Skip to main content

समाज

सुभद्रा: महाभारताची 'हेलन ऑफ ट्रॉय' (भाग २)

लेखक चित्रगुप्त यांनी शनिवार, 03/08/2013 10:50 या दिवशी प्रकाशित केले.
सुभद्रा: महाभारताची 'हेलन ऑफ ट्रॉय' (भाग १) http://www.misalpav.com/node/25292 ------------------------------------------------------------------------------- ४. अभीराणी उवाच : अभीरमन्युशी माझं लग्न झाल्यावर त्यानं माझं आधीचं 'शतगोणी' हे नाव बदलून 'अभीराणी ' ठेवलं.

सुभद्रा: महाभारताची 'हेलन ऑफ ट्रॉय' (भाग १)

लेखक चित्रगुप्त यांनी रविवार, 28/07/2013 17:50 या दिवशी प्रकाशित केले.
सुभद्रा: महाभारताची 'हेलन ऑफ ट्रोय' (भाग १) अर्जुनाने केलेल्या ‘सुभद्राहरणा’तून सरतेशेवटी अर्जुनाचा दारूण पराभव आणि यादवांचा सर्वनाश कसा घडून आला, याची ही कथा: ------------------------------------------------------------------------ १. अभिरमन्यु उवाच: सुभद्रेला त्या नराधमापासून झालेल्या बाळाचे नाव ‘अभिमन्यु’ ठेवल्याचे कळले, तेंव्हा मी थोडासा सुखावलो खरा, पण ते क्षणभरच. त्या नराधमाविषयीचा माझा संताप लगेचच उफाळून आला, आणि माझी प्रतिज्ञा आणखीनच बळकट झाली. … माझी प्रिय सुभद्रा. माझी बालसखी.

वांग मराठवाडी... आता परीक्षा सरकारची!

लेखक बिपिन कार्यकर्ते यांनी सोमवार, 22/07/2013 21:03 या दिवशी प्रकाशित केले.
साधारण वर्षभरापूर्वी वांग मराठवाडी धरणग्रस्तांच्या संघर्षाबद्दल लिहिले होते. त्या नंतर बरंच काही घडून गेलं आहे. आणि अजूनही काही ना काही घडत आहे. गेल्या वर्षभरात बर्‍याच मित्रमैत्रिणींनी, हितचिंतकांनी नेहमीच या बाबतीत चौकशी केली, 'आता काय परिस्थिती आहे?' अशी विचारणा केली. म्हणून, हा स्टेटस अपडेट... मूळ लेखन, 'आंदोलन शाश्वत विकासासाठी' या मासिकाच्या जुलै'२०१३ च्या अंकात प्रसिद्ध झाले असून, ते सुनिती सु. र. यांनी लिहिले आहे. त्यांच्या पूर्वपरवानगीने व त्यात काही भर घालून, ते येथे देत आहे.

मांजर, हत्ती, कुत्रा कि चिमणी?

लेखक निनाव यांनी बुधवार, 17/07/2013 23:12 या दिवशी प्रकाशित केले.
पाहिले एक मांजर , दूध पिताना मिटलेले डोळे , सतर्क कान भोवताली सर्व लक्ष असताना पाहिले एक हत्ती तलावास क्रमण करताना भुंकले कुत्रे , ओरडले माकड मात्र स्वतः मग्न चालताना मग पाहिल्या चिमण्या लागताच चाहूल 'संकटाची' वाचविण्यास इतरांस निस्वार्थ सतर्क करताना गरज अश्याच चिमण्यांची आज समाजास आहे मी पा एक वृक्ष, मात्र बाकी आपल्या वर आहे!

सर्वे आणि व्यवस्था

लेखक निखिल देशपांडे यांनी सोमवार, 15/07/2013 20:34 या दिवशी प्रकाशित केले.
दोन आठवड्यापुर्वी एका सर्व्हेमधे सर्वेयर म्हणुन भाग घेतला. माझ्या जवळची व्यक्ती सर्व्हे ऑफिसर म्हणून काम करत होती. त्याबाबतची माझी काही विस्कळीत निरिक्षणे. आदिवासी विद्यार्थ्यांसाठी सरकारतर्फे चालवल्या जाणार्‍या वसतिगृहांचा सर्व्हे. वसतिगृहातल्या सोयी सुविधा कशा आहेत? त्या पुरेशा आहेत का? हे जाणून घेण्यासाठी साधारण पाच-सहा पानी प्रश्नपत्रिका. प्रश्नपत्रिकेतले जास्तीत जास्त प्रश्न हे बहुपर्यायी तर काही ठिकाणी विद्यार्थ्यांनी आपले मत मांडावे ही अपेक्षा. याप्रकारचा एक सर्व्हे काही वर्षांपूर्वी झाला होता.

बारीक

लेखक मृत्युन्जय यांनी सोमवार, 15/07/2013 14:43 या दिवशी प्रकाशित केले.
बारीक गेला. उणेपुरे ३२ वर्षे म्हणजे काही जाण्याचे वय नव्हते तरी गेला. दुपारी साडेतीन ला मीत्याच्याशी बोललो आणि साडेपाचला बारीक गेलाही होता. त्याच्या जाण्याचे दु:ख आहेच पण याचे जास्त दु:ख आहे की जगातुन एका चांगल्या माणसाने कायमची एक्झिट घेतली. वयाची ६० - ७० वर्षे जगाला ओरबाडुन झाल्यावर कॅन्सर होउन सुद्धा नको ती माणसे दशक २ दशक आरामात ओढतात आणि कोणाच्या अध्यातमध्यात नसणारा एक सामान्य माणूस २ तासात इहलोक सोडतो.

आनंदाचे डोही आनंद तरंग (तीन)

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी रविवार, 14/07/2013 16:10 या दिवशी प्रकाशित केले.
उनक जे समोर आहे ते बिनशर्त खाणे हा बायकोच्या जाचातुन सुटायचा सर्वोत्तम मार्ग आहे. तीने जे बनवले ते बिनशर्त खाल्ले की मग तक्रारीला जागाच रहात नाही. पण मुकाट खायला तुमचे मन धजवत नाही. आणि "तुम्हाला माझे कौतुकच नाही" असे म्हणत बायको हॉटेल मधुन पार्सल आणु देत नाही. आपले लगाम बायको कडे आहेत हे आपण उघडपणे नाकारतो (किंवा चारचौघात तसे कबुल करायला लाजतो). पण त्या मुळे सत्य लपुन रहात नाही आणि मग चारचौघात बायकोच्या इशार्‍यावर नाचत नाही हे दाखवणार कस?

दिंड्या, पताका..

लेखक यशोधरा यांनी शुक्रवार, 12/07/2013 12:01 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्याकडे पालखीचा काही खास नेम नाही, कोणतीही दिंडी येत नाही, पालखी, वारकरी, माळकरी कोणासाठीच आम्ही काही करत नाही. वेळ कोणाला हो? आम्ही लय बिझी माणसं बघा. मध्यमवर्गीय आम्ही. आमच्या नोकर्‍या, शिक्षणं, रोजच्या आयुष्यातले लहान मोठे प्रश्न.. काय कमी व्याप आहेत आमच्या मागे? ते सोडवायलाच आयुष्य पुरत नाही हो आम्हांला, कुठे पालखीच्या फंदात पडतोय ! आम्ही भले, आमची टिचभर वितीची आयुष्यं भली, त्यातले प्रश्न भले आणि उत्तरं, आणखीनच भले, भले! असो, असो. खरं सांगायचं तर ही पालखीच आम्हांला सोडत नाही बघा! काय सांगायचं... अगदी लहानपणापासून हो.

प्रपोजल

लेखक तिमा यांनी मंगळवार, 02/07/2013 16:33 या दिवशी प्रकाशित केले.
सूचना: ज्यांना हे नाटक पहायचे आहे त्यांनी हा लेख आधी वाचू नये. ह्या नाटकाला २८ पारितोषिके मिळाली आहेत आणि टीकाकारांनी उचलून धरले आहे, अशी बरीच ख्याती कानावर आली होती. त्यामुळे हे नाटक बघायचे असे मनाशी ठरवले होते. त्याप्रमाणे, एकदाचा, एका रविवारी मुहूर्त मिळाला. तिकीटे काढल्यावर लक्षांत आले की डॉ. अमोल कोल्हे, आता काम करत नसून त्यांच्या जागी कोणी 'आस्ताद काळे' काम करतात.