"कारतुस" साहेबांची गाथा
स्वतःच्या अपंगत्वावर मात करत आयुष्यात हुकुमी एक्के होणारी माणसे मला तुफान आवडतात, कारण त्यांच्यात ठासून भरलेले असते एक रसायन, त्याचे नाव म्हणजे "फायटिंग स्पिरिट", स्टीफन हॉकिंग ते ऑस्कर पिस्टोरीअस, ते अनाम असे भारतीय पॅराऑलिम्पिक खेळाडू, हे योद्धे चहूबाजूला दिसतात, पण आज आपण एका वेगळ्याच क्षेत्रात चमकलेल्या हिऱ्याची गाथा पाहणार आहोत, क्षेत्रही साधेसुधे नाही, तर भयानक जास्त शारीरिक कष्ट ही गरज असलेले, म्हणजेच आपले थलसैन्य उर्फ इंडियन आर्मी. समजा जर तुम्हाला म्हणले की एक पाय नसलेला माणूस आर्मी मध्ये होता अन मोठ्या हुद्यावर होता तर आपली प्रतिक्रिया काय असेल?