Skip to main content

समाज

(छोटीशी का होईना) फसवणूक.. ईशारा.

लेखक सचिन कुलकर्णी यांनी शनिवार, 01/06/2013 10:14 या दिवशी प्रकाशित केले.
काल अलिबागहून परतताना पेण पनवेल दरम्यान (गोवा महामार्गावर) एक कामत चे हॉटेल आहे. तिथे मगनलाल चिक्कीचे दुकान आहे. तिथून Assorted Dryfruit चिक्कीचा box १७५ रुपयांना घेतला (Dryfruit म्हणून इतका महाग). घरी येउन पुडा फोडला तर फक्त एक ३"x २" चा एक तुकडा dryfruit चिक्कीचा. बाकी मोठे तुकडे खोबऱा चिक्की आणि शेंगदाणा चिक्कीचे. इतका संताप झाला जीवाचा फसवणुकीच्या भावनेमुळे … %&^*($. कोणी गेलाच त्या दुकानात तर कृपया तुमच्या भावाची हि हकीकत सांगून दोन शब्द बोलून घ्या xxला आणि तुमचा माल घेताना पारखून घ्या हे वेगळे सांगणे न लागे . . As much as possible please avoid this shop. For Everyone's Information.

श्रावण मोडक स्मृती : एकत्र जमुया!

लेखक बिपिन कार्यकर्ते यांनी शुक्रवार, 31/05/2013 19:13 या दिवशी प्रकाशित केले.
(हे असलं कधी श्रावणच्या संदर्भात लिहीन याची कल्पनाही केली नव्हती! :( ) *** श्रावण गेला. सत्य बलवान असते आणि ते स्वीकारणे भागच असते. गेल्या काही वर्षात तो सगळ्यांनाच माहित झाला. पण तो त्या ओळखीच्याही बाहेर खूप होता. किंबहुना, त्याच्यासारखा हरहुन्नरी, चतुरस्त्र, लोकसंग्रह असणारा माणूस असा कोणत्याही एका पैलूत सामावू शकत नाही. सामाजिक कार्यकर्ता, विचारवंत, लेखक, पत्रकार, अभ्यासक, विद्यार्थी, कलाप्रेमी, साहित्यप्रेमी, माणूस, मित्र... हे सगळे आपल्याला त्याच्यात दिसत होतेच. या आपल्या मित्राचं हे बहुपेडी व्यक्तित्व साजरं करण्यासाठी आपण सगळे मिळून एक छोटासा कार्यक्रम करत आहोत.

एका गारुड्याची गोष्ट २ : विद्यार्थी बनतो सापवाला !

लेखक जॅक डनियल्स यांनी शुक्रवार, 24/05/2013 12:00 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ता पर्यंत मला लोकांनी अनेक प्रश्न "साप" या विषयावर विचारले पण सगळ्या लोकांचा आवडता प्रश्न म्हणजे "तू साप कसे काय पकडायला लागलास ?" या प्रश्नाचे उत्तर सुरवातीला मी खूप प्रामाणिक पणे द्यायचो, आणि मला खूप वेळा विचित्र (खवचट!) प्रतिक्रिया मिळायच्या. त्यामुळे नंतर नंतर लोकं बघून मी उत्तरे द्यायला शिकलो.

जय परशुराम...जय वामन!!!

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी बुधवार, 22/05/2013 18:12 या दिवशी प्रकाशित केले.
आजकाल(म्हणजे अगदी गेली ५ वर्ष सुद्धा)फेसबुकवर ब्राम्हण/ब्राम्हणेतर वादाला नुस्तं उधाण आलय.प्रत्येक जण अगदी आपापली पेजेस करण्यापासून ते ग्रुप्स तयार करण्यापर्यंत अगदी पेटलाय. मी जेंव्हा स्वतःला ब्राम्हण समाजातला घटक म्हणुन पाहातो,आणी आपल्या ऐतिहासिक चुका/घोडचुका तसेच आपल्या समाजबांधवाचे/भगिनिंचे त्याच चुकांची पुनरावृत्ती करणारे वर्तन पाहतो.तेंव्हा मला मोठी गंमत वाटते.आपल्या धर्मातल्या अन्यायी भुमिका/वर्ण श्रेष्ठत्वाचे अहंकार...इत्यादी अनेक गोष्टी आहेत.त्या पाहायच्या नाहीत.समजुनही घ्यायच्या नाहीत. केवळ विरोधकांना नामोहरम करणारी आत्मप्रौढीकडे झुकणारी खंडन/मंडन प्रक्रीया चालु ठेवायची.
काव्यरस

भारतीय भोंगाशास्त्र !

लेखक ब़जरबट्टू यांनी बुधवार, 22/05/2013 16:46 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी, मिपावर पहिल्यादाच लिहायचे धाडस करतोय. सर्व जेष्ठ, श्रेष्ठ जाणत्याचा कळावे लोभ असावा. विदेशवारीला भारतात आलेल्या एका जर्मन ला दिलेली ही दीक्षा आहे. म्हणजे द्यावीच लागली हो… तर मुळात हापिसच्या कामासाठी भारतात आलेला हा प्राणी. आत्ता फारिनर (त्याला काय काम सांगायचे का ?) व गोरा म्हनल्यावर काय मजा होती.राव . हिकडचे काहीही काम न करता हादडुन हाण्डी वर येणार म्हनुन सकाळी सकाळी धावायला सुरुवात करतो म्हणाला. कर बाबा म्हटले . आपल्याला तर हे काही पटत नाही. असे धावून धावून पोट कमी झाले असते तर तो रमेश पोवार असा सुजला असता का ? आणि पोहल्याने बारीक होत असते तर पाम्पलेट ला ईव्हडा भाव असता का ?

एका गारुड्याची गोष्ट १ : पुण्याचे पत्ते - माझा छंद !

लेखक जॅक डनियल्स यांनी शुक्रवार, 17/05/2013 03:54 या दिवशी प्रकाशित केले.
(मी पुण्यात असताना, सर्पोद्यानचे सहा वर्ष काम केले, तेंव्हाचे अनुभव संघटीत करून लिहित आहे. हा लेख पूर्वी (दोन वर्ष) माझ्याच कट्ट्यावर (ब्लॉग) प्रकाशित झाला होता, त्यानेच मी या अनुभवांची सुरुवात करत आहे.) आत्ता अमेरिकेमध्ये मला कोणी नवीन पुण्याचे भेटले की माझा त्यांना ठरलेला प्रश्न असतो "तुम्ही पुण्यात कुठे राहतात?" तुम्हाला वाटेल काय साधा प्रश्न आहे . पण तसं नाही. ते जेंव्हा उत्तर देतात तेंव्हा मी त्यांच्या शब्दांबरोबर पुण्याच्या रस्यावर फिरत असतो.

थोडे मर्मबंधातील ...

लेखक ढालगज भवानी यांनी सोमवार, 06/05/2013 13:09 या दिवशी प्रकाशित केले.
खरं तर थोडा बायकी विषयच. मध्यम वयाची माझी व्याख्या ही की असे वय जेव्हा पहील्यांदाच आपली आई, आपल्याला उमजू लागली आहे आणि मुलगी जी की इतका काळ अतिशय सन्निध होती ती पौगंडावस्थेत प्रवेश करती झाल्याने दुरावू लागली आहे, असे वय. आईला लहानपणी "आई" म्हणून आणि फक्त "आई" म्हणून पाहीलेले असते. बालपणी, "आईला अन्य व्यक्तीमत्वच नाही, रोल नाही" हा चश्मा डोळ्यांवरुन न काढता आल्याने असंख्य वेळा तिला समजून घेता आलेले नसते , जे की आता समजून घेता येते.

दादी के हाथों को जलता देख...

लेखक विसोबा खेचर यांनी सोमवार, 06/05/2013 11:04 या दिवशी प्रकाशित केले.
प्राध्यापक अशोक चक्रधर. हिंदीतले एक अत्यंत दिग्गज कवीवर. एक विलक्षण, बहुआयामी व्यक्तिमत्त्व..एक भाषाप्रभू, एक शब्दप्रभू..त्याचप्रमाणे एक अत्यंत मिश्किल, हसरं व्यक्तिमत्त्व. एखाद्या विनोदाला मनमुराद दाद देताना अगदी सोडावॉटरची बाटली फुटावी असं खळखळून, मनमोकळं हसणारं व्यक्तिमत्त्व..परंतु त्याचवेळी एक तेवढंच संवेदनशील व्यक्तित्व..जीवनाकडे, माणसांकडे, त्यांच्या प्रश्नांकडे तेवढ्याच संवेदनशीलतेने पाहणारं एक सहृदय व्यक्तिमत्त्व.. माझे ज्येष्ठ मित्रवर्य दिवंगत वसंत पोतदारांसोबत एकदा दिल्लीला गेलो असताना त्यांच्यामुळे मला अशोक चक्रधर या विलक्षण माणसाला भेटण्याचा योग आला..

कबुतरांची सभा

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी सोमवार, 06/05/2013 09:15 या दिवशी प्रकाशित केले.
पर्वा एका सरकारी हापिसात कामासाठी गेलो होतो आणी नेहमी प्रमाणे वाट बघत ताटकळत उभा होतो. कडेला वाटलं माणसं बोलताहेत पण कबुतरं बोलत होती कालच्या दिवसात काय काय झालं? याचे हिशेब तोलत होती पहिलं दुसर्‍याकडे पाहुन मिष्किलपणे हसत होतं आणी त्यांच्या गमती पाहुन तिसरं मधिच घुसत होतं काल म्हणे पहिल्याला आख्खं कणिस मिळलं पण दुसर्‍यानं धक्का दिला आणी ते हवेतच गळलं थोड्याच वेळात कबुतरांची भली मोठ्ठी सभा भरली आणी आज चरायला कुठं जायचं? यावरच पहिली चर्चा ठरली कुणी म्हणलं किराणा दुकान आजचा पहिला ठराव आहे धान्यात दगडं-खायचा तिथं चांगला सराव आहे. दुसरा म्हणे सरकारि गोडाऊन कशाला मोकळं सोडायचं? पण त्या बेन्
काव्यरस