मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पहाट

दत्ता काळे · · जे न देखे रवी...
Taxonomy upgrade extras
दीप निवले रात्रीचे पहाटही अशी फुले केसातील मोगरयाचा गंध अजून, अजून खुले शब्द नव्हे ओठांवर नाजुकसे चांदणे टिपले जरी, परी ऊमले ओठांच्या स्पर्शाने लाजलीस जेव्हा तू वेड मला लागले श्वासातील गंधभान स्पर्शातच जागले पहाटेला भेटण्यास रात्र परत आली उगवली पुन्हा फिरूनी क्षितीजावर चांदणी

वाचने 4784 वाचनखूण प्रतिक्रिया 16

प्राजु Mon, 10/27/2008 - 23:45
शब्द नव्हे ओठांवर नाजुकसे चांदणे टिपले जरी, परी ऊमले ओठांच्या स्पर्शाने खासच.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

बेसनलाडू Tue, 10/28/2008 - 02:05
कविता फार आवडली. 'केव्हा तरी पहाटे' आणि 'मलमली तारुण्य माझे' या भटांच्या कवितेतील काही निवडक ओळी/द्विपदींचा (त्यांच्या अनुभूतीचा) कुठेकुठे भास झाला. (स्मरणशील)बेसनलाडू

दत्ता काळे Tue, 10/28/2008 - 13:13
रामदासजी , तात्याराव आपली प्रतिक्रिया मनाला शाबासकीचं सुख देते आणि कविता लिहिल्यानंतर असं वाटलं होतं कि " हे जरा जास्तचं रोम्यांटीक आहे कां ? पण जसं कागदावर उतरलं, तस्सच मांडलं. धन्यवाद

मदनबाण Wed, 10/29/2008 - 08:51
लाजलीस जेव्हा तू वेड मला लागले श्वासातील गंधभान स्पर्शातच जागले व्वा.. मदनबाण..... "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda

वेताळ Wed, 10/29/2008 - 10:26
लाजलीस जेव्हा तू वेड मला लागले श्वासातील गंधभान स्पर्शातच जागले वा खुपच बेधुंद वेताळ

राघव Wed, 10/29/2008 - 15:21
..केसातील मोगरयाचा गंध अजून, अजून खुले क्या बात है :) मस्त आहे! मुमुक्षु

In reply to by प्रमोद देव

विसोबा खेचर Sat, 11/01/2008 - 12:08
तुमच्या उत्साहाचं नक्कीच कौतुक वाटतं, परंतु देवकाका, अहो कविता, तिचा स्वभाव लक्षात घ्या. बेधुंद, शृंगारिक कविता आहे ही. तुम्ही तिला इतकी दु:खी-कष्टी चाल लावयाचं प्रयोजन समजलं नाही.. पहाट फुलली म्हटलं आहे, ओठावरचे नाजुकश्या चांदण्याची बात केली आहे, श्वासतील गंधभान स्पर्शात जागल्याचं वर्णन आहे, शिवाय, पहाटेला भेटण्यास रात्र परत आली उगवली पुन्हा फिरूनी क्षितीजावर चांदणी ही सकारात्मकताही आहे. असं असताना इतकी दु:खी कष्टी आणि रडकी चाल लावयाचं कारण खरंच कळलं नाही. केवळ काही सूर सुचले म्हणून नव्हे, तर काव्याचा अर्थ समजावून घेऊन चाल लावली पाहिजे हा माझा मुद्दा लक्षात घ्या.. असो, वैयक्तिक मत. राग नसावा... माझं मत पटल्यास उत्तम, अन्यथा सोडून द्या.. आपला, (गाण्यातला) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

प्रमोद देव Sun, 11/02/2008 - 11:05
अरे तात्या तुझ्यासारख्या दर्दी संगीतज्ञाने केलेल्या सुचना मला नक्कीच मोलाच्या वाटतात. ह्यापुढे नक्की लक्षात ठेवीन.

शितल Fri, 10/31/2008 - 19:39
शब्द नव्हे ओठांवर नाजुकसे चांदणे टिपले जरी, परी ऊमले ओठांच्या स्पर्शाने हे तर खासच. :)