Skip to main content

समाज

( चला नांगरूया शेत सारे )

लेखक मोदक यांनी मंगळवार, 15/10/2013 15:49 या दिवशी प्रकाशित केले.
आमचे लाडके लोककवी हभप श्री धनाजीराव यांच्या काव्यजीवनातील चरणकमलांचे तंतोतंत अनुकरण करण्याच्या आमच्या छोट्या प्रयत्नांचे हे पुढचे पाऊल. चल परत नव्याने सुरू करू सारे या काव्यातून पेरणीचा मनोदय व्यक्त करणार्‍या धनाजीरावांनी नांगरणीवर काहीच भाष्य केले नसल्याने धनाजीरावांच्या गोधडीला ठिगळ लावण्याचा हा प्रयत्न गोड मानून घ्यावा.. *************************************************** बाई पाटाला आलंय पाणी वाफ्यात कुदळ मारुन घे वरच्या अंगाची दोन मोठी ढेकळं माझ्या मोंगर

दुर्गे दुर्घट भारी... एक विचार.

लेखक प्यारे१ यांनी शुक्रवार, 11/10/2013 03:45 या दिवशी प्रकाशित केले.
गणेश विसर्जन झालं की पितृपक्ष येतो. तो संपला की लगेच प्रतिपदेला घटस्थापना होते नि आपण देवीची उपासना सुरु करतो. देवीच्या उपासनेची सुरुवात कधी झाली, का झाली, कशी झाली ह्याबाबत मला माहिती नाही. इतिहासकारांचा विषय आहे तो. असो. पुराणांमध्ये कुठंतरी सांगितल्याप्रमाणं महिषासुर नावाचा राक्षस प्रचंड मातला होता नि त्यानं सगळ्यांना त्रास द्यायला सुरुवात केली.

माझी फिल्म …

लेखक सुधीर मुतालीक यांनी मंगळवार, 08/10/2013 17:59 या दिवशी प्रकाशित केले.
यस आय'म द चेंज नामक एका राष्ट्रीय फिल्म समारोहासाठी माझा "Dreams Matter" हा लघुपट निवडला गेला होता आणि आज तो मुंबई मध्ये दाखविला गेला. विषय दिल्यावर १०१ तासात फिल्म बनवायची आणि तीही पाच मिनिटा पेक्षा कमी वेळाची अशी बंधने होती. मला विषय दिला होता : People with Special Needs. इथे फिल्म दिली आहे. हा माझा पहिलाच प्रयत्न आहे. संकल्पना, संपादन, चित्रीकरण मी एकट्यानेच केले.

हिरा २

लेखक साऊ यांनी गुरुवार, 03/10/2013 04:07 या दिवशी प्रकाशित केले.
आणि मग, कुतुहल जागृत झालेली मी प्रत्येक तपशिल एखादा निसटता संदर्भ शोधायला लागले. आऊ ज्या घरात रहायची ते तिच सासर होतं. दोन भाऊ आणि एक म्हातारी आई. आऊची सासु ही आऊची सख्खी आत्या! आऊच्या भाषेत तिच्या सख्ख्या आत्यान तिचा गळा कापला होता! मामेआते भावंडाची लग्नं काही फार जगावेगळी नाही आहेत. तसच आऊला वयाच्या १२-१३व्या वर्षी लग्न करुन आणल गेल. नावासारखाच 'दगड' असलेल्या तिच्या मोठ्या आतेभावाला पुरुषाचे कपडे घालुन त्याच नसलेल पुरुषपण सिद्ध केल गेल.

हिरा १

लेखक साऊ यांनी बुधवार, 02/10/2013 09:23 या दिवशी प्रकाशित केले.
दुपट्यातल्या तिला, पाळण्यात घालताना काय विचार करुन तिचं नाव ठेवल गेल असेल देव जाणे, पण त्या नावासारखे तिला अनेक पैलु होते, हे मात्र खरं आणि तो प्रत्येक पैलु पडताना होणार्‍या वेदनाही होत्या. कधीतरी धुसर बाळपणात, पप्पांच्या माग लागुन शेतावर जाताना, पप्पांनी मध्येच गल्लित थांबुन "हिराबाई, जरा ताईंना बोलवा" अस हाकारलं आणि त्या दगडी जोत्याच्या घरातुन 'आऊ' बाहेर आली. तेंव्हा मी तिला फारस निरखलं नसाव, कारण आठवतय ते फक्त तिच्या अंधार्‍या घरातल्या खिडकीत बसुन खाल्लेला गुळ अन त्या चुलीच्या प्रकाशात चमकणारी तिच्या नाकातली मोरनी! "या आऊ!" अस पप्पा तिला थोडस आदराने बोलवत.

राजीव पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली

लेखक एच्टूओ यांनी सोमवार, 30/09/2013 17:56 या दिवशी प्रकाशित केले.
राष्ट्रीय पुरस्कार विजेते सिनेदिग्दर्शक राजीव पाटील यांचे आज, सोमवारी मुंबईत हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन !!! अतिशय धक्कादायक बातमी!! एका वेगळ्या वाटेवरच्या कलाकाराच्या जाण्यामुळे होणारे नुकसान भरुन निघण्यासारखे नाही. असा कलाकार पुन्हा होणे नाही. भावपूर्ण श्रद्धांजली!!

टाईम पास

लेखक विश्वास कल्याणकर यांनी सोमवार, 30/09/2013 12:14 या दिवशी प्रकाशित केले.
टाईम पास आपल्याला आपल्या सभोवती असे बरेच लोक दिसतात ज्यांना "काय कस काय" असे विचारल्यास " काही नाही यार कसातरी टाईम पास सुरु आहे. वेळच जात नाही, बोअर होते. काय करावे कळत नाही, कुठे जावे, कसेबसे दिवस ढकलणे सुरु आहे." असे उत्तर मिळते. याचा अर्थ त्यांच्या साठी वेळ कसा घालवावा हीच मोठी समस्या आहे. मग अशावेळी हे लोक पत्ते कुटत बसतात, मोबाईल वर गाणे ऐकत बसतात किंवा गेम्स खेळत बसतात. तासन तास टि.व्ही बघत बसतात किंवा चार लोक जमवुन कट्टयावर गप्पा छाटत बसतात. किंवा कुणाच्या घरी जावुन तिथे गप्पा मारतात. किंवा फालतु आणि निरर्थक गोष्टींमध्ये वेळ घालवतात.

सैतानाचा आरसा - शतशब्दकथा

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी सोमवार, 23/09/2013 14:27 या दिवशी प्रकाशित केले.
मी एखाद्या पिसाटा सारखा बेफाम धावत होतो. पुढे ती जीवाच्या आकांताने सैरावैरा पळात होती. माझ्या नजरेत विखार होता. तिला मी रोज पहायचो. आज तिला सोडायचे नाही असा निर्धारच मी केला होता. रडत, धडपडत, अडखळत, भेलकांडत धावताना ती मदतीसाठी केविलवाणे किंचाळत होती. एका क्षणी मी अगदी जवळ पोचून निर्दयपणे तिची ओढणी खेचली. ती घाबरुन अजूनच जोरात धावायला लागली. तिच्याकडे पहात धावताना मी एका दगडाला अडखळलो, तेवढ्यात ती एका बंगल्यात घूसली. गेट लावायची तिची धडपड सुरु असतानाच मी तिथे पोचलो आणि चवताळून त्या दिशेने झेप टाकली. तिने धाडकन गेट बंद केले.

अडगळीतल्या आठवणींचा पसारा.. (४)

लेखक शिवोऽहम् यांनी शनिवार, 21/09/2013 01:35 या दिवशी प्रकाशित केले.
अडगळीतल्या आठवणींचा पसारा.. (३) The evil that men do lives after them The good is oft interred with their bones.. फ्रंटलाईन् हे कडव्या डाव्या गटातले पाक्षिक, हिंदु समुहाचं. सरकारी पॉईंट्-ऑफ-व्ह्युपेक्षा वेगळं, अगदी १८० अंश विरुद्ध. मातब्बर लेखक मंडळी. एन् राम, असघर अली इंजिनिअर, नूरानी ही नावं आठवतात. त्यावेळी प्रवीण स्वामी, जयती घोष, चित्रा सुब्रह्मण्यम हे तरूण रक्ताचे पत्रकार उमेदवारी करत होते तिथे. नंबुद्रीपादही लिहीत असत कधीतरी. डेन्स मॅटर असे. चित्रेही असत. मद्रास रबर फॅक्टरीच्या, टी. व्ही.