युवर बाॅस इज नॉट ऑलवेज राईट..
मी एका रेडिओ स्टेशन वर काम करत होते. तिथं माझे नियरेस्ट बाॅस-म्हणजे माझ्या पोस्टच्या फक्त एकच स्तर वरचा असलेले बाॅस होते. त्यांना आपण क्ष म्हणू. आमच्या दिल्ली ऑफिस मधून एकदा एक ७/८पानी बाड आलं. इंग्रजी भाषेत. त्यात भारताच्या प्रगतीचा आढावा घेणारा मजकूर होता. ते 'क्ष'नी मला दिलं. म्हणाले,"बाई याचं भाषांतर करा. अर्जंट आहे. एअरवर घालवायचंय."
माझं एक वैशिष्ट्य आहे. माझ्या इतक्या वर्षांच्या नोकरीत ,अगदी मी तरुण आणि लहान वयाची असताना आणि अगदी रिटायर होईपर्यंत माझ्या ऑफिसातल्या एकाही पुरुष किंवा स्त्री कलीगने मला नावाने कधीही हाक मारली नाही. प्रत्येक जण "अहो बाई"च म्हणायचे.
मिसळपाव