मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

समाज

एकटेपणा- सत्य कथा

मार्गी ·
मी प्लॅटफॉर्मवर पोहचलो. भरपूर लोक दिसत आहेत. थोडी गर्दी आहे. पण माझ्यासारखा कोणीच नाही. मला एकटेपणाची तीव्र जाणीव झाली. कोणीही माझ्यासारखा दिसत नाहीय. असह्य एकटेपणा! मला खूप अस्वस्थ व बेचैन वाटतंय. नकळत मी सारखा बघतोय कोणी माझ्यासारखा दुसरा आहे का. किती तरी वेळ गेला. गर्दीतही मी एकटाच. भीड में भी अकेला. असह्य एकटेपणा मला अस्वस्थ करतोय. मनात विचार सुरू आहे की माझ्यासारखा दुसरा कधी येईल, कधी येईल. आणि दूरवर एक जण दिसला. त्याचं येणं मला दिलासा देतंय. तोही एकटा असावा. तोही मला शोधतोय. आणि अखेर त्याची व माझी नजरानजर झाली. आता आम्ही दोघंही निश्चिंत झालो. आता आम्ही एकटे नाही.

तो शहाणा होतोय....

आजी ·
एक जाहिरात आहे एका खाद्यतेलाची. त्यातल्या आईला नृत्याची आवड,पण संसारात अडकलेल्या तिला नृत्य करायला वेळ मिळत नाही. मुलगी खिन्न होते. आईला मदत कोणी करत नाही पण अमुकतमुक खाद्य तेल ती आई वापरते, आणि लगेच.. कढईभर तेलात साबुदाणा वडे तळते.(ते वडे चक्क कच्चे दिसतात.) एकाच जेवणात साबुदाणे वडे, पुलाव आणि पाच इतर पदार्थ भरुन टेबलवर ठेवते. नंतर फडक्याला हात पुसत, मुलीच्या खोलीत जाऊन नृत्याची पोझ घेते.

प्रीसिशन सर्जिकल स्ट्राईक करणारा आणि मधमाशांचं पोळं उठवणारा कश्मीर फाईल्स!!

मार्गी ·
प्रीसिशन सर्जिकल स्ट्राईक करणारा आणि मधमाशांचं पोळं उठवणारा कश्मीर फाईल्स!! नमस्कार. आपण सर्व कसे आहात? नुकताच कश्मीर फाईल्स चित्रपट बघितला. त्याबद्दलचे माझे विचार शेअर करतो. कदाचित आपल्याला काही मुद्दे पटतील आणि काही पटणार नाहीत. पण वेगवेगळे अँगल्स, विचार आणि दृष्टिकोन कमीत कमी विचारात तर घ्यायचे असतात ना. म्हणून हे शेअर करावसं वाटलं. कधी ट्रेकिंग, कधी फिरण्यासाठी तर कधी मदत कार्यासाठी कश्मीरला प्रवास झाले.

ठेचेचा दगड

पाषाणभेद ·
दगडाची ठेच लागता रक्त येई पायात कशास होता पडला दगड असा रस्त्यात कितीतरी असे अडले असती ठेच लागून पडले असती परी न कुणी विचार करती फेकून द्यावा तो दगड कुठती असाच आला वेडा कुणी खाली वाकला तो झणी उचलूनी दगड तो पायी लांबवर कुठे फेकूनी देयी - पाषाणभेद १९/०३/२०२२

निषेध व भावनिक स्फोट

हेमंतकुमार ·
चित्रपट हे मुळात मनोरंजनाचे साधन आहे. परंतु काही मोजक्या चित्रपटांतून आपले शिक्षणही होऊ शकते. काही चित्रपटात एखाद्या विशिष्ट मध्यवर्ती कल्पनेभोवती काही प्रसंग छान गुंफलेले असतात. त्यातून आपल्याला त्या विषयाची जाणीव होते. पुढे त्याचे कुतूहल वाटू शकते आणि त्यासंबंधी अधिक वाचण्याची प्रेरणाही मिळू शकते. अशा प्रकारे मी घेतलेल्या एका अनुभवावर एक लेख यापूर्वी इथे लिहिलेला आहे : पैशांवर डल्ला आणि स्टॉकहोम सिंड्रोम ! नुकताच असा दुसरा अनुभव मला आला. तो विशद करण्यासाठी हा लेख. एकदा प्राईम व्हिडिओवर ‘आज काय पहावे’ म्हणून शोध घेत होतो.

शेन वॉर्नची अकाली एक्झिट

किसन शिंदे ·
1 आत्ता लेट तिशीत असलेल्या पिढीचं नव्वदीतलं बालपण, शेन वाॅर्न या नावाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, इतकं मोठं वलय त्या नावामागे होतं. बहुतेकांच्या स्मरणात शेन वाॅर्न म्हणजे शारजातला कोका-कोला कप, धुळीचे वादळ, सचिनने पुढे सरसावत मिड ऑनला मारलेले षटकार, इतकंच असेल, पण सच्च्या क्रिकेटवेड्या लोकांच्या हा फिरकीचा जादूगार कायम स्मरणात राह्यला, तो त्याच्या जादूई लेगस्पिनमुळे.

नकोच ते युद्ध नको

पाषाणभेद ·
नकोच ते युद्ध नको नकोच ते मृत्यू नको सहन न होणार्या वेदना नकोच नको पैशापायी जायी पैसा युद्धापायी भरडते जनता भावनेला घालती गोळी "युद्धच हवे" बोलतो वर नेता रणभुमीवर कुणी मारतो कुणी मरतो बाप, मुलगा, नवरा, भाऊ जातो घर दार कोसळूनी होते सुने नशीबी राही केवळ वाट पहाणे जमावात बातमी युद्धाची ऐकता विरश्री संचारून अंगी हाताच्या मुठी वळतसे परी कुणी एकच घरचा धारातिर्थी पडता युद्ध नको, युद्ध नकोच शब्द वदनी येतसे - पाषाणभेद ०२/०३/२०२२

पुर्वग्रह-आनंदाला ग्रहण

सागरसाथी ·
मने,माणसाचे मन मोठे विचित्र आहे. माणूस एकटा दिसला तरी त्याचे मन कधीही एकटे नसते. त्याचा मी पणा,अहंकार, गर्व,पुर्वग्रह कायम त्याच्या सोबत असतात‌. माणूस एकटा असो वा समूहात या गोष्टी कधीही त्याची साथ सोडत नाहीत. जॉर्ज शेल्लर यांनी म्हटले आहे, "माणसाला आपला अहंकार,मी पणा कधीही सोडून टाकता येत नाही, तो समोरच्याला लक्षात येईल एवढा स्पष्ट दिसत असतो".

हे वाचा: चित्रलेखा

अनुस्वार ·
कटाक्ष: भाषा- हिंदी लेखक- भगवतीचरण वर्मा प्रकाशन- राजकमल प्रकाशन (द्वारा प्रथम प्रकाशित १९९३) प्रथमावृत्ती- १९३४ सध्याची आवृत्ती- २६ वी पृष्ठसंख्या- २०० किंमत- ₹२५० ISBN : 978-81-267-1585-5 ओळख: एका गुरूच्या दोन शिष्यांना 'पाप म्हणजे काय?' असा प्रश्न पडतो. त्याचे निराकरण करण्यासाठी त्यांचे गुरु एका शिष्याला योग्याकडे तर दुसऱ्याला ऐषोरामात आकंठ बुडालेल्या सरदाराच्या संगतीत राहण्याची आज्ञा देतात. या दोन शिष्यांसोबत जीवनाच्या दोन टोकांवर हिंदोळे खात वाचक जे अनुभव घेतो त्यांचा थरार 'गेम ऑफ थ्रोन्स'पेक्षा कमी वाटत नाही.

सोशल नेटवर्क

जे.पी.मॉर्गन ·
"So are you Indian?" स्पेनच्या उत्तर पश्चिम टोकाला असणार्‍या A Coruña ह्या छोट्याशा शहरातल्या Take Away काउंटर पलिकडे Soledad नावाचा बॅज लावलेल्या त्या मुलीने माझ्या चेहर्‍याकडे बघून मी भारतीय आहे हे ओळखलं ह्यात काय कौतुक? ह्यांना प्रत्येक brown माणूस भारतीय वाटणारच. "Yes Soledad, I am." "व्हॉत पार्त ऑफ इंदिया?" "आय अ‍ॅम फ्रॉम अ सिटी कॉल्ड पूने." (माझा "पूने" उच्चार प्रश्नार्थक असतो) ओSSSह पु"णे"??? (मी चाट!). "एम जी रोड? कोरेगांव पार्क?? दागडूशेट गानापती बाप्पा मोरया!!!" "सो यू'व बीन टू पुणे?" (माझे उच्चार सुधारले!) "येSSस...थ्री मोंथ्स...ब्यूतिफुल प्लेस...