मोर पंखी कावळा

विवेकपटाईत जे न देखे रवी...
एक काळा कावळा, मोरांच्या देशी गेला. मोर पंखी ‘बपतिस्मा’, लाऊन घरी परतला. ‘श्रेष्ठत्वाची’ जाणीव, त्याला आता झाली. पोरांसाठी वेगळी, ‘संस्कृती’ शाळा बांधली. जेवणाची सोय ही, त्याने वेगळी केली. पाण्याची विहीर आता, कालबाह्य होती. ‘त्यागण्या’ साठी बांधले, टॅायलेट चकाकी. सुगंधित लहारदार, कोक पेक्षा स्वादिष्ट आवडत होते त्याला, त्याचेच शिवाम्बू कुणा शुद्राच्या घामाच्या, दुर्गंधी कसे झाले? मोरपंखी कावळ्याची, इनसल्ट कोणी केली? तुज्याच पूर्वजाने, केली होती विहीर अशुद्ध. तोडले होते तेंव्हा, त्याचे हात नी पाय. कावळ्या वर ही करू, अनुशास्नात्मक कार्यवाही. वाळीत त्याला टाकू, तबाह करू करिअर. काळ बदलला, मुखौटे बदलले रूप बदलूनी, मोरपंख लाविले मानसिकता मात्र, बदलली नाही. उच्चाधिकारी झाले, कालचे ब्राम्हण.
वर्गीकरण
लेखनविषय:
काव्यरस

2 टिप्पण्या 1,344 दृश्ये
शेअर करा: 📱 WhatsApp

Comments

विवेकपटाईत नवीन

सत्या पासून आपण पळू शकत नाही. ... कालचे सत्य आज मुखौटे बदलून अधिकारी वर्ग त्याच मानसिकतेचच कित्ता गिरवीत आहे. दिल्लीतल्या गेल्या तीन-चार वर्षात सर्व सरकारी कार्यालयांत अधिकार्यांनी आपल्या साठी टायलेट वेगळे केले. ३० वर्ष आधी जेंव्हा मी नौकरी सुरु केली होती असे नव्हते. हे सर्व बदल प्लांनिंग कमिशन ज्या टायलेट' बातमी आल्यानंतरच सुरु झाले आहे. दरवाजे उघडण्यासाठी स्मार्ट कार्ड ही वापरले जातात जेणेकरून अन्य कर्मचारी त्याचा वापर करू नये. आधीच इमारतीत टायलेट कमी आणि त्यात अशी मानसिकता. कर्मचार्यांना किती त्रास होत असेल त्याचा विचार करावा... कवितेचा हेतू समजला तर कुणाची भावना दुखवणार नाही. ( मी ही जन्माने ब्राह्मण आहे, आज मी त्यांचे टायलेट वापरू शकत नाही, माझ्या भावना दुखावल्या गेल्या तर तर त्या कालच्या विहिरीच्या पाणी न पिऊ शकणार्या शूद्राला काय वाटत असेल.याचा ही विचार करावा.) आज आपण स्वतंत्र आणि समानतेच्या सिद्धांतानुसार जगणाऱ्या देशात राहतो आहे कि पुन्हा त्या काळ्या मध्ययुगात जाणार आहो.