विजय आणि भूक (शतशब्दकथा)
(मि पा वर लिहिण्याची ही पहिलीच वेळ आहे. जुन्याजाणत्या मि पा करांनी सांभाळून घेणे. चू भू दे णे )
या वर्षीच्या नागपंचमीला आमच्या "वनमित्र" संघटनेच्या आंदोलनात जवळपास ५० नागांना गारुड्यांच्या तावडीतून जंगलात सोडलं.पोलिसांचीही लगेच मदत मिळाली आणि तत्पर कारवाई करून १२ गारुड्यांना तुरूंगात टाकलं. आधीच मिडिआला फोन केल्यामुळे, "अध्यक्ष" या नात्याने मी आंदोलनचे यश प्रेस कॉन्फरन्स मध्ये विजयी मुद्रेने मांडले. घरी आलो. आजीशी बोलतांना तिने विचारलं "नागांना रानात सोडलं,चांगलच केलं. पण गारूड्यांना तुरूंगात का डांबल?"
" अगं आजी, कायदाच आहे तसा" "ते काही मला कळत नाही सोन्या !
मिसळपाव