Skip to main content

ठेचेचा दगड

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 19/03/2022 10:05 या दिवशी प्रकाशित केले.
दगडाची ठेच लागता रक्त येई पायात कशास होता पडला दगड असा रस्त्यात कितीतरी असे अडले असती ठेच लागून पडले असती परी न कुणी विचार करती फेकून द्यावा तो दगड कुठती असाच आला वेडा कुणी खाली वाकला तो झणी उचलूनी दगड तो पायी लांबवर कुठे फेकूनी देयी - पाषाणभेद १९/०३/२०२२
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 817
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया