मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

समाज

माझी शाळा, निसर्ग शाळा - भाग २

श्रीगणेशा ·
(याआधीचा भाग इथे लिहिला होता -- माझी शाळा, निसर्ग शाळा) तोरणा विद्यालय साधारण जुलै २०२१ मधे आम्हां माजी विद्यार्थ्यांनी खूप वर्षांनी ऑनलाईन एकत्र येऊन, प्रत्यक्ष भेट वगैरे खर्च टाळून, शाळा आणि विद्यार्थ्यांसाठी काही करता येईल का यावर चर्चा सुरू केली आणि पहिल्या टप्प्यात गरजू विद्यार्थांसाठी अवांतर वाचनासाठी पुस्तके व शैक्षणिक साहित्य यावर एकमत झालं. एकत्र येऊन काम करण्याचा पहिलाच प्रयत्न असल्याने असेल कदाचित, उपक्रमातील पहिला टप्पा थोडा उशिराने, पण व्यवस्थितपणे

धावपटू- शतशब्दकथा

निओ ·
पहाटेची मॅरेथॉन साठी जमलेली गर्दी. बंदुकीचा इशारा झाला आणि त्याने सर्वांसह दुडकी चाल धरली. श्वासाचा आणि धावण्याचा मेळ बसल्यावर त्याने वेग वाढविला. रस्त्याच्या दुतर्फा जमलेली गर्दी अचंबित होऊन त्याच्याकडे पाहत होती. पण त्याला सवय होती. शर्यतीत राबणारे स्वयंसेवक त्याला मदत द्यायला उत्सुक होते. अर्धं अंतर कापल्यावर त्यानं वेग वाढविला. अजूनही आपल्यात ऊर्जा शिल्लक आहे हे पाहून जोरात धावू लागला. शेवटच्या टप्य्यात तर त्याने कमाल केली. उरले सुरले सगळे स्पर्धक मागे टाकले. दुसऱ्या दिवशीचं वर्तमानपत्र त्याने अपेक्षेने उघडले. क्रिडाविभागात, धावत असतानाचा त्याचा पूर्ण फोटो छापून आला होता.

गाव

अनुस्वार ·
अगदी साधं गाव होतं ते. लोकसंख्या कशीबशी २०००. गावात कुणी जास्त शिकलेलं नव्हतं, साहजिकच पन्नासेक पोरं तेव्हढी जवळच्या शहरात कामगार म्हणून राहायची. बाकी बराचसा गाव मळ्यांमध्ये राहायला गेलेला. मळ्यात प्यायला विहीरीचं पाणी होतं अन् आकडे टाकायला लायटीची तार पण. गावात शंभरेक घरं अजूनही होती. झेड. पी. च्या शाळेच्या पाच खोल्या (बालवाडी + चौथी) पोरांच्या शिक्षणासाठी कमी आणि लग्नाची बुंदी ठेवायला जास्त कामी येत. पाच वर्षांपूर्वी शिक्षण विभागाने एक नवीन खोली बांधून दिली - संगणक प्रशिक्षणासाठी. त्यात एक भारी टी.व्ही. पण आहे असं काहीजण सांगायचे. विजेची जोडणी नाही म्हणून त्या खोलीला टाळं आहे.

पुतळे आदर्शाचे

पाषाणभेद ·
कर्नाटकची राजधानी बंगळुरुमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची शुक्रवार १७/१२/२०२१ रोजी विटंबना करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नका उखडू पुतळे आदर्शाचे जे आम्हा पुजनीय असती नका विटंबवू आदर्श आमचे जे आमच्या हृदयात वसती हे पुतळे नेहमीचे साधे नाहीत अगदीच लेचेपेचे नाहीत ते जीवंत जरी नसले तरीही कार्य त्यांचे तळपत राहील पुतळे जरी नष्ट केले आदर्श नष्ट होत नसतात त्यांच्या येथल्या असण्याने तुम्ही येथे राहत असतात - पाषाणभेद २०/१२/२०२१

कोळीगीतः समींदरा, जपून आण माझ्या घरधन्याला

पाषाणभेद ·
समींदरा रे समींदरा, तू जपून आण माझ्या घरधन्याला लई दिवसांन परतून येईल घराला ||धृ|| नको उधाण आणू तुज्या पाण्याला नको मस्ती करू देऊ वार्‍याला काय नको होवू देऊ त्याचे होडीला तू जपून आण माझ्या घरधन्याला ||२|| नारळ पौर्णिमेचा सण आता सरला तुला सोन्याचा नारल वाढवला नेल्या होड्या त्यानं मासेमारीला तू जपून आण माझ्या घरधन्याला ||३|| मी कोलीण घरला एकली सारं आवरून बाजारा निघाली म्हावरं विकून येवूदे बरकतीला तू जपून आण माझ्या घरधन्याला ||४|| एकवीरा आई माझी डोंगरावरी खणा नारळांन ओटी मी भरीन नवस केलाय मी खंडोबाला तू जपून आण माझ्या घरधन्याला ||५|| पंधरा दिवस जायी तो समींदरात ते दिवस जातात माझे झुरण्यात

माणूस आणि पुस्तक

अनुस्वार ·
माणसं पुस्तकांसारखी असतात. कितीही वेळा भेटा, जवळ ठेवा, परंतु एकदा त्यांच्याशी संवाद सुरू झाला की कुणाचं कोणतं नवं रुप उलगडेल हे नाही सांगता येत. पुस्तके अशीच तर असतात. एक पुस्तक दुसऱ्यांदा हातात घेणे ही तशी दुर्मिळ गोष्ट. पण ज्यांनी असं केलंय त्यांना हे भावेल की, कधी कधी आधी वाचलेलं पुस्तक 'ते' हे नव्हतंच की काय असं वाटावं इथपर्यंत त्या नवेपणाची प्रचिती जाऊन पोहोचते. उरलेल्यांनी माणसांच्या बाबतीत मात्र हे शंभर टक्के अनुभवलं असेल. अगदी जवळचं उदाहरण घेऊ- आई. तुमच्यापैकी किती जण 'मला माझी आई पूर्ण कळाली' असा छातीठोकपणे दावा करु शकतील? अगदी बोटावर मोजण्याइतके.

भारतीय संदर्भ चौकटीची आवश्यकता

हर्षल वैद्य ·
भारतीय समाजातील वाढते घटस्फोटांचे प्रमाण आणि भाकड जनावरांच्या पालनपोषणाच्या जबाबदारीचे प्रश्न यांत काही परस्परसंबंध आहे काय असे विचारले तर साहजिकच नकारात्मक उत्तर येईल. पहिला विषय हा मुख्यतः कौटुंबिक व सामाजिक व्यवहारांविषयीचा आहे. तर दुसरा जरी काही प्रमाणात भावनिक आणि सांस्कृतिक असला तरी त्यात प्रमुख अंग हे आर्थिक स्वरूपाचे आहे. या दोन विषयांत सकृतदर्शनी तरी काहीही सामायिक दिसत नाही. त्यामुळे हे दोन्ही विषय, त्यांचे आनुषंगिक प्रश्न, ते सोडवण्याच्या पद्धती आणि त्यातून मिळणारी उत्तरे हे परस्परांपासून अत्यंत भिन्न असतील असा कोणी निष्कर्ष काढल्यास ते चूक म्हणता येणार नाही.

[लघुलेख] सोबत

तर्कवादी ·
स्माजात वावरताना आपल्या डोळ्यासमोर रोज अनेक गोष्टी घडत असतात. काही महत्वाचे किंवा विशेष प्रसंग दीर्घकाळ लक्षात राहतात पण कधीकधी एखादा छोटासा प्रसंगही लक्ष वेधून घेतो आणि आपला त्या प्रसंगाशी काहीही संबंध नसतानाही मनात घर करून जातो. असाच एक गेल्या काही दिवसापूर्वीचा आमच्या सोसायटीतला एक प्रसंग. सायंकाळच्या वेळी मी सोसायटीमध्ये फिरत असताना माझ्यापासून थोड्या अंतरावर एक कार मोकळ्या जागेतील पार्किंगमध्ये येऊन थांबली. कारमधून पति, पत्नी आणि दहा-बारा वर्षे वयाचा मुलगा असे कुटुंब खाली उतरले ( मी त्यातल्या कुणालाही ओळखत नसलो तरी ते पती-पत्नी व मुलगा असे कुटुंब असावे असे मानायला हरकत नव्हती ).

९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, नाशिक, ३/४/५ डिसेंबर २०२१, आणि १५ वे विद्रोही साहित्य संमेलन, नाशिक, ४/५ डिसेंबर २०२१ मधील छायाचित्रे

पाषाणभेद ·
९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, नाशिक, ३/४/५ डिसेंबर २०२१, आणि १५ वे विद्रोही साहित्य संमेलन, नाशिक, ४/५ डिसेंबर २०२१ मधील छायाचित्रे ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, नाशिक, ३/४/५ डिसेंबर २०२१ ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, नाशिक,  ३ डिसेंबर २०२१, म

युवर बाॅस इज नॉट ऑलवेज राईट..

आजी ·
मी एका रेडिओ स्टेशन वर काम करत होते. तिथं माझे नियरेस्ट बाॅस-म्हणजे माझ्या पोस्टच्या फक्त एकच स्तर वरचा असलेले बाॅस होते. त्यांना आपण क्ष म्हणू. आमच्या दिल्ली ऑफिस मधून एकदा एक ७/८पानी बाड आलं. इंग्रजी भाषेत. त्यात भारताच्या प्रगतीचा आढावा घेणारा मजकूर होता. ते 'क्ष'नी मला दिलं. म्हणाले,"बाई याचं भाषांतर करा. अर्जंट आहे. एअरवर घालवायचंय." माझं एक वैशिष्ट्य आहे. माझ्या इतक्या वर्षांच्या नोकरीत ,अगदी मी तरुण आणि लहान वयाची असताना आणि अगदी रिटायर होईपर्यंत माझ्या ऑफिसातल्या एकाही पुरुष किंवा स्त्री कलीगने मला नावाने कधीही हाक मारली नाही. प्रत्येक जण "अहो बाई"च म्हणायचे.