मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

साहित्यिक

जिंदगी फिर भी.....

ज्येष्ठागौरी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
जिंदगी फिर भी..... लेकीची नुकतीच एक मोठी( सत्व )परीक्षा झाली त्यात ती उत्तीर्णही झाली आणि द्विपदवीधरही झाली आणि अगदी नजीकच्या भविष्यकाळात काही काळ शिकायचा मनसुबा नसल्याचं तिनं जाहीर केल्यावर मी जरा मऊ(!) आवाजात तिला विनंती केली की तिनं आता तिची खोली आवरावी.

संपला फ्रेंडशिप डे......

सुधीर मुतालीक ·
कसला डोंबलाचा फ्रेंडशिप डे. च्येष्टाय गड्या हा डे !!! ‘मी तुला माझा फक्त चांगला मित्र मानते...' या वाक्याची लय भीती वाटायची राव ! कोंच्या क्षणी थोबाडावर हे वाक्य येऊन आदळेल याचा नेम नसायचा. बरं, ते आलंच अंगावर की मेंदू त्यावेळी मात्र सटासट कॅल्क्युलेशन करायचा. तेवढे फास्ट कॅल्क्युलेशन इंजिनियरिंगला असताना झाले असते तर आज कुठच्याकुठं गेलो असतो आपण!

स्मृतीची पाने चाळताना: दोन

चंद्रकांत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
स्मृतीची पाने चाळताना: एक काही दिवसांपूर्वी गावी गेलो होतो. थोडा निवांत वेळ हाती असल्याने घराबाहेर पडलो. पावलं नकळत नदीच्या वाटेने वळती झाली. चालताना उगीचंच लहानपणातल्या पावलांचे ठसे वाटेवरच्या मातीत उमटल्याचा भास होत राहिला. मनातील आठवणीचं मोहरलेपण सोबत घेऊन नदीच्या रस्त्याने चालती झालेली पावले माळावर उतरली. समोर दिसणाऱ्या परिसरावर नजर भिरभिरली; पण नजरेच्या नजाऱ्यातून काहीतरी निसटल्यासारखे जाणवत होते. दिसणाऱ्या दृश्यात काहीतरी कमी असल्याचे वाटत होते. त्याकडे एकदा आणि मनात साकळलेल्या परिसराच्या प्रतिमांकडे एकदा आलटून, पालटून पाहत होतो.

पुस्तक परिचय The Great Game - अतिम भाग

मित्रहो ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
रशियाचा वाढता प्रभाव १८८० पर्यंत मध्य आशियात रशियाचा अंमल सर्वत्र पसरला होता. रशियाच्या या पराक्रमाचा सूत्रधार होता जनरल कॉफमॅन. त्याला साथ दिली ती जनरल चेरनैव्ह, स्कोबेलेव्ह, या रशियन जनरल्सनी. तसेच इग्नेटिव्ह या रशियन अधिकाऱ्याने मध्य आशियाचा दौरा करुन जी या भागाविषयी, तसेच खानांच्या सुरक्षाव्यवस्थेविशयी जी माहिती मिळविली होती त्याचा रशियाला खूप फायदा झाला. रशियाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे असे ताश्कंद शहर रशियाने आधी ताब्यात घेतले. हेच शहर पुढे जाऊन रशियाच्या मध्य आशियातील हालचालींचे केंद्र बनले.

स्मृतीची पाने चाळताना: एक

चंद्रकांत ·
लेखनप्रकार
शाळेत, वर्गात, गावात कुठेही असला तरी अरमान कधी चिडला, रागावला असं अपवादानेच घडलं असेल. वर्गात भिंतीकडील रांगेत कोपऱ्यातला शेवटचा बाक याची बसायची नेहमीची जागा. ही याची शाळेतील स्वयंघोषित जागीर. येथे बसलो म्हणजे मास्तरांचं लक्षच नसतं आपल्याकडे, हे याचं स्वनिर्मित तत्वज्ञान. शाळा आणि याच्या पत्रिकेतील गुण कधी जुळले नाहीत. अम्मी-अब्बा जबरदस्तीने येथे पाठवतात, म्हणून त्यांच्या समाधानासाठी हा येथे येणारा. शारीरिक शिक्षणाचा एक तास वगळला, तर सगळे विषय एकजात याच्या शत्रूयादीत येऊन स्थानापन्न झालेले. मराठीच्या तासाला अहिराणीत एखादा पाठ का नसावा? या प्रश्नाचं याला सतत कोडं पडलेलं असायचं.

कृतघ्न -7

बाप्पू ·
भाग 1 : https://www.misalpav.com/node/46154 भाग 2 : https://www.misalpav.com/node/46159 भाग 3: https://www.misalpav.com/node/46183 भाग 4: https://www.misalpav.com/node/46203 भाग -5 https://www.misalpav.com/node/46261 भाग -6 https://www.misalpav.com/node/46656 आता पुढे.... "या पाटील साहेब. बसा. यांची ओळख करून देतो. हे डॉक्टर मनोज रणदिवे, इथून पुढे रामदास ची केस हेच हॅन्डल करतील. यांनी आजपर्यंत गिया बारे सिन्ड्रोम च्या बऱ्याच केसेस यशस्वी रित्या हाताळलेत, आणि रामदास च्या केस मध्ये देखील हेच आपल्याला मदत करतील.

रत्नाकर मतकरी यांना आदरांजली

प्रचेतस ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
a ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार, रंगकर्मी आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट दिग्दर्शक रत्नाकर मतकरी यांचं रविवारी रात्री निधन झालं. नाटकं, बालनाट्यं, कथा, कादंबरी, गूढकथा, सामाजिक लेखन, ललित लेख, वैचारिक लेखन असे विविध प्रकार त्यांनी लिलया हाताळले. रत्नाकर मतकरींचे लेखन जरी चतुरस्त्र असले तरी मला सर्वात जास्त आवडल्या त्या त्यांच्या गूढकथा. काय एकाहून सरस गूढकथा लिहिल्यात त्यांनी. धारपांच्या भयकथा लेखनात प्रामुख्याने अतिंद्रिय शक्ती, सुपरनॅचरल पॉवर्स असंत.

सह्याद्रीचा सिंह गर्जतो...

आपला अनिकेत ·
सदर लेख हा १ मे या दिवशी लिहण्यात आला होता पण मिपा संकेतस्थळावर टाकण्यास उशीर झाला त्यासाठी क्षमस्व. आज 1 मे, हा दिवस दरवर्षीप्रमाणे आपण महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन म्हणून साजरा करतो हल्ली किमान WhatsApp वरती Status तरी ठेवून. काही वर्षांपूर्वी मराठी TV channels वरती महाराष्ट्राची एक tagline असायची...

सह्याद्रीचा सिंह गर्जतो...

आपला अनिकेत ·
सदर लेख हा १ मे या दिवशी लिहण्यात आला होता पण मिपा संकेतस्थळावर टाकण्यास उशीर झाला त्यासाठी क्षमस्व. आज 1 मे, हा दिवस दरवर्षीप्रमाणे आपण महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन म्हणून साजरा करतो हल्ली किमान WhatsApp वरती Status तरी ठेवून. काही वर्षांपूर्वी मराठी TV channels वरती महाराष्ट्राची एक tagline असायची...