: शिक्षण, लेखन आणि मुद्रितशोधन या तीन घटकांचा शुद्धलेखनविषयक परिस्थितीचे बरे-वाईट करण्यात मोठा वाटा असतो..., महामंडळाच्या शुद्धलेखन नियमांपैकी मर्यादित नियमच शाळा व महाविद्यालय स्तरावर शिकवले जातात...,मुळात महामंडळाचे हे १८ नियम अपुरे पडतात,त्यात पुन्हा जे आहेत ते सगळे शैक्षणिक आयुष्यात कधी शिकवले जात नाहीत. अशा परिस्थितीत समाजाकडून शुद्धलेखनाची अपेक्षा करणेच चुकीचे आहे..लेखन आणि मुद्रितशोधन या दोन बाबींचा विचार एकत्रितपणे करता येईल..लेखक व मुद्रितशोधक दोघेही गेल्या विसेकवर्षात शिक्षण घेतलेले असतील तर या दोघांचे शुद्धलेखन चांगले नसण्याचीच शक्यता जास्त असते... या परिस्थितीत 'दोष ना कुणाचा' हे मान्य केले तरी 'पराधीन' मात्र आत्ताची आणि येणारी पिढी आहे."(संदर्भ:मराठी लेखन-कोश -कोशकार अरुण फडके; पान १९)

डॊ.लीला गोविलकर पुढे म्हणतात "मराठी भाषा ही इंग्रजी-संस्कृत पेक्षा वेगळी भाषा आहे‌. संस्कृत-इंग्रजी व्याकरणांचा प्रभाव मराठी भाषेच्या व्याकरणाचे वेगळे व्यक्तिमत्त्व दाबून टाकू पहातो."*...व्याकरणाने भाषेतील एकाच रूपाला मान्यता देणे म्हणजे भाषेच्या विविधतेला,तिच्या स्वाभाविक विकासाला अडथळा करण्या सारखे आहे....त्यामुळे धड ना आदेशात्मक, धड ना वर्णनात्मक अशी मधली-मधली स्थिती या व्याकरणांची झाली आहे व त्यामधूनच शुद्धाशुद्धबद्दल मते मांडली गेली आहेत.
शुद्ध व अशुद्ध हे शब्द या गोंधळात भर घालणारे आहेत....प्रत्येक भाषेमध्ये नियम तयार होत असतात...पाळले जात असतात...वाहने रस्त्याच्या डाव्या बाजूने चालवावीत की उजव्या यांच्या संबधीच्या नियमांसारखे आपणच ठरवलेले असतात... 'ने' हा शुद्ध 'णे' हा प्रत्यय वाईट असे नसून त्याचा प्रसार किती व कोणत्या समाजामध्ये या गोष्टी लक्षात घेतलेल्या असतात... शुद्धाशुद्धाचा विचार करताना डॉ. ग्रामोपाध्ये म्हणतात,की भारतामध्ये व्याकरणशास्त्राची सुरुवात झाली, ती अपभ्रष्ट शब्दांपासून संस्कृत शब्द वेगळे ठेवण्याच्या कल्पनेमधून; म्हणजे शुद्धाशुद्धाच्या दृष्टिकोनातून होय..(पान३४) (ह्या ग्रंथातील ऊहापोह अत्यंत सविस्तर आणि वाचनीय आहे. मराठी व्याकरणविषयाची गोडी असलेल्या व्यक्तींनी वाचावाच असा ग्रंथ आहे)
वस्तुत: मराठी भाषेच्या आद्य मोडी लिपीत अक्षरांच्या गोलाकार सुबकतेला महत्त्व होते परंतु र्‍हस्व-दीर्घ आणि व्याकरणशुद्धतेबद्दल फारसे महत्त्व नव्हते. छपाईयंत्राच्या वापरापासून देवनागरी लिपीचा वापर सुरू झाला. मराठीचे शालेय शिक्षण व छपाईकरिता लागणारी ब्रिटिश शासनाची मान्यता देणारा ब्रिटिश आधिकारी मेजर कँडी हा शुद्धलेखनाच्या नियमांबद्दल आत्यंतिक आग्रही होता. पुण्यातील उच्चभ्रू किंवा सभ्य व्यक्तींचे मराठी उच्चार ती प्रमाण मराठी असे त्याचे मत होते. तत्कालीन प्रसिद्ध व्याकरणकार दादोबा पांडुरंग यांनासुद्धा भिन्न मते असलेले स्वत:चे मराठी व्याकरणविषयक पुस्तक फक्त स्वत:च्याच खर्चाने नव्हे तर शासकीय रोषाची भीती स्वीकारून प्रसिद्ध करावे लागले होते.
मराठी शुद्ध/अशुद्धलेखनाचा इतिहास

...पेशवे कालापर्यंत आणि नंतरही मराठीचे गद्यलेखन मोडी लिपीत करण्याचा प्रघात होता.मोडी लिपीत विरामचिन्हांचा वापर करण्याची पद्धतच नव्हती....'ई'काराचे लेखन दीर्घ करायचे आणि 'उ'काराचे लेखन र्‍हस्व करायचे असा संकेत होता....मुद्रण सुरू झाल्यापासून पहिल्या वीस-पंचवीस वर्षांमध्ये लेखकांनी बरेच स्वातंत्र्य घेतलेले दिसते.पण इ.स. १८४७ मध्ये मेजर कँडी हा ब्रिटिश अधिकारी शिक्षणखात्याचा प्रमुख बनल्यापासून सर्वच चित्र पालटले...सर्व अधिकार मेजर कँडीकडेच असल्यामुळे तो सांगेल त्या प्रमाणे लेखकांना आपल्या पुस्तकात लेखनाच्या व व्याकरणाच्या दुरुस्त्या कराव्या लागत, ज्यांना हे मान्य नव्हते त्यांची पुस्तके मंजूर होत नसत. त्यामुळे कित्येक लेखकांनी आपल्या मनाविरुद्ध मेजर कँडीचे आदेश निमूटपणे पाळले असे दिसून येते.... मेजर कँडीने १८४७ ते १८७७ असे तीस वर्षे काम केले. शुद्धलेखन आणि व्याकरणविषयक सर्वच बाबतीत तो दक्ष असे. त्याने निर्माण केलेली नियमबद्धता शालेय पाठ्यपुस्तकातून अंमलात आल्यामुळे नव्याने शिकणार्‍या प्रत्येकावर मेजर कँडीकृत नियमांचाच पगडा बसू लागला. एखादी व्यक्ती अधिकारपदाच्या जोरावर भाषेला कसे वळण देऊ शकते याचे मेजर कँडी हे एक उत्तम उदाहरण होय. मराठीच्या व्याकरणाची व लेखनाची भाषा निश्चित करताना मेजर कँडीने पुणे प्रांतात बोलली जाणारी मराठी हीच प्रमाण मानली होती तरी मराठी भाषेने त्याचे म्हणणे काही प्रमाणात स्वीकारले, तर काही प्रमाणात नाकारले.... बरोबर काय, चूक काय हे ठरवताना त्याने हडेलहप्पी केली असे म्हणणे अन्यायाचे ठरेल.
(संदर्भ: मराठी भाषेचा इतिहास डॉ. ग. ना. जोगळेकर (पान १८८))
*** maraaThI vishvakosh***
मराठीची लेखनपद्धती गेल्या बाराशे वर्षांपासून प्रचलित असली, तरी इंग्रजपूर्व काळात तिचे स्वरूप यादृच्छिक होते. इंग्रजी राजवटीत मात्र मुद्रणकला, शिक्षणप्रसार, पाठ्यपुस्तकांची निर्मिती, व्याकरणग्रंथांची निर्मिती, वृत्तपत्रे आणि इतर नियतकालिके इत्यादींच्या परिणामांतून मराठी लेखनाचे प्रमाणीकरण झाले आणि त्या अनुषंगाने मराठीचे शुद्धलेखन अस्तित्वात आले. दादोबा पांडुरंग तर्खडकर यांच्यासारखे व्याकरणकार, मेजर टॉमस कँडी यांच्यासारखे दक्ष भाषाप्रेमी अधिकारी, प्रबोधन कार्याची बांधीलकी स्वीकरलेले वृत्तपत्रकार व लेखक, हे मराठीच्या शुद्धलेखनपद्धतीचे आद्य शिल्पकार होत. एकोणिसाव्या शतकात रूढ झालेल्या या शुद्धलेखनपद्धतीला जुने शुद्धलेखन म्हणतात. तिच्यामध्ये अनुस्वारांचा फारच सुळसुळाट दिसून येतो. स्पष्टोच्चारित अनुस्वार, नासिक्य अनुस्वार, व्युत्पत्तिसिद्ध अनुस्वार, व्याकरणिक अनुस्वार, रूढीने आलेले अनुस्वार असे सर्व प्रकारचे अनुस्वार त्या पद्धतीत होते. संस्कृतातून आलेल्या इ-कारान्त आणि उ-कारान्त तत्सम शब्दांचे लेखन संस्कृतप्रमाणे ऱ्हस्वान्तच होत असे. सामान्यरूपात मात्र त्यांचे लेखन मराठी उच्चाराप्रमणे दीर्घान्त होत असे. रूढीने रुळलेल्या व्याकरणदुष्ट रचना सदोष ठरवून व्याकरणशुद्ध रचनांचा आग्रह धरला जाई. ही लेखनपद्धती दीर्घकाळपर्यंत चालू होती. तिला अधूनमधून विरोध होत असे; पण खरा वाद १८९८ मध्ये सुरू झाला. श्री.साने, श्री. गोडबोले आणि श्री. हातवळणे या तीन विद्वानांनी शुद्धलेखनातील सुधारणेसंबंधाने एक विनंतिपत्रक काढले. लेखन उच्चारानुसार असावे, असा त्यांचा दृष्टिकोन होता. अनुच्चारित अनुस्वार गाळावेत, तत्सम ऱ्हस्व इकारान्त आणि उकारान्त शब्द प्रथमेत दीर्घान्त लिहावेत इ. सूचना त्यांनी केल्या होत्या. त्यांनी मराठी शुद्धलेखन या नावाचे एक पुस्तकही १९०० मध्ये प्रसिद्ध केले आणि शाळाखात्यातील क्रमिक पुस्तकेही त्या पद्धतीने छापली जावीत, असा प्रयत्न केला. त्यांना काही विद्वानांनी पाठिंबा दिला, पण काहींनी विरोध केला. परिणामतः परंपरावादी व परिवर्तनवादी असे दोन विरोधी गट तयार झाले. त्यांत परंपरावाद्यांची सरशी झाली. तथापि या निमित्ताने शुद्धलेखन-चळवळीत हे जे दोन पक्ष पडले, ते आजतागायत कायम आहेत. १९२८ पर्यंत ही चर्चा तात्त्विक पातळीवर चालली. न.चिं. केळकरांनी १९२८ साली आपल्या टिळकचरित्राचे दुसरा व तिसरा हे खंड एकामागोमाग एक असे प्रसिद्ध केले. ते करताना त्यांनी नवीन परिवर्तनवादी विचारसरणीप्रमाणे अनुच्चारित अनुस्वार गाळले. तेव्हापासून हे विरोधी पक्ष अधिक कृतिशील झाले. महाराष्ट्र साहित्य परिषदेने १९३० साली आपले नवे नियम प्रसिद्ध केले. ते काही जणांनी स्वीकारले व काहींनी नाकारले. त्यामुळे मराठी शुद्धलेखनाच्या क्षेत्रात दुहेरी व्यवस्था निर्माण झाली. पुढे मुंबई विद्यापीठाने २ जानेवारी, १९४७ रोजी आपले नियम स्वतंत्रपणे प्रसिद्ध केले. १९५३ साली महाराष्ट्र साहित्य परिषदेने शुद्धलेखनाच्या संदर्भात निर्माण झालेल्या अराजकातून मार्ग काढण्यासाठी एक शुद्धलेखन समिती स्थापन केली. या समितीने काही सुधारणा सुचविल्या; पण वाद मिटला नाही. त्यानंतर महाराष्ट्र राज्य निर्माण झाले (१९६०) आणि मराठी साहित्य महामंडळही अस्तित्वात आले. या महामंडळाने १९६१ साली आपली १४ कलमी शुद्धलेखन नियमावली प्रसिद्ध केली आणि २० सप्टेंबर, १९६२ रोजी महाराष्ट्र शासनाने एका ठरावाने महामंडळाच्या या नियमावलीला मान्यता देऊन मागील सर्व नियम रद्द केले.[२]
शासनाच्या या कृतीने मराठी शुद्धलेखनाबाबतच्या वादावर कायमचा पडदा पडला, असे नाही. अनेक विद्वानांनी या नियमावलीविरुद्ध आपली मते व्यक्त केली आहेत आणि त्यांनी स्वतःचे लेखन स्वतःच्या पद्धतीने केलेले आहे. यासंबंधात प्रा. वसंत दावतर परंपरावादी आहेत. प्रा. अरविंद मंगरूळकर आणि प्रा. कृ.श्री. अर्जुनवाडकर यांना त्यांची मते मान्य नसली, तरी ते शासकीय नियमावलीच्या बाजूनेही नाहीत. डॉ. वि.भि. कोलते यांनी ऱ्हस्व-दीर्घ भेदच दुर्लक्षित करा, अशी टोकाची भूमिका घेतली. श्रीमती सत्त्वशीला सामंत आणि श्री. दिवाकर मोहनी यांनी शासकीय नियमावलीतील त्रुटी आणि विसंगती यांवर बोट ठेवून नवीन सुधारणा सुचविल्या आहेत. ही सर्व चर्चा साधारणपणे अनुच्चारित अनुस्वार, ऱ्हस्व-दीर्घ भेद, समासान्तर्गत तत्सम ऱ्हस्वान्त शब्दांचे लेखन, व्यंजनान्त शब्दांचे लेखन इ. मुद्यांवर केंद्रित झाली आहे. शुद्धलेखनाच्या जोडीने भाषिक प्रदूषणासंबंधीही मराठीत पूर्वीपासून आजतागायत अखंडपणे चर्चा होत राहिली आहे. वि.दा.सावरकर, माधवराव पटवर्धन, श्री. के. क्षीरसागर, पु. ल. देशपांडे, में. पु. रेगे यांनी या संदर्भात आपापली मते मांडली आहेत. या सर्व चर्चांमधून एवढेच निष्पन्न होते, की मराठीच्या शुद्धलेखानाचा वाद अद्याप चालू आहे. [३]
***मराठी विश्वकोशातून कॉपीपेस्ट करून घेतलेल्या मजकुर ओळीची/परिच्छेदाची सीमारेषा / समाप्ती रेषा***
शुद्धलेखनाच्या आग्रहाबद्दलची प्रश्नचिन्हे

‘महाराष्ट्र सारस्वत’ ग्रंथकर्ते विनायक लक्ष्मण भावे यांच्या मते, मृत व नियमांनी जखडलेल्या संस्कृत भाषेच्या अनुरोधाने किंवा संमतीने जिवंत मराठी शब्दांची रूपे ठरवताना व त्यांचे खोटे ‘शुद्धलेखन’ बनवताना घालमेल होते.[४]
मराठीतील शुद्धलेखनाचा भर 'इ' आणि 'उ' ह्यांच्या र्‍हस्व- दीर्घ लेखनावरच अधिक आहे,हे शुद्धलेखनाचे नियम पाहता स्पष्ट होते... व्यावहारिक पातळीवर अडचण म्हणजे जर लेखनातून ही (दीर्घ ई दीर्घ ऊ) चिन्हे घालवून टाकली,तर वीहीर किंवा विहिर ,नदि,मि,तु असे पाहण्याची सवय करावी लागेल. ती सवय करण्यापेक्षा ही चिन्हे कायम ठेवावीत पण त्यासाठी त्यांना वर्ण म्हणण्याचा आग्रह मात्र शास्त्रपूत नव्हे, असे गोविलकरांचे मत आहे.[संदर्भ: मराठीचे व्याकरण-डॉ.लीला गोविलकर:(पृष्ठ ६१-६७)]. (ही चर्चा खूपच प्रदीर्घ आहे, संपूर्ण देणे अवघड आहे, त्यामुळे हा विभाग अपूर्ण आहे. शक्य झाल्यास पूर्ण करण्यास मदत करा).
मराठीतील ऱ्हस्वदीर्घ हे अर्थभेद करणारे नाहीत आणि कुठे ऱ्हस्व स्वर यावा आणि कुठे दीर्घ स्वर यावा हे सोबतच्या वर्णांच्या सापेक्षतेने त्या स्वराचे स्थान कोणते ह्यावरून ठरते. त्यामुळे इकारउकारांच्या ऱ्हस्वदीर्घभेदाकरता वेगळ्या चिन्हांची आवश्यकता नाही असे मत सदाशिव आठवले ह्यांनी (‘रसिक’ दिवाळी अंक, १९८३; ललित मासिक, एप्रिल १९८४ पृ. ६२;) पूर्वी मांडलेले आहे. ललित मासिकातील गमभन ह्या सदरात त्याविषयीचे आपले वेगळे मत पंतोजी ह्या टोपणनावाने कृ. श्री. अर्जुनवाडकर ह्यांनी नोंदवलेले आहे (ललित मासिक, फेब्रुवारी १९८४ पृ. ५१-५२; जून १९८४ पृ. ४२-४३). मराठी लेखननियमांवरील संस्कृताचा प्रभाव ह्या विषयावर डॉ. वि. भि. कोलते ह्यांनीही आपली परखड मते व्यक्त केली आहेत. इकारउकारासाठी एकच चिन्ह असावे अशी सूचना त्यांनीही १९६७ साली भोपाळ येथे भरलेल्या अ. भा. मराठी-साहित्य-संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात केली आहे.[५]
अवधूत परळकर त्यांच्या मुलाखतीत म्हणतात, "शुद्धलेखनाची दहशत निर्माण करण्याला माझा विरोध आहे. शुद्धलेखनाला घाबरून मराठी लिहिण्यापासून कोणी परावृत्त होत असेल तर शुद्धलेखनाचा आग्रह धरणं मला क्रिमिनल वाटते. भाषा आपले विचार व्यक्त करण्यासाठी आहे. व्याकरणामुळे अभिव्यक्तीवर दडपण येत असेल तर व्याकरण सोपे करायचे प्रयत्न झाले पाहिजेत. शुद्धलेखनाचे नियम पाळण्याची अपेक्षा धरावी. पण ते कुणी पाळले नाहीत तर त्याला तुच्छ लेखू नये. त्याची अडचण समजून घ्यावी. क्रीडांगण मधला क्री अनेकजण ऱ्हस्व काढतात. गल्लोगल्लीतल्या क्रीडा मंडळांच्या बोर्डावर क्री ऱ्हस्वच लिहिलेला असतो. पण म्हणून त्या मंडळाच्या कार्याकडे, कामगिरीकडे दुर्लक्ष करता येत नाही. मराठी भाषा बहुजनांपर्यंत न्यायची असेल तर व्याकरणाच्या बाबतीत कठोर धोरण स्वीकारून चालणार नाही. भाषा टिकवायची आहे की व्याकरण हे एकदा ठरवावं.[६]
डॉ. आनंद यादव यांच्या मते "भाषा शुद्ध किंवा अशुद्ध असत नाही. ते असते किंवा नसते इतकेच. भाषेतून एकमेकांशी संवाद होणे महत्त्वाचे असते,‘‘ डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या मतानुसार , ""सांस्कृतिक धोरण तयार करताना "शुद्धलेखन‘ हा शब्दच काढून टाका, असे राज्य सरकारला सुचवले आहे. कारण भाषा शुद्ध, अशुद्ध यावरून धार्मिक, सांस्कृतिकतेची झालर व्यक्त होते. "लई‘, "बी‘ हे शब्द अधिकृत म्हणून स्वीकारले जावेत.‘‘ त्यांच्या मते, वेलांटी, उकार इत्यादी बाबतीत मोठ्या प्रमाणात संस्कृतवर अवलंबून राहणे हे मराठीच्या स्वातंत्र्याचीही आणि विकासाचीही हानी करणारे आहे. शुद्धलेखन या शब्दाऐवजी प्रमाणलेखन हा शब्द वापरणे, हा बदल किरकोळ स्वरूपाचा मानता कामा नये. त्याच्याकडे अतिशय गांभीर्याने पाहिले पाहिजे.[७][८]
डॉ. वसंत काळपांडे यांच्या मतानुसार, खरी गरज आहे ती मराठीच्या तज्ज्ञांनी स्वत:च्या मनोवृत्तीत बदल घडवून आणण्याची. त्यांनी मराठीला लिपी, शुद्धलेखन आणि व्याकरण या कर्मकांडात बंदिस्त करून ठेवले आहे. वास्तविक पाहता (मराठीचे शिक्षक, प्राध्यापक, लेखक, कवी यांच्यासह) बहुतेक जण नियमांची तमा न बाळगता त्यांना योग्य वाटेल तसेच लिहीत किंवा बोलत असतात. भाषेच्या अशा तथाकथित "नियमबाह्य‘ वापरामुळे त्यांच्या व्यवहारात कोणतीही अडचण आल्याचे आढळत नाही. नियमांचा जाच होतो तो शाळेत शिकणाऱ्या मुलांनाच. अनावश्‍यक कर्मकांडांत आणि नियमांत अडकून पडल्यामुळे मराठीच्या सौंदर्याचा आस्वादच त्यांना घेता येत नाही. अभिव्यक्तीतही याच बाबींचा अडसर होतो. मराठीची लिपी, उच्चार, शुद्धलेखन, व्याकरण, इत्यादींबाबत उदार धोरण स्वीकारण्याची गरज भाषाशास्त्रज्ञ डॉ. ना. गो. कालेलकर, डॉ. वि. भि. कोलते आणि प्रख्यात व्याकरणकार द. न. गोखले यांच्यासारख्या तज्ज्ञांनी विशद केलेलीच आहे. आजचे भाषातज्ज्ञ मराठीला अनावश्‍यक कर्मकांडांच्या बाहेर काढतील अशी आशा आहे. [९]

संदर्भ
मराठी विकिपीडियावर मी केलेले संकलनात्मक लेखन

https://www.misalpav.com/node/40881 sane guruji

कल्याण वासुदेव काळे. "कल्याण वासुदेव काळे-१". मराठी विश्वकोश. खंड १७ (मुंबई: महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ). ७१२४.

http://www.esakal.com/saptarang/dr-sadanand-mores-article-sapatarang-29094

^ http://sushantmhane.blogspot.in/2010/11/blog-post.html
^ http://www.sahityasanskruti.com/node/32
^ http://balmitra.esakal.com/NewsDetails.aspx?

वाङ्मयप्रतिभा

प्रतिक्रिया

सुवाच्य लेखनावर पण एक असाच लेख येउ द्या.

महासंग्राम's picture

6 Jun 2019 - 2:53 pm | महासंग्राम

नेमकं म्हणायचं काय आहे ? मिपावर शुद्धलेखन करावे कि करू नये ?

जॉनविक्क's picture

6 Jun 2019 - 7:10 pm | जॉनविक्क

मनात न आणता मिपावर लेखन करावे/वाचावे असे लेख सुचवीत आहे.

प्रसाद_१९८२'s picture

6 Jun 2019 - 4:01 pm | प्रसाद_१९८२

हा संपूर्ण लेख वाचायचा आहे का ?

एवढे जास्त होत असेल तर माझे धागे १०ओळी आहेत

गड्डा झब्बू's picture

6 Jun 2019 - 6:41 pm | गड्डा झब्बू

>>>हा संपूर्ण लेख वाचायचा आहे का ?>>>
सक्ती नाही.. ज्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली खंडीभर क्लिष्ट, निरर्थक धाग्यांचा रतीब घालायचा असेल त्यांना तसे करण्याचा परवाना मिळण्यासाठी वाचणे अनिवार्य आहे.
#अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा विजय असो.

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 Jun 2019 - 4:36 pm | डॉ सुहास म्हात्रे

सार्वजनिक मुक्त संस्थळावर आडकाठी (प्रसिद्धीपूर्व संपादन) शक्य करणे शक्य नसते आणि संस्थळाचे वातावरण मुक्त व खेळीमेळिचे रहावे यासाठी तसे केलेही जात नाही. या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन, हेतूपुर्रसर, चुकीची अक्षरे असलेले शब्द, व्याकरणाची मोडतोड करणारि वाक्ये, आणि एकंदरीत सामान्य, समंजस वाचकाला त्रास होईल, असा मजकूर लिहू नये, ही अपेक्षा अवास्तव तर नाहीच पण मिपावरच्या चांगल्या वातावरणासाठी आवश्यक आहे. या सामान्य, तार्कीक व सभ्य अपेक्षेकडे डोळेझाक करून, नाठाळपणाला उत्तेजन देणारे प्रतिसादच नव्हे तर आख्खे लेख लिहिले जातात ! मजा आहे !!!

वरच्या अपेक्षेमागे, "अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी तर नाहीच", पण, "समंजस मिपावाचकाला हेतूपुर्रसर त्रास देऊ नये", हा उद्येश आहे, हे वेगळे सांगायची गरज आहे का?!

देवा, उच्च मानवी तत्वांना पाठींबा देण्याच्या नशेत काही लोक इतके वाहावत जातात की, आपण समंजसतेची सीमा ओलांडून नाठाळ लोकांना प्रोत्साहन देत आहोत, हे त्यांच्या ध्यानात येत नाही. हे सर्वसाक्षी मायबापा, त्यांना तू माफ कर.

हस्तर's picture

6 Jun 2019 - 5:32 pm | हस्तर

मान्य पण
फक्त ट्रोल्स ला उत्तर देण्या साठी केले तर ?

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 Jun 2019 - 5:49 pm | डॉ सुहास म्हात्रे

पण, ते एका ट्रोलने दुसर्‍या ट्रोलशी (पक्षी : एका ड्युआयडीने दुसर्‍या ड्युआयडीशी फसवी) चर्चा करण्याचा बहाणा करण्यासाठी असू नये. तुम्हाला समजले असेलच, मी काय म्हणतोय ते. :)

हस्तर's picture

6 Jun 2019 - 6:21 pm | हस्तर

हो ( समजले)
नाही (त्रोल्ल्स बरोबर कोण चर्चा करणार ?)

'हे नक्की मराठीतच लिहिले आहे ना?'

ट्रम्प's picture

6 Jun 2019 - 9:36 pm | ट्रम्प

काही खर नाही मिपाच !!!
एक आहे की सुरु झाला की लगेच संपतो आणि दूसरा सुरु झाला की संपायचे नाव घेत नाही !!
रोज उठ सूठ लेख टाकलेच पाहिजे का ?

नावातकायआहे's picture

6 Jun 2019 - 9:45 pm | नावातकायआहे

मिपास पुढील वाटचालीस अनेकोत्तम शुभेच्छा!
वाचन मात्रच होतो.
आता चपला घालुन निघावे हेच बरे!!

एक आहे की सुरु झाला की लगेच संपतो आणि दूसरा सुरु झाला की संपायचे नाव घेत नाही !!

बडे मिया छोटे मिया चि आठवन आलि