(मि पा वर लिहिण्याची ही पहिलीच वेळ आहे. जुन्याजाणत्या मि पा करांनी सांभाळून घेणे. चू भू दे णे )
या वर्षीच्या नागपंचमीला आमच्या "वनमित्र" संघटनेच्या आंदोलनात जवळपास ५० नागांना गारुड्यांच्या तावडीतून जंगलात सोडलं.पोलिसांचीही लगेच मदत मिळाली आणि तत्पर कारवाई करून १२ गारुड्यांना तुरूंगात टाकलं. आधीच मिडिआला फोन केल्यामुळे, "अध्यक्ष" या नात्याने मी आंदोलनचे यश प्रेस कॉन्फरन्स मध्ये विजयी मुद्रेने मांडले. घरी आलो. आजीशी बोलतांना तिने विचारलं "नागांना रानात सोडलं,चांगलच केलं. पण गारूड्यांना तुरूंगात का डांबल?"
" अगं आजी, कायदाच आहे तसा" "ते काही मला कळत नाही सोन्या ! पण त्या गारूड्यांची मुलं आज बापाची वाट पाहत उपाशी झोपतील रे..." आजीच्या पाणावलेल्या डोळ्यांकडे पाहून मी अन्तर्मुख झालो.
वाचने
3393
प्रतिक्रिया
22
मिसळपाव
प्रतिक्रिया
आय अॅग्री!
धन्यवाद!!
In reply to आय अॅग्री! by संजय क्षीरसागर
जमलय
चांगला प्रयत्न!!
आवडली.
आवडली.
सध्याच्या अवस्थेबद्दल चपखल संदेश देणारी सुंदर कथा !
+१
In reply to सध्याच्या अवस्थेबद्दल चपखल संदेश देणारी सुंदर कथा ! by डॉ सुहास म्हात्रे
+७८६
In reply to सध्याच्या अवस्थेबद्दल चपखल संदेश देणारी सुंदर कथा ! by डॉ सुहास म्हात्रे
आवडली.
खरे आहे आजीचे.
छान लिवलय!
छोटिशी
छान!
पण गारूड्यांना तुरूंगात का
कारण
In reply to पण गारूड्यांना तुरूंगात का by arunjoshi123
अपुर्ण बोध देणारी ट्विट.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
In reply to अपुर्ण बोध देणारी ट्विट. by अग्निकोल्हा
छान! पुढील लेखनासाठी शुभेच्छा
धन्यवाद!!
आज्जीने एका वाक्यातच सगळा
पुढील लेखनासाठी शुभेच्छा