Skip to main content

रेखाटन

ओळख - पुस्तक आणि लेखकाची

लेखक विकास यांनी शुक्रवार, 26/03/2010 05:23 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या आठवड्यात इथल्या एका पुस्तकांच्या दुकानात असेच फिरत असताना एका पुस्तकाकडे लक्ष गेले आणि आम्हाला दोघांना एकदम आकर्षक वाटले म्हणून तात्काळ लेकीसाठी म्हणून घेतले. मुलीला दाखवल्याबरोबर तिला देखील लगेच आवडले (!) आणि लगेच हसतखेळत वाचून काढले (!!). ह्या पुस्तकाचे नाव आहे, "The Little Book of Hindu Deities" लेखकाचे नाव आहे, संजय पटेल. असे आवडण्यासारखे त्यात काय होते असे वाटत असेल ना?

मला मेघदुताचा पुढील दुवा हवा आहे.....विदग्ध वरील .

लेखक डावखुरा यांनी शनिवार, 20/03/2010 11:50 या दिवशी प्रकाशित केले.
http://vidagdha.wordpress.com/meghadoot_purna/ प्रस्तुत दुव्यावर मेघदुत आहे मराठी रसग्रहणासहित पण क्रमशः आहे .... तरि यापुढिल दुवा अथवा सम्पुर्ण मेघदुतचे मराठी रसग्रहण कोणाकडे उपलब्ध असल्यास देण्याचे करावे ....... धन्यवाद!!

एक टुमदार गाव - माझे माधवनगर

लेखक शशिकांत ओक यांनी शनिवार, 13/03/2010 11:55 या दिवशी प्रकाशित केले.
एक टुमदार गाव - माझे माधवनगर भाग १- (सन १९६० ते १९७०च्या आसपासच्या आठवणी) माधवनगर गाव तस फार लहान. पण आखीव आणि टुमदार. सांगली व बुधगाव संस्थानांच्या मधे पुणे-बंगलोर मीटर गेजलाईनवर मिरजेच्या आधीचे स्टेशन. तर दुसऱ्या बाजूला किर्लोस्करवाडी जवळचे. पुण्याहून सांगलीला उतरणाऱ्यांना सोईचे म्हणून रेल्वेस्टेशनवर गर्दी. तरतरीत घोड्याचे व गोंडेदार टांगे, एसटी बस वाहतुकीची साधने तर बाकीचे सायकल स्वार. बुधगावच्या वाटेवर स्व. गंगाधर नातू शेठजींची माधवनगर कॉटन मिल तर सांगलीच्या रस्यावर स्व.

स्नोई...

लेखक दिनेश५७ यांनी शुक्रवार, 04/12/2009 23:24 या दिवशी प्रकाशित केले.
लोकसत्ता'च्या व्हिवा पुरवणीत (३ डिसें.०९) माझ्या नववीतल्या, इंग्रजी माध्यमात शिकणार्‍या मुलीचा- सलोनीचा- हा लेख प्रसिध्द झालाय.) Picture 006 गेल्या दोन-तीन वर्षांपासून मी आणि माझी बहीण-विदिशा- आम्ही दोघंही आई-बाबांच्या अगदी मागे लागलो होतो. एक छानसं कुत्र्याचं पिल्लू घरी आणा म्हणून. शेवटी, सहा-सात महिन्यांपूर्वी बाबांनी तळहातावर धरून एक पपी आणला.

घोडचुक..

लेखक हर्षद आनंदी यांनी गुरुवार, 03/12/2009 07:51 या दिवशी प्रकाशित केले.
टारुभाऊंच्या विनंतीला मान देऊन साभार... १० वीची परीक्षा संपली आणि वारं प्यालेल्या खोंडागत आमचा कंपु ( मी, भेम्या, बैल, विव्या, प्रण्या) ऊधळला. मी रहायला कसबा पेठेत आणि बाकी सारे मैतर शनिवारातले.. सकाळची पहीली भेट ७ वाजता वाड्याच्या पटांगणात .. तेथे आत्ता सारखी प्रेमवीरांसाठी राखुन ठेवलेली हीरवी कुरणे नव्हती, होते मोकळे मैदान, सायकलचे पहिले धडे तिथेच गिरवले. तर त्या पटांगणात आम्ही सुर्य डोक्यावर येईस्तोवर मनोसक्त चेंडुफळी खेळायचो. विव्याचे आई-वडील बँकेत, त्यामुळे त्याचे घर म्हणजे आमचा खास अड्डा बनला होता.

निसर्ग... रेखाटन

लेखक विमुक्त यांनी शुक्रवार, 23/10/2009 18:50 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या मारुती चीतमपल्लींच "जंगलाचं देणं" हे पुस्तक वाचतोय... पुस्तक छानच आहे... त्यात काही निसर्गाची रेखाटनं आहेत...

आजीबाई... एक रेखाटन

लेखक विमुक्त यांनी मंगळवार, 20/10/2009 14:58 या दिवशी प्रकाशित केले.
एव्हरेस्टच्या पायथ्याशी आयुष्य पीकवलेल्या तीबेट मधल्या एका आजीबाईचं रेखाटन... NATIONAL GEOGRAPHIC JOURNAL मधे हा फोटो आहे... तीबेट मधल्या Rongbuk Monastery मधे ही आजीबाई राहायची... १९७० च्या सुमारास चीनी लोकांनी ह्या Monastery ची वाट लावली... त्यानंतर बरेच वर्ष एका गुहेत ही आजीबाई इतर काही लोकांसोबत राहीली... १९२० मधे तीबेट मधुन एव्हरेस्टवर चढताना George Leigh Mallory ने Rongbuk चा base camp म्हणून वापर केला होतो... हे रेखाटन मी 10 x 10 cm च्या चौकोनात काढलयं...

जननायक प्रभू राम अभ्युदय कादंबरीचे महानायक

लेखक शशिकांत ओक यांनी मंगळवार, 06/10/2009 19:58 या दिवशी प्रकाशित केले.
जननायक प्रभू राम शतकानुशतके रामकथा भारतीय समाजाला प्रेरणा देत आली आहे. विविध कालखंडात, वेगवेगळ्या प्रांतात राम कथेची विविध रूपे लोककलेतून, काव्यातून, नाटकातून, नृत्यातून, प्रकट केली गेली. महाराष्ट्रात गीत रामायणाच्या रूपाने राम कथा तेजाळली. मराठी भाषेला धन्यता लाभली असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. सन 2005 मधे गीत रामायणाला 50 वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्ताने गीत रामायणाच्या अनेक आठवणींना उजाळा मिळाला. हजारो वर्षांच्या कालप्रवाहात या कथेला अनेक रंगांचे वेष्टण लाभले.