Skip to main content

साहित्यिक

लिहिणं

लेखक श्रीगणेशा यांनी बुधवार, 29/12/2021 22:04 या दिवशी प्रकाशित केले.
लिहिणं म्हणजे नेमकं काय आणि मी का लिहितो या प्रश्नांचं उत्तर शोधावसं वाटतं कधी कधी, आणि मी लिहायला घेतो. खरं तर, एवढं सांगून हे लिहिणं संपू शकतं एवढं सोपं आणि सहज आहे, किंवा असायला हवं, लिहिणं! एकटेपणा ते एकांत अशा प्रवासात सोबत म्हणून असेल कदाचित, लिहिणं मला जवळचं वाटलं. आणि लिखाणाशी झालेली मैत्री व जवळीक जास्त प्रकर्षाने जाणवली. मी पाहिलेलं आणि पाहत असलेलं भोवतालचं विश्व माझ्या शब्दात मांडणं, आठवणींमध्ये रमणं, आणि त्या लिहिणं मला भावलं.

गाव

लेखक अनुस्वार यांनी सोमवार, 20/12/2021 10:45 या दिवशी प्रकाशित केले.
अगदी साधं गाव होतं ते. लोकसंख्या कशीबशी २०००. गावात कुणी जास्त शिकलेलं नव्हतं, साहजिकच पन्नासेक पोरं तेव्हढी जवळच्या शहरात कामगार म्हणून राहायची. बाकी बराचसा गाव मळ्यांमध्ये राहायला गेलेला. मळ्यात प्यायला विहीरीचं पाणी होतं अन् आकडे टाकायला लायटीची तार पण. गावात शंभरेक घरं अजूनही होती. झेड. पी. च्या शाळेच्या पाच खोल्या (बालवाडी + चौथी) पोरांच्या शिक्षणासाठी कमी आणि लग्नाची बुंदी ठेवायला जास्त कामी येत. पाच वर्षांपूर्वी शिक्षण विभागाने एक नवीन खोली बांधून दिली - संगणक प्रशिक्षणासाठी. त्यात एक भारी टी.व्ही. पण आहे असं काहीजण सांगायचे. विजेची जोडणी नाही म्हणून त्या खोलीला टाळं आहे.

९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, नाशिक, ३/४/५ डिसेंबर २०२१, आणि १५ वे विद्रोही साहित्य संमेलन, नाशिक, ४/५ डिसेंबर २०२१ मधील छायाचित्रे

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 05/12/2021 18:49 या दिवशी प्रकाशित केले.
९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, नाशिक, ३/४/५ डिसेंबर २०२१, आणि १५ वे विद्रोही साहित्य संमेलन, नाशिक, ४/५ डिसेंबर २०२१ मधील छायाचित्रे ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, नाशिक, ३/४/५ डिसेंबर २०२१ ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, नाशिक,  ३ डिसेंबर २०२१, म

माझी पुस्तकं

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी मंगळवार, 26/10/2021 09:50 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार. माझी बरीच पुस्तकं आता Amazon, Flipkart, Book Ganga वर उपलब्ध असल्याचं प्रकाशकांकडून कळवण्यात आलं आहे. पैकी या वर्षी प्रकाशित झालेल्या चार पुस्तकांपैकी एखादं पुस्तक प्रकाशकाकडून ऑन लाईन मागवलं तर पूर्ण पुस्तकाची Instant कॉपीही आपल्या मोबाईलवर तात्काळ उपलब्ध होते. (Buy the Print Book & get the access to read Instantly.

भिंगना आवाज

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी शुक्रवार, 15/10/2021 13:22 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे आमच्या लहानपणी अनेक मुलं भिंग पाळायचे. भिंग नावाचा एक मोठा उडणारा किडा असतो. जंगलात बोर, बाभूळ, हेंकळ अशा काट्यांच्या झाडावर तो सापडतो. भिंगाचे पंख लाल, हिरवे, पिवळे असे वेगवेगळ्या रंगांचे असतात. अंगही रंगीत आणि चकचकीत असतं. डोकं सोनेरी रंगाचं असतं. भिंगाची मान आणि बाकी अंग याच्यात एक बारीक फट तयार होते… संपूर्ण लेख : https://sudhirdeore29.blogspot.com/2021/10/blog-post.html?spref=tw संपूर्ण ब्लॉग : http://sudhirdeore29.blogspot.com/

मिसळपाव दिवाळी अंक २०२१ - आवाहन

लेखक साहित्य संपादक यांनी शनिवार, 18/09/2021 06:19 या दिवशी प्रकाशित केले.

अपडेट : भरघोस प्रतिसादासाठी सर्व लेखकांचे मनःपूर्वक आभार. दिवाळी अंकात निवडी विषयीचा निरोप सर्व लेखकांना २७ ऑक्टोबरपर्यंत कळवला जाईल

काही सदस्यांनी साहित्य संपादक तसेच ईमेल आयडीवर मुदत वाढवण्यासंदर्भात विचारणा केल्याने मुदत येत्या रविवार पर्यंत वाढवत आहोत. आजपर्यंत प्राप्त झालेल्या लेखनावर निर्णयप्रक्रिया + मुद्रितशोधन सुरू आहे.

पुस्तकगप्पा

लेखक मेघना भुस्कुटे यांनी सोमवार, 23/08/2021 10:08 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार. 'पुस्तकगप्पा' या नव्या उपक्रमाची ओळख करून देण्यासाठी हे टिपण. लायब्रऱ्या, कागदी पुस्तकांची दुकानं, वर्तमानपत्रातली मराठी पुस्तकांची जागा आक्रसत जात असताना, मराठीतल्या महत्त्वाच्या, लोकप्रिय, रंजक, अनवट, नव्याजुन्या पुस्तकांवर गप्पाटप्पा करण्यासाठी या कार्यक्रमाची कल्पना सुचली. प्रत्यक्ष भेटणं दुरापास्त होण्याचं एक सकारात्मक फलित म्हणजे कार्यक्रम करण्यासाठी जागा आणि तिथवर सदेह पोचण्यातल्या अडचणी हे दोन्ही प्रश्न रद्दबातल होणं. ते पथ्यावर पडल्यानं ही कल्पना ऑनलाईन राबवायची ठरवली.

वास्तव- चिंतन- तत्वज्ञान मंडनाची कादंबरी (‘मी गोष्टीत मावत नाही’)

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी शुक्रवार, 20/08/2021 12:16 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. रवींद्र नेवाडकर मी एक सामान्य वाचक आहे. “मी गोष्टीत मावत नाही” या डॉ. सुधीर देवरे यांच्या हटके कादंबरीवर एक वाचक म्हणून प्रतिक्रिया देत आहे. मी देवरे सरांच्या ब्लॉगवर प्रतिक्रिया म्हणून काहीतरी लिहीत असतो, हेच माझे साहित्य लिखाण संचित आहे. हे पुस्तक वाचण्यास सुरुवात केली आणि मला विश्राम बेडेकर यांचे आत्मचरित्र “एक झाड आणि दोन पक्षी” याची आठवण झाली. त्यात लेखकाने आपले जीवनचरित्र लिहितांना एक वेगळाच फॉर्म निवडला आहे. माणसाचे दोन मने असतात. एक जीवनाचा अनुभव घेते तर दुसरे त्याचे विश्लेषण व चिंतन करते. चिंतन करणाऱ्या मनाने अनुभव घेणाऱ्या मनाचे जीवन कथन केलेले आहे.

‘लॉटरी'.......अरे बाप रे (कथा परिचय: ७)

लेखक हेमंतकुमार यांनी बुधवार, 04/08/2021 17:32 या दिवशी प्रकाशित केले.
विदेशी कथा परिचयमालेतील याआधीचे लेख: १ कोसळणारा पाउस : १०० वर्षांपूर्वी ! २. एका आईचा सूडाग्नी ३. कुणास सांगू ? ४. ‘भेट’ तिची त्याची ५. नकोसा पांढरा हत्ती ६. ती सुंदर? मीही सुंदर ! .................................................................................................. आतापर्यंत वाचकांच्या मनमोकळ्या व उत्साहवर्धक प्रतिसादांमुळे या लेखमालेचे ६ भाग सादर केले.

समूदादाः डोळे पाणवणारी कादंबरी!

लेखक वामन देशमुख यांनी सोमवार, 26/07/2021 22:11 या दिवशी प्रकाशित केले.
'समूदादा' ही नागेश सू. शेवाळकर यांची बालकादंबरी वाचताना वाचकांना मनापासून आनंद होतो, एक प्रकारचे समाधान होते आणि डोळेही पाणवतात! समीर हा कादंबरीचा नायक आणि इतर बाल पात्रं आज घरोघरी, इमारतींमध्ये, गल्लोगल्ली आणि चाळींमधून निश्चितपणे भेटत असतात. त्यांना पाहताना मनात एक शंका आल्याशिवाय राहत नाही की, आजच्या स्पर्धेच्या युगात आपण बालकांचे बालपण हिरावून घेत आहोत की काय? कारण आज मुल दोन-अडीच वर्षांचे होत नाही तोच त्याची रवानगी 'प्ले ग्रुप' किंवा पाळणाघरात होताना दिसते आहे. समूदादा हे सर्वसामान्य घरामध्ये बागडणाऱ्या बालकांचे प्रतिनिधीत्व करणारे चरित्र आहे.