(धप्पकन)
- Read more about (धप्पकन)
- 4 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
रस्त्यावरुन जाताना चालू सिग्नलमधून धप्पकन आवाज कानात घुसला..
कोणाचा तरी फाटलेला स्पिकर असणार..
छातीत नुसतीच धडधड आणि मनात कचकचीत शिव्या आल्या..
संस्कारांनी तोंडाला चाप लावलेत म्हणून त्या नुसत्या कानात खळखळ वाजल्या..
पुन्हा पुन्हा कानात खुपणारा तो भसाडा आवाज...
कोण साला घुसतोय डोक्यात.. नडतोय खालीपीली **चा..
कुठच्याही वेळेला कारटेप लावून शायनिंग मारतात...
काळ्या पैशाची पैदास हरामखोरांची...
मान वळवून मागे बघितलं तर तो '४१४१ घड्याळवाला' स्कॉर्पिओ होता...
मग मी गपगुमान खाली मान घालून चालू पडलो.. !!!!
-(मनातल्या मनात)
६ मार्च २०१२, सकाळी आठच्या सुमारास आम्ही कल्याणला, मुंबई-पुणे डेक्कन एक्सप्रेसमध्ये, एस-४ डब्यात आपल्या आरक्षित बैठकांवर स्थानापन्न झालो. गाडी सुटली. कामाचा दिवस आणि उलटी दिशा, ह्यामुळे गाडीला अजिबातच गर्दी नव्हती. कशाला उगाच आरक्षणाचा खर्च केला, त्यासाठी उगाचच जिवाचा आटापिटा केला असे वाटायला लागले. नेहमी शनिवार-रविवार-सुट्टीचे पुण्याला जाणारे आम्ही.
.
हा पर्जन्य वृक्षाच्या कटघराचा, १ एप्रिल २०१२ रोजी सकाळी सात वाजताच्या सुमारास काढलेला, आजदे गावातील डॉ.नानासाहेब धर्माधिकारी मार्गावरील फोटो आहे.
.
हा रस्ता कदाचित डोंबिवलीतील सर्वात सरळ, सर्वात लांब व रुंद असलेला आणि दोन्ही बाजुंनी सुव्यवस्थित वृक्षारोपण केलेला सुंदर रस्ता आहे. आजदे ग्राम-पंचायतीने रस्त्याकाठच्या वृक्षांची उत्तम काळजी घेतलेली दिसून येते.