कृष्णलीला..

किसन शिंदे जे न देखे रवी...
कुठे दोन-चार स्पीकर्स तर कुठे दहा फुटांच्या डॉल्बीच्या अजस्त्र भिंती.. कुठे पाच-दहा हजाराचं शुल्लक बक्षीस तर कुठे एक कोटीचं.. कुठे भगव्या टि-शर्टमधल्या कार्यकर्त्यांचा घोळका तर कुठे पांढर्‍या... कुठे गोविंदा रे गोपाळा तर कुठे मच गया शोर सारी नगरी रे.. कुठे चार-पाच थरांचा तर कुठे विश्वविक्रमाशी बरोबरी करणार्‍या नऊ-दहा थरांचा थरार.. कुठे हाता-पायावर निभावतं तर कुठे जिवाशी जातं.. कुठे मानाची तर कुठे जगातली सर्वात मोठी.. कुठे हिंदी तारे-तारका तर कुठे मराठी.. कुठे लावणीतलं या रावजी तर कुठे हिंदीतलं चिकनी चमेली.. उत्तराखंडमधली मोठ्ठी नैसर्गिक आपत्ती..पुरोगामी महाराष्ट्राला हादरवणारी दाभोळकरांची हत्या..सीमेवर झालेली जवानांची क्रुर हत्या..रूपयाची आर्थिक हेळसांड.. हे सगळं विसरून २१ व्या शतकातला मॉर्डन कान्हा सज्ज झालाय कोट्यावधीचे लोणी खायला! कदाचित हेच सगळं अपेक्षित असावं त्या सावळ्या घनःश्यामाला!!

10 टिप्पण्या 2,174 दृश्ये

Comments

अग्निकोल्हा नवीन

सज्ज न होण अनपेक्षित कोणाला आहे ?

मिसळलेला काव्यप्रेमी नवीन

द्येवा, सुरवात तर छानचं. अश्याच अजुन कविता येऊ द्या :)

प्रचेतस नवीन

सुरेख कविता रे. बाकी हा दहीहंडी फोडणारा निरागस कान्हा खास तुमच्यासाठी द्येवा. a