Skip to main content

संस्कृती

आमार कोलकाता – भाग ६ – बंगाली कलासंस्कृतीचा अध्वर्यु

लेखक अनिंद्य यांनी शुक्रवार, 18/10/2019 12:23 या दिवशी प्रकाशित केले.
लेखमालेचे यापूर्वीचे भाग इथे वाचता येतील : भाग १ - http://www.misalpav.com/node/45320 भाग २ - http://www.misalpav.com/node/45361 भाग ३ - http://www.misalpav.com/node/45433 भाग ४ - https://misalpav.com/node/45481 भाग ५ - http://www.misalpav.com/node/45533 आमार कोलक

चक्र पूजा

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी बुधवार, 16/10/2019 11:07 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे चक्र म्हणजे युध्दाची व्युहरचना. देवीचं असुरांशी झालेलं युध्द म्हणजे चक्रपूजा. फक्त अहिराणी पट्ट्यातच म्हणजे जुन्या खानदेशी भागातच (बृहन्खा नदेशातच) चक्र पूजा मोठ्या प्रमाणात केली जाते. चक्रपूजा ही आपापल्या कुलदैवताची-देवीची पूजा असून ती नवरात्रांत केली जाते. नवरात्रींमध्ये रोज कुठेना कुठे अहिराणी भागात चक्र पूजा असते. त्यातही परंपरेने विशिष्ट माळेलाच चक्र भरण्याची वेगवेगळ्या घराण्यांची प्रथा असते. सप्तमी आणि अष्टमीला चक्र पूजेचे प्रमाण जास्त असते. प्रत्येकाची ठरा‍वीक तिथी- विशिष्ट दिवस ठरलेला असतो.

आमार कोलकाता - भाग ५

लेखक अनिंद्य यांनी मंगळवार, 15/10/2019 11:18 या दिवशी प्रकाशित केले.
लेखमालेचे यापूर्वीचे भाग इथे वाचता येतील : भाग १ - http://www.misalpav.com/node/45320 भाग २ - http://www.misalpav.com/node/45361 भाग ३ - http://www.misalpav.com/node/45433 भाग ४ - https://misalpav.com/node/45481 आमार कोलकाता - भाग ५ कोलकाता शहराची खास अशी जी लक्षणे आहेत त्यात शहरवासियांचे नाट्यवेड हे प्रमुख आहे आणि ते

आमार कोलकाता - भाग ४

लेखक अनिंद्य यांनी बुधवार, 09/10/2019 12:36 या दिवशी प्रकाशित केले.
८५ अँमहर्स्ट स्ट्रीट, कोलकाता  चित्रसौजन्य - राजा राममोहन रॉय मेमोरियल, कोलकाता. जुन्या कोलकात्यातील एक महालसदृश्य इमारत. जॉर्जियन वास्तुशास्त्राचा सुंदर नमुना असलेल्या शहरातील थोडक्याच इमारतींपैकी एक. फ्रान्सिस मेंडीस नामक श्रीमंत कलाप्रिय माणूस इमारतीचा मूळ मालक. १८१४ साली रंगपूरहून (सध्या बांग्लादेशात असलेले शहर) आलेल्या एका भारतीय व्यक्तीने १३००० रुपयांचा घसघशीत मोबदला देऊन फ्रान्सिसकडून हे घर विकत घेतले आणि तिथे कायमचे राहायला येण्याचे ठरवले.

दसरा

लेखक शिव कन्या यांनी मंगळवार, 08/10/2019 19:24 या दिवशी प्रकाशित केले.
जगदंबेच्या हातामधली शस्त्र शलाका विजयी होवो रणचंडीचे स्मरण दुर्जना सदैव तुजला मनात होवो ज्यांच्या हाती शस्त्र दुधारी त्यांचा बुद्धीभेद न होवो नाही ज्यांच्या हाती काही त्यांचे घरटे सुखरुप होवो आज निकामी शस्त्रे ज्यांची वृक्ष शमीचा त्यांना लाभो सरुन जावो अज्ञाताचा काळ सुखाचा फिरुन येवो सोन्याचा हा दिवस आजचा उजळ होऊ दे तुझ्या अंगणी बलवानांचे मस्तक राज्ञी विनम्र होऊ दे तुझ्याच चरणी दसऱ्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा. शिवकन्या

आमार कोलकाता - भाग ३

लेखक अनिंद्य यांनी गुरुवार, 03/10/2019 11:13 या दिवशी प्रकाशित केले.
लेखमालेचे यापूर्वीचे दोन भाग इथे वाचता येतील : आमार कोलकाता - भाग १ - http://www.misalpav.com/node/45320 आमार कोलकाता - भाग २ - http://www.misalpav.com/node/45361 आमार कोलकाता - भाग ३  हुगळी नदीचे पात्र, दक्षिणेश्वर, कोलकाता.

मंतरलेले दिवस २

लेखक सुधीर कांदळकर यांनी शनिवार, 28/09/2019 19:33 या दिवशी प्रकाशित केले.

शारदोत्सव

नवरात्र सुरू झाले की माझ्या बालपणच्या नवरात्रातल्या महालक्ष्मीच्या जत्रेच्या स्मृती मनात रुंजी घालू लागतात. आमच्या घरी सखूआज्जी - आईची एक सख्खी मावशी कायमची राहायला आलेली होती. वयात अंतर असले तरी तशा दोघी मैत्रिणीच होत्या. दोघीही धार्मिक आणि सश्रद्ध. देवी ही स्त्रीशक्ती असल्यामुळे मुंबईतल्या स्त्रियांना महालक्ष्मी देवीचे फार अप्रूप. गणपती विसर्जन झाले की दोघींना महालक्ष्मीच्या जत्रेचे वेध लागत. माझ्या एकदोन मावसबहिणी पण पितृपक्षात कधीतरी आमच्याकडे येऊन जात. जत्रेला जायचा दिवस ठरवायला.

जाणिवांची अंतरे

लेखक हजारो ख्वाईशे ऐसी यांनी शुक्रवार, 27/09/2019 13:11 या दिवशी प्रकाशित केले.
त्वचेच्या रंगांवरून अगदीच वेगळे ओळखे जाऊ अशा देशात मी राहतेय सध्या. आपण कितीही म्हटलं तर मनाच्या एका कोपऱ्यात आपण खरंच सामावले जाऊ का इथल्या लोकांच्यात हा प्रश्न येतोच. मुलाची शाळा इंटरनॅशनल स्कूल. त्यात जगाच्या चारी कोपऱ्यातून आलेली पिल्लं. माझ्या पिल्लासारखीच. हसरी पण नवीन जागेला बावरलेली. पण ती एकमेकांचे छान दोस्त होतात. नवऱ्याच्या ॲाफिसमध्येही तसेच पूर्ण जगभरातून आलेले लोक. पण काम करता करता त्यांचीही गट्टी होते. राहता राहिले मी. सध्या ऑफिसला जात नसल्याने माझा तो लोकांच्यात मिसळायचा मार्ग नाही. मग उरतात मला रोज भेटणारे लोक.

सिकन मटन फिस

लेखक मृणमय यांनी शुक्रवार, 27/09/2019 10:19 या दिवशी प्रकाशित केले.
कॉलेज मध्ये असताना मला अनेक भाषा फाडायला मिळाल्या. कोकाट्याच्या फाडफाड इंग्लिश बरोबरच मी फाडफाड ( तोंडात रोसोगुल्ला ठेवून फॉडफॉड) बंगाली, असामीज आत्मसात कि भस्मसात केली माहित नाही. पण ह्या माझ्या गुणांमुळे मी नॉर्थ च्या खूप मैत्रिणी जमवल्या होत्या. त्यांचे राहणीमान आपल्यापेक्षा खूप वेगळे. त्या दिसायला पण इतक्या वेगळ्या कि नेपाळी किंवा तिबेटियन ,म्हणून सहज खपतील. बसके नाक आणि बारीक मिचमिचे डोळे. आता विचार करा ह्या डोळ्याच्या इवल्याश्या फटीतून डोळ्याचे हाव भाव कसे दिसतील? इमॅजिनेशन करून झाले असेल तर सांगते खूप छान दिसतात. अगदी जसे च्या तसे, पाहण्याची कला आपल्यात हवी.

आमार कोलकाता - भाग २

लेखक अनिंद्य यांनी मंगळवार, 24/09/2019 11:42 या दिवशी प्रकाशित केले.
लेखमालेचा पहिला भाग येथे वाचता येईल :- http://www.misalpav.com/node/45320 आमार कोलकाता - भाग २ झाशीची राणी, तात्या टोपे, बहादुरशहा जफर, मंगल पांडे..... ही मंडळी म्हणजे १८५७ सालच्या उठावाचे नायक! इंग्रजांची सत्ता उलथून टाकण्याचा एत्तद्देशीयांनी एकत्र येऊन केलेला हा जोरकस-जबर प्रयत्न १८५७ साली झाला हे आपल्यापैकी बहुतेकांनी शालेय इतिहासाच्या पुस्तकात वाचले आहे. पण त्याआधी बरोबर १०० वर्षे म्हणजे १७५७ साली एक फार महत्वाची लढाई बंगालच्या भूमीवर घडली, ती म्हणजे प्लासीची पहिली लढाई.