Skip to main content

रेखाटन

काही रेखाटने

लेखक भडकमकर मास्तर यांनी गुरुवार, 10/09/2009 17:41 या दिवशी प्रकाशित केले.
काही नवीन रेखाटने... मोजूनमापून पोर्ट्रेट काढायचा कंटाळा आला की फक्त एक पेन्सिल घेऊन पांढर्‍यावर काळे करत बसायला मजा येते. छान टाईमपास होतो. टीप : चित्रांना हसले आणि मजेदार कॉमेंट करून लोकांना हसवले तरी चालेल.. फारच मज्जा येइल...

श्याम जोशींनी आर. के. लक्षमण यांना दिलेली दाद

लेखक नितीनमहाजन यांनी बुधवार, 02/09/2009 16:49 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, काही दिवसांपूर्वी अदितीताईंनी Common Man व R. K. Laxman यांच्यावर एक लेख लिहिला होता. त्याला प्रतिसाद म्हणून मी एका व्यंगचित्राची आठवण सांगितली होती. R. K. Laxman यांना Raman Magasese पुरस्कार मिळाला. त्याच्या दुसर्‍याच दिवशी म. टा. मध्ये प्रसिध्द व्यंगचित्रकार श्याम जोशी यांनी R. K. Laxman यांच्यावर एक व्यंगचित्र काढले होते. ते मी नुकतेच scan करून सर्वांसाठी येथे डकवित आहे. जर copy right चा प्रश्न उपस्थित होत असेल तर संपादकांनी हे चित्र खुशाल काढून टाकावे. Common Man & R. K.

कान्होजी आंग्रे

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 29/08/2009 04:49 या दिवशी प्रकाशित केले.
पुलंचे कान्होजी आंग्रे यांच्यावरचे पुस्तक वाचतांना नोट्स काढत असतांना सहज चाळा म्हणून कान्होजी आंग्रे यांचे चित्र वहीवरच रेखाटले आहे. KanhojI Aangre छाया.१ KanhojI Aangre Pic2 छाया.२

आणि कॉमन मॅन बोलला!

लेखक ३_१४ विक्षिप्त अदिती यांनी शुक्रवार, 14/08/2009 14:38 या दिवशी प्रकाशित केले.
हं, कॉमन मॅन हे नाव थोडंसं आठवतंय ना (हल्ली कॉमनमॅनच्या जागी 'कॉनमेन' हाच शब्द एवढ्या वेळा आपण वाचतो की विचारावंसं वाटलं!) काल पद्मविभूषण आर. के. लक्ष्मण यांचा मानसपुत्र, 'कॉमन मॅन'वर आधारित एकपात्री कार्यक्रम पाहिला. लेखक: अनिल जोगळेकर, भाषांतरकारः गौतम जोगळेकर, संगीत: बंकिम आणि बाकी सर्व श्रेय प्रा. अजित केळकर यांचं; पण केळकर म्हणतात सर्व श्रेय आपल्या सगळ्यांमधे असणार्‍या असामान्य सामान्यांचं आणि हे असामान्यत्व चितारणार्‍या कार्टूनीस्ट आर. के. लक्ष्मण यांचं! एकविनोदाच्या अंगाने जाणारा तरीही अंतर्मुख करणारा कार्यक्रम असं याचं वर्णन एका वाक्यात करता येईल.

झब्बु....

लेखक विशाल कुलकर्णी यांनी शुक्रवार, 07/08/2009 13:41 या दिवशी प्रकाशित केले.
विमुक्तरावांच्या रेखाटनांवर प्रतिसाद देताना मी त्यांना विचारले की झब्बु देवु का? त्यावर त्यांनी प्रतिप्रश्न केला की झब्बु म्हणजे काय? त्यावर दिलेले हे उत्तर ! विशाल.