'चले जाव' चळवळः- काही प्रतिक्रिया
समजा १९४२ साली आतासारखी उठवळ माध्यमे असती तर काय बातम्या असत्या?
१. गांधींनी जनतेस चिथावले ' करो या मरो', जनजीवन विस्कळीत
२. आंदोलनकर्त्यांनी रेल्वे रूळ उखाडले, तारा कापल्या, जनतेचे हाल
३. गांधीसमर्थकांचा देशभर उच्छाद, आम आदमी घरात दडून!
४. वेळेत तार न पोचल्याने मुलगा आईच्या अंतिम दर्शनास मुकला
५. रेल्वे बंद, हजारो विद्यार्थी परीक्षेस मुकले
६. सर्वत्र अराजकतेचे दृश्य, आम आदमीची होत आहे गैरसोय
७. मजुरी बुडाल्याने गोदी कामगारांचा सवाल, 'आज चूल कशी पेटणार?'
८. इंग्रज सोडून गेल्यावर त्यांचे आर्दर्ली कुटुंबाचे पोट कसे भरणार? गांधींनी इंग्रजांना 'चले जाव' म्हणण्यापूर्वी या सगळ्या गोष्टींचा विचार करायला पाहिजे- अमुक कामगार नेते यांचे प्रतिपादन
९. आम्हालाही स्वातंत्र्य हवे आहे, पण सामान्य नागरिकांना वेठीस धरून मिळणार असेल तर अशा आंदोलनास आमचा विरोध राहील! - विरोधी पक्षनेते
१०. गांधीनी आताच का 'करो या मरो' ची घोषणा दिली? टायमिंग संशयास्पद! What's the deal, Mahatma?- ट्विटरविंद बवाल
११. 'ह्या ज्या स्वस्त धान्य दुकानसमोर जी ही रांग लागली आहे, त्यामुळे हे जे रांगेत उभे असणारे हे जे लोक आहेत, हे त्रस्त झाले आहेत. हे जे आंदोलन आहे, त्यामुळे हा जो त्रास होतोय, तो फक्त आम आदमीलाच होत असून, 'कुठे आहेत ह्या आंदोलनामुळे घाबरलेले इंग्रज अधिकारी', असा हा प्रश्न जो आहे, तो जे हे गांधी आहेत, त्यांना हा इथे विचारावा वाटतो" - घी 12 तास चॅनेलचा वार्ताहर
१२. ' स्वातंत्र्यप्राप्तीसाठी इंग्रजांना लक्ष्य करण्याऐवजी भारत बंद ची हाक देऊन सामान्य जनतेला वेठीस धरणे योग्य आहे का?' - ज. गा. वेगळे
१३. " इंग्रज अधिकारी आपल्या बंगल्यात बसून ऍपल पाय खात दार्जिलिंग टी चे घोट निवांतपणे घेत असताना गोरगरीब जनता मात्र गांधींच्या आंदोलनापायी भरडली जात आहे. ही गांधींची हुकूमशाही आहे. " - युवा नेते
१४. " ही तर गांधींची मुस्लिम लीगच्या वेगळ्या पाकिस्तानच्या मुद्द्यापासून जनतेचे लक्ष भरकटवण्याची युक्ती! " - सुश्री नेत्या
१५. " Gandhiji, Target British Officers, not the common man." -ट्विटराणा
१६. " Is independence is the only solution for India's problem? Mr. Mahatma, There are more important issues to solve!" - ट्विटरिका
-स्वामी संकेतानंद
( अवांतर:- थोडाफार इतिहास वाचलेला असल्याने काही तत्कालीन नेत्यांनी चलेजाव चळवळीचा विरोध केला होता, हे मला माहित आहे. पण इथे ते मुद्दे घेऊन नका. )
याद्या
6252
प्रतिक्रिया
43
मिसळपाव
ह्हा ह्हा हा. !
हा हा...
आम्ही पण
@गुर्मीत गंवार., उठाठेव टॉक
In reply to आम्ही पण by नाखु
मस्तच स्वामीजी!
Hahaha
In reply to मस्तच स्वामीजी! by बोका-ए-आझम
चांगले शाल जोडीतले आहेत...
In reply to मस्तच स्वामीजी! by बोका-ए-आझम
+१
In reply to मस्तच स्वामीजी! by बोका-ए-आझम
भारी आहे हो लेख
हाहाहा!
"गांधींनी असले फालतू आंदोलन
खरे म्हणाल तर कुणीही गरीब रडत
Lol
हाहाहा
मस्त.. वाचून मजा आली.
" तुम मुझे खून दो मैं तुम्हे
कहर!!!
In reply to " तुम मुझे खून दो मैं तुम्हे by स्वामी संकेतानंद
खतरनाक..
In reply to " तुम मुझे खून दो मैं तुम्हे by स्वामी संकेतानंद
=))
मिपा फेमस सदस्यांनी कसे
हाहा
मस्त लिहिले ahe
चले जाव चळवळ करणे हे कधीही
स्वतंत्र विदर्भ झालाच पाहिजे
स्वतंत्र बबन झालाच पाहिजे!
In reply to स्वतंत्र विदर्भ झालाच पाहिजे by तेजस आठवले
चरख्यावर सूत कातून झाल्यावर
=))
In reply to चरख्यावर सूत कातून झाल्यावर by तेजस आठवले
:)
In reply to चरख्यावर सूत कातून झाल्यावर by तेजस आठवले
खोटीश भिकेर कोण?
गिरीश कुबेर
In reply to खोटीश भिकेर कोण? by संदीप डांगे
ही तर अल्पसंख्यांकांच्या
हाग्विजय हिंग
=))) स्वामीजी फॉर्मात !!
तत्कालीन मिपाकरांचे काही धागे
जनक्षोभाचे आगामी निवडणुकांवर
In reply to तत्कालीन मिपाकरांचे काही धागे by आदूबाळ
=))
In reply to तत्कालीन मिपाकरांचे काही धागे by आदूबाळ
तीन दिवसात आंदोलन मागे घ्या
टीका
वोक्के! म्हणजे फक्त मुर्त्या
In reply to टीका by प्रसाद गोडबोले
फक्त मुर्त्या बदलल्या, मंदिर,
In reply to वोक्के! म्हणजे फक्त मुर्त्या by संदीप डांगे
भारतीय मानसिकता ही
स्वामिजींनी समाधीअवस्थेत
This writing is now on