Skip to main content

समाज

अलेक्सा झाssssली ...!!

लेखक गवि यांनी गुरुवार, 22/09/2022 07:56 या दिवशी प्रकाशित केले.
अलेक्सा... "झाssssलीssss ...!!!!!" माझा नातू खच्चून ओरडत होता. मी जमेल तितका झटपट उठून बसलो. एकदम उभा राहिलो तर मला ब्लॅक आउट व्हायला होतं. बराच वेळ मी आडवाच असतो ना, म्हणून. एक मिनिट बसून मी उभा राहिलो. संतुलित होऊन बाथरुमकडे पावलं टाकत निघालो. मीही जाता जाता अलेक्सा अलेक्सा ओरडत राहिलो. काय झालं होतं मला कळेना.

एका लेखाची चाळीशी

लेखक हेमंतकुमार यांनी सोमवार, 19/09/2022 07:38 या दिवशी प्रकाशित केले.
प्रास्ताविक : माझ्या आयुष्यातील पहिलावहिला लेख मी ३९ वर्षांपूर्वी लिहिला. तेव्हा मी नुकताच एमबीबीएसची अंतिम परीक्षा उत्तीर्ण झालो होतो. त्यानंतर एक वर्षे इंटर्नशिपचा कालावधी असतो. त्या काळी त्यापैकी सहा महिने ग्रामीण भागात राहायला लागायचे. मी पुणे जिल्ह्यातील एका खेड्यात माझे ग्रामीण प्रशिक्षण पूर्ण केले. त्या वास्तव्याच्या अनुभवावर आधारित मी प्रस्तुत लेख लिहिला. तो नंतर कॉलेजच्या वार्षिकात प्रसिद्ध झाला. यंदा त्या प्रथम लेखनाने चाळीशीत पदार्पण केले आहे. त्यानिमित्त तो लेख जसाच्या तसा इथे प्रकाशित करीत आहे.

पुणे मिपाकट्टा सप्टेंबर २०२२ वृत्तांत: मिपाकट्टा संपन्न झाला

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 17/09/2022 21:48 या दिवशी प्रकाशित केले.
आज दिनांक : १७ सप्टेंबर, शनिवार रोजी सकाळी १० ते दु. २ च्या दरम्यान ठिकाण पाताळेश्वर लेणी, जंगली महाराज मंदिराशेजारी, जंगली महाराज रोड, शिवाजी नगर, पुणे - 411005 येथे अत्यंत उत्साहात साजरा झाला. एकूण सतरा (१७) मिपाकर, मिपा मालकांसहीत उपस्थित होते. त्यांची नावे खालील प्रमाणे आहेत.

गडकरींनी पुण्यात केले 'हे' वक्तव्य... खड्ड्यात वाहन गेले की...

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 14/09/2022 14:08 या दिवशी प्रकाशित केले.
पुणे वार्ताहर: दि. १४ सप्टेंबर. रस्त्यातील असलेले खड्डे दुरुस्ती करणे किंवा त्या जागी नवे रस्ते करणे सरकारला लगेचच अशक्य आहे. भारतावर चीन ने राज्य केले तरच ते शक्य आहे. अशा परिस्थितीत रस्त्यांत असलेले खड्डेच वाहनचालकांच्या मदतीस येतील, कारण असल्या खड्ड्यांतूनच वीजनिर्मिती भविष्यात करू अशी घोषणा रस्ते वाहतूक मंत्री श्री. गडकरी यांनी काल पुण्यात केली. गणपती विसर्जन झाल्यानंतर आलेल्या पावसाच्या पुराची पाहणी पुण्यात केल्यानंतरच्या पत्रकार परिषदेत बोलत होते. ही परिषद रात्री ११ वाजता शासकीय विश्रामगृहात झाली. गडकरी पुढे म्हणाले की, रस्त्यांवरील खड्डे हे आपले मित्रच आहेत. त्यांना वैरी संबोधू नका.

मानसिक आरोग्य जागरूकतेसाठी सोलो सायकलिंग

लेखक मार्गी यांनी शनिवार, 10/09/2022 17:00 या दिवशी प्रकाशित केले.
4 राज्ये, 1500 किमी- २० दिवस- सिंधूदुर्ग- गोवा- बेळगांवी- कलबुर्गी- हैद्राबाद- वारंगल- गडचिरोली- नागपूर नमस्कार. आपण ठीक आहात अशी आशा करतो. सध्याच्या काळात मानसिक आरोग्य, हा अतिशय महत्त्वाचा विषय झाला आहे. अनेकदा आपण बघतो की, लोक अतिशय क्षुल्लक कारणाने आत्महत्या करताना दिसतात (वस्तुत: कोणतंही मोठं सांगितलं जाणारं कारण हे एवढी मोठी गोष्ट करण्यासाठी नेहमीच किरकोळ असतं). कोरोना आणि आर्थिक संकटाच्या काळानंतर मानसिक आरोग्य, तणाव व्यवस्थापन आणि सकारात्मक मानसिक आरोग्य ह्या अतिशय महत्त्वाच्या बाबी झाल्या आहेत. त्यामुळे हा विषय आपण सर्वांचा आहे.

अनंत चतुर्दशी

लेखक कर्नलतपस्वी यांनी शुक्रवार, 09/09/2022 23:32 या दिवशी प्रकाशित केले.
आज अनंत चतुर्दशी.दूरदर्शनवर गणपती विसर्जन व मिरवणुकीची दृश्ये दाखवत होते.लालबागचा राजा,कसबा गणपती, नागपूरचा राजा,कधी नाशिक कधी नागपूर शहरातली दृश्ये ,जणू दूरदर्शन संजय आणी मी धृतराष्ट्र. जसे वय वाढते तसे येणारा प्रत्येक दिवस भूतकाळात जरूर घेऊन जातो. तसाच आजचा दिवस सुद्धा.... एक दोन तीन चार .... माणिक मोती बडे हुशार.... आमच्या लहानपणीच्या गणेशोत्सवाची दृश्ये डोळ्यासमोर तरळून गेली. तेव्हा ना दूरदर्शन होते ना विज.

प्रिय गणराया

लेखक अनुस्वार यांनी शुक्रवार, 09/09/2022 18:39 या दिवशी प्रकाशित केले.
आज चाललास...? नाही बोलावलं तरी पुढच्या वर्षी तू येशीलच... आम्हीच आणू, त्यात काय एवढं? तसा तू 'सेलिब्रिटी'! तू येणार म्हणून कोण काय आणि काय नाही करत हे मी तुला सांगायची गरज नाही. तू चौसष्ट कलांचा अधिपती असला तरी मला तुझी पासष्टावी कला- सोशिकतेचं- भारी कौतुक वाटतं. तुला देवळाच्या गाभाऱ्यात कैद करून ठेवणारे आम्हीच असलो तरी आमचे शिर शेवटी तुझ्या समोरच झुकणार. काही चूक झाली तर कधी वर पाहून, कधी कानाला हात लावून तर कधी आई-बापाकडे पाहून तुच आठवतो.

रस्ते अपघातातील मृतांना श्रध्दांजली

लेखक Trump यांनी सोमवार, 05/09/2022 00:25 या दिवशी प्रकाशित केले.
रस्ते अपघातातील मृतांना श्रध्दांजली. -- आज श्री सायरस मिस्त्री मरण पावले. भारताच्या प्रगतीला हातभार लावणारा कोणीही मनुष्य असा टाळण्याजोग्या अपघातात मृत्यु पावला की भयंकर वेदना होतात. एक माणुस घडवायला ३० - ३५ वर्षे लागतात. अशी उमेदीत माणसे सोडुन गेली की आपले नशीब कसले कपाळकरंटे आणि अजुन किती भोग भारतमातेच्या नशीबात आहेत त्याची जाणीव घ्यायला आपला आवाका कमी पडतो. आपण भारतीय किती नालायक आहोत याची भयंकर सल मनाला लागुन जाते. असली विषण्णता लवकर मनातुन जात नाही. ह्या यादीत श्री विनायक मेटे, श्री वांजळे, श्री भक्ती बर्वे इ. अशी कितीतरी नावे टाकता येतील.

चक्रव्युह....

लेखक कर्नलतपस्वी यांनी शुक्रवार, 02/09/2022 20:53 या दिवशी प्रकाशित केले.
ही कुठली वसुंधरा ही तर मयसभा जागो जागी इथे छ्द्मवेषी उभा सापळे इथे माणसाचे माणसाला पकडावया वैखरीतून पेरती मोहाचे दाणे सावज घेरावया अठरा औक्षहिणी सेना यांची,चक्रव्युह मांडला घेरूनी महारथीनी वीर अभिमन्यू कोडंला जाहला रक्तबंबाळ परी ओटिपी अस्त्र न सोडले कपटींनी कपट करून भ्रमणध्वनीतुन चोरले भेदिले शुन्यमंडळा, रिता केला भाता अभिमन्युचा राहीला न वाली कोणी राहीला न भ्राता..... २-९-२०२२
काव्यरस