मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

समाज

आयुष्याचा परिघ समजून घेताना

चंद्रकांत ·
आसपास वसतीला असलेला अंधार प्रकाशाइतकंच प्रखर सत्य. पण उजेडाची आस अंतरी असणंही तसं स्वाभाविकच. वास्तव आणि कल्पितात अंतर असतं. ते ज्याला कळतं त्याला यश आणि अपयशाच्या व्याख्या पाठ नाही करायला लागत. वास्तवाचा विसर पडणं प्रतारणा असते आपणच आपल्या विचारांशी केलेली. खरं हेही आहे की, हे वास्तवच जगण्याची प्रेरणा असते. पायांचं नातं जमिनीशी अन् विचारांची सोयरिक आभाळाशी असली की, वास्तव विस्मरणात नाही जात. आयुष्याचा विस्तार काही आपल्या हाती नसतो, पण त्याचा परीघ समजून घेणं शक्य असतं. त्याची लांबीरुंदी किती असावी हे आपल्या हाती नसलं, तरी कोण्या नजरेला अधोरेखित करता येईल एवढी खोली देता येणं संभव आहे.

स्वप्नं

Gayatri Gadre ·
आज सकाळी अजून दोन फेरीवाले येऊन गेलेत, स्वप्नं विकायला. आठवड्यातले चौथे फेरीवाले. या सगळ्या फेरीवाल्यांना माझा पत्ता कोण देतंय याचा शोध घेतला पाहिजे. आजकाल प्रमाणाबाहेर वाढलेत. स्वप्नं तशी बरी होती, ताजी नव्हती. पण आजकाल ताजं स्वप्नं मिळतंय कुठे म्हणा. सगळी शिळीच, नवेपणाचा लेप चढवलेली, नवीन रंग किंवा सुगंधाचा फवारा मारलेली. आणि क्वचित कधी ताजं स्वप्नं आलंच बघण्यात तर लगेच मनात शंका दाटून येतात, ते विकणारा फसवत नाही कशावरून? एकंदर काय, स्वप्नांचा व्यवहार दिवसेंदिवस कठीणच होत चाललाय. डोळ्यात तेल घालून चिकित्सा करावी लागते. नाहीतर पदरचा वेळ खर्च केल्यावर लक्षात येतं फसवणूक झाली म्हणून.

चेहरा

चंद्रकांत ·
माणसांना स्वतःचा चेहरा घेऊन जगता येणं काही अवघड नाही. साधेपणाने जगण्यात सगळं शहाणपण सामावलेलं असतानाही माणसं आपली अंगभूत पात्रता विसरून, मुखवटे परिधान करीत कोणत्यातरी मोजपट्टीवर स्वतःला का सिद्ध करू पाहत असतील? सांगणं अवघड असलं, तरी असंभव नाही. माणसांच्या असण्यातच त्याचं उत्तर आहे असं म्हणणं वावगं ठरू नये. मुळात कोणत्यातरी निकषांवर आपली उंची नजरेत भरण्याइतकी ठसठशीत असावी अशी आस जवळपास प्रत्येकाच्या अंतरी सुप्तावस्थेत का असेना, पण अधिवास करून असते.

अपघात - एका नव्या ट्रकचा

पाषाणभेद ·
आज सुरेवारसिंग ट्रकलोड घेवून मध्यप्रदेशातल्या सतना या गावी जायचे होते. नवी मुंबई ते सतना या प्रवासासाठी त्याने मनाची तयारी काल दुपारीच केली होती. साधारण चार दिवसाचा एकूण प्रवास होणार होता. इकडून काहीतरी केमीकल फिल्टर प्लांटचे मशिनरी घेवून तिकडे एका फॅक्टरीत अनलोड करायचे अन तिकडून इंदूरपर्यंत अनलोड येवून इंदूर जवळच्या पिथमपूरहून बजाज टेंम्पोमधून सामान घेवून ते चाकणला उतरवून परत नवी मुंबई. त्याच्या अनुभवाने एखादा दिवस जास्तच लागणार होता हे त्याला जाणवले होते. घरी किरकोळ किराणा सामान अन मुलीसाठी खाऊ घेवून तो काल दुपारीच लवकर घरी आला होता. रात्री आराम करून तो सकाळी उठला.

~ गोष्ट अक्षतची ~

पिंगू ·
तळकोकणातील सावंतवाडी तालूक्याच्या निसर्गसमृद्ध ओटवणे गावात जन्माला आलेली 'प्रकृती' सॉफ्टवेअर इंजीनिअर झाली आणि एका मोठ्या आयटी कंपनीत जॉबला लागली. युरोप दौऱ्यात तिची ओळख झाली राहूल बरोबर. अत्यंत स्मार्ट आणि हुशार राहूल तेव्हा एक बँकींगचा प्रोजेक्ट लीड करत होता. नकळत त्यांच्या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले पर्यवसान लग्नात. राहूलकडे फ्रांसचे नागरिकत्व असल्याने दोघांनी तिकडेच सेटल व्हायचा निर्णय घेतला आणि ओटवण्याची प्रकृती "न्यु ओरेलान्स" ला शिफ्ट झाली.. अनोळखी देश, नविन लोक, वेगळ्याच परंपरा ... आधीतर प्रकृती गोंधळूनच गेली होती.

हे वाचा: येस, आय ॲम् गिल्टी!

अनुस्वार ·
कटाक्ष- लेखक: मुनव्वर शाह संपादन: शुभदा गोगटे प्रकाशन: शुभदा-सारस्वत प्रकाशन प्रथमावृत्ती: फेब्रुवारी १९८३, सध्या सहावी (जून २००७) पृष्ठ संख्या: २०० किंमत: ₹१०० ओळख- १९७६-१९७७ च्या दरम्यान पुणे शहर दहा हत्याकांडांनी हादरले. महाराष्ट्रात जोशी-अभ्यंकर हत्याकांड या नावाने या गुन्ह्यांची दखल घेतली गेली. ‌मोठा धक्का होता तो म्हणजे या हत्याकांडात आरोपी म्हणून पकडले गेलेल्या पाच तरुणांची पंचविशीच्या आतली वये. मुनव्वर शहा हा त्या पाचांतला एक. वयाच्या अवघ्या एकविशीत पाच जणांच्या हत्येत प्रत्यक्ष सहभाग घेणारा.

जर्द काही जीवघेणे..!!

किसन शिंदे ·
डोंगर-दऱ्या भटकायला सुरूवात केल्यापासून जवळपास एक तप होत आलंय. या ११-१२ वर्षांत, कित्येकदा गडकोटांवर पौर्णिमेला चांदण्या रात्रीपासून ते अमावस्येला चांदण्यानी गच्च भरलेल्या आभाळाखाली मुक्काम केला. अगदी भल्या पहाटेपासून ते रात्रीच्या किर्र अंधारात कित्येकदा जंगलातून भटकलो. कित्येक अनवट जंगलवाटा धुंडाळल्या, परंतू आजतागयत जंगली श्वापदांचा सामना प्रत्यक्षात कधीही झाला नव्हता. नाही म्हणायला, रायगडावर नगारखान्यापासून वाघ दरवाज्याकडे जाणाऱ्या वाटेवर एका 'विशिष्ठ' पावलांचे ठसे पाह्यले होते, पण ते तेवढंच.!! आजची सकाळ मात्र सगळ्या गोष्टींना अपवाद ठरली.

माज

खिलजि ·
स्वैर वारा खेळ खेळतो, लालबुंद मातीशी कणकणास उंच उडवे, दूरवर आकाशी रंग वेगळा धूलिकणांचा मिसळला नभांत सूर्यागमनाने झाल्या दशदिशा मूर्तिमंत डोकावे अधूनमधून कळस एका मंदिराचा दावे जणू दिशा कुणा , जरी आसमंत धुरळ्याचा स्वैर वारा अन कळस , स्थितप्रज्ञ भासले रंग घेऊनि सोनेरी मात्र धूलिकण माजले माज उतरला क्षणात आपटले धर्तीवरती स्वैर वारा मंद झाला , परतली लाल माती ================================== सिद्धेश्वर विलास पाटणकर

राघू

खिलजि ·
आज झालो भ्रष्ट मी पसरले माझे दोन हात पाठीवरती वार करुनि केला साहेबा कुर्निसात लावूनी चरणधूळ ललाटी पकडून धरली गच गोटी मागे वळूनी पाहतो तर त्याचीही हिरवी शेपटी कोण खोटा कोण खरा हिशेब मनी नाही लागला ज्याला मी साहेब समजलो तोपण साला राघू निपजला ======================= सिद्धेश्वर विलास पाटणकर

कवीचा मृत्यू आणि इतर..

पाटिल ·
एक ऑनलाईन शोकसभा.. फार चांगला होता मनमिळावू कष्टाळू एकांतप्रिय होता कोऑपरेटीव्ह नेचरचा होता हसतमुख होता कविता पण लिहायचा मला त्यातलं एवढं कळत नाही पण चांगल्याच असतील.. पाठवत असायचा इकडे तिकडे पण छापायचेच नाहीत हो कुणी लोकांना किंमत कळली नाही त्याची आता कोण पाठवणार मला कविता..! एका ग्रुपवर कळलं सकाळी वाचून धक्का बसला मग लगेच बाकीच्या ग्रुपवर सगळ्यांना कळवलं सगळ्यांना धक्का बसला शाळेतल्या मित्रांना धक्का बसला कॉलेजच्या मित्रांना धक्का बसला जुन्या कलीग्जना पण धक्का बसला धक्का सगळ्यांना घरच्या घरीच बसला कुणाला बेडवर लोळताना बसला कुणाला दाढी करताना करताना बसला कुणाला पेपर चाळताना बसला ह