Skip to main content

समाज

शेतकऱ्याचा खरा मित्र – सचिन तेंडुलकर

लेखक रामबाण यांनी शनिवार, 16/11/2013 15:37 या दिवशी प्रकाशित केले.
निवृत्ती जाहीर केल्यापासून सचिन तेंडुलकर अस्वस्थ होता… त्याची अनेक कारणं.. काही आम्हाला कळली.. काहींचा अंदाज… दोनशेवी कसोटी, घरचं मैदान.. पहिल्या दिवशी सचिन खेळलाही मस्त.. ३८ धावांवर नाबाद.. दुसऱ्या दिवशी शतक पक्कं..

अद्भुत आविष्कार (१): कपारीतील दगडाची चालणारी गाय

लेखक सुज्ञ माणुस यांनी गुरुवार, 14/11/2013 11:01 या दिवशी प्रकाशित केले.
अद्भुत आविष्कार अद्भुत आविष्कार (१): कपारीतील दगडाची चालणारी गाय "कपारीतील दगडाची चालणारी गाय" अश्या नावावरून काहीच संदर्भ लागत नाही ना? मलाही नाही. अगदी याची देही याची डोळा पाहून आलो असलो तरीही नाही. मग असे नाव का? कारण 'सूरदास' म्हणाला म्हणून. "दगडाचा पुतळा दरवर्षी काही गव्हाचे दाणे इतके अंतर पुढे सरकतो" - खरे वाटत नाही ना? मलाही नाही. पण खोटे ठरवायला कारण पण नाही माझ्याकडे. आता हा सूरदास कोण? कसला गायीचा पुतळा ? काय गव्हाचे दाणे ? मागील वर्षी, पावसाळ्याच्या सुरवातीलाच 'धोडप' किल्ला बेत झाला.

नवे व्यवसाय

लेखक नरेंद्र गोळे यांनी गुरुवार, 14/11/2013 10:04 या दिवशी प्रकाशित केले.
शेठ वालचंद हिराचंद ह्यांच्या वडिलोपार्जित बिडी व्यवसायातून, ते वडिलांशी भांडून, निर्धाराने बाहेर पडले आणि साखर उद्योगाची पायाभरणी केली. का? तर समाजविघातक व्यवसायांनी स्वतःचे पोट भरणे त्यांना मंजूर नव्हते. साखरेचा व्यवसाय, त्याकाळी त्यांना समाजोद्धारक वाटला होता. आज; साखर, मीठ, तेल, तूप इत्यादी संहत पदार्थांचा आरोग्यरक्षणातील अपूर्व अडथळा पाहता; साखर व्यवसाय समाजास कितपत हितकर आहे, ह्याविषयीच प्रश्नचिन्ह उभे राहिलेले आहे.

आनंद - कार्लसन - डाव २

लेखक चतुरंग यांनी रविवार, 10/11/2013 15:29 या दिवशी प्रकाशित केले.
माफ करा मंडळी, यायला उशीर झाला. आज झोपेनं दगा दिला आणि वाजलेल्या गजरावर मात केली! असो डावाकडे वळतो. बाप रे यावेळी डावाने केवळ १५ मिनिटात भन्नाट प्रगती केली आहे.

आहे मी ब्राह्मण!! मग??

लेखक वडापाव यांनी शनिवार, 09/11/2013 16:34 या दिवशी प्रकाशित केले.
आठवीनंतरच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत कोकणात गेलो होतो. तिकडे एका मित्राबरोबर पैज लाऊन सात वाट्या ताक प्यायलो होतो (तेव्हाची कॅपॅसिटी तेवढीच होती). आम्हांला ताक वाढणा-या मावशींनी सहाव्यांदा वाटीत ताक ओतताना 'तुझी जात कोणती रे?' असं हळूच विचारलं. "ब्राह्मण!!" "वाटलंच मला!" असं हसत म्हटलं आणि निघून गेल्या. सातव्यांदा ताक ओतताना, "राग नाही ना आला?" असं विचारलं आणि मी "नाही, राग का येईल?" असं म्हटल्यावर पुन्हा हसत हसत निघून गेल्या. नवीन नवीन मैत्री झालेल्या मित्रमंडळात मी एक गोष्ट नेहमी पाहिलीये.

आनंद - कार्लसन सामना - डाव १

लेखक चतुरंग यांनी शनिवार, 09/11/2013 14:59 या दिवशी प्रकाशित केले.
शनिवार, दि, ९ नोवेंबर २०१३ आज बुद्धीबळ विश्वविजेतेपदाचा पहिला सामना सुरु होतोय. प्रचंड प्रसिद्धी मिळालेल्या या शतकातल्या सामन्याला सुरुवात होते आहे. चला आस्वाद घेऊयात! कार्लसन येऊन बसलाय आनंद अजून आलेला नाही. एकच मिनिट राहिलं आहे.

हरवलेला विद्यर्थ

लेखक वेल्लाभट यांनी सोमवार, 04/11/2013 16:44 या दिवशी प्रकाशित केले.
आपण रोज किती व्यक्तींना भेटतो; नव्या, जुन्या, नको, हव्या, अनोळखी, ओळखीच्या. कितींशी बोलतो, हसतो, काही देतो, घेतो. या प्रत्येकाच्या मनावर आपला ठसा, आपली ओळख कोरली जाते ते आपल्या वागण्यातून. त्या व्यक्तीचं आपल्याबद्दलचं मत, त्याच्या मनात आपली प्रतिमा, आपल्याबद्दल त्याचे विचार वर आपल्याशी त्याचं पुढचं प्रत्येक वागणं; हे आपण त्याच्याशी कसे वागलो, वागतो, यावरून ठरत जातं. आणि हे सूत्र व्यक्ती, तिचा सामाजिक दर्जा, तिची आर्थिक पत, जात, कुळ, धर्म, या सगळ्या गोष्टींपासून अबाधित आहे. आम्ही एक दिवस ऑफिसच्या कॅंटीनमधे जेवायला बसलो होतो. ‘मामा प्लेट लाना’, बाजूच्या टेबल वरील एका व्यक्तीने ऑर्डर सोडली.

सांगा, कसे केलेत तुम्ही हे सर्व ? … आणि मिळवा एक चित्र.

लेखक चित्रगुप्त यांनी रविवार, 03/11/2013 20:42 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी, यंदाच्या मिपाच्या दिवाळी अंकातली एक कथा तुम्ही वाचली असेल, त्यातील कथानायक 'मदनकेतु' याच्यावर श्रीकृष्णाने एक महत्वाची जबाबदारी टाकली होती. ती म्हणजे नरकासुराच्या वधानंतर मुक्त केलेल्या सोळा हजार एकशे आठ स्त्रियांना प्राग्जोतिष्पुराहून द्वारकेपर्यंत सुखरूपपणे घेऊन जाणे. याबद्दल मदनकेतु म्हणतो: "... एवढ्या हजारो स्त्रियांना आणि त्यांच्या मुलांना घेऊन द्वारकेपर्यंतचे शेकडो योजने अंतर कसे पार करणार? एवढा मोठा जथा पायी चालून जाणार म्हणजे किती दिवस लागतील? वाटेत रानटी पशु किंवा रानटी लोकांच्या टोळ्या यांच्यापासून संरक्षण कसे करायचे ?

आली सुमधूर संमोहक दिवाळी

लेखक निमिष सोनार यांनी शनिवार, 02/11/2013 11:28 या दिवशी प्रकाशित केले.
ती पहा आली सुमधूर संमोहक दिवाळी... दूर करून अंधार कृष्णछायेच्या कपाळी ! आशा घेऊन अश्विन सुमंगल सकाळी !! घेऊनी सोनप्रकाश ओजस्वी आश्वासक ओंजळी ! लख्ख करण्यास अनंत आकाशगंगेच्या ओळी !! ती पहा आली सुमधूर संमोहक दिवाळी... समग्र संकट समूळ सारीत ! सर्वसमावेशक सण सोहळा सुशोभित !! अंधार होऊनी निसंशय पराजित ! प्रकाश येऊनी मनात विराजीत !!

दिवाळीचे विष्णूपूजन !

लेखक जे.पी.मॉर्गन यांनी शुक्रवार, 01/11/2013 16:30 या दिवशी प्रकाशित केले.
आली दिवाळी ! आपण नेहेमीप्रमाणेच लक्ष्मीपूजन करणार. तसेही आपण एरवी लक्ष्मीचीच पूजा-अर्चना करत असतोच. लहानपणापासून ह्या ना त्या स्वरूपात आपलं लक्ष्मीपूजन सुरूच असतं. बालपणी आपण परीक्षेतल्या मार्क्सरूपी लक्ष्मीच्या मागे धावतो. मग चांगल्या कॉलेजच्या, मग नोकरी, प्रमोशन, चांगला जोडीदार, चारचाकी गाडी, ३ बीएचके फ्लॅट, मुलांसाठी प्रतिष्ठित शाळा, सेकंड होम... ही यादी न संपणारीच असते. पण म्हणतात ना... लक्ष्मी चंचल असते. तिच्या मागे लागणार्‍याच्या हातात ती कधीच सापडत नाही. मग लक्ष्मी असते कुठे? लक्ष्मी असते भगवान विष्णूच्या चरणांशी.