मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

हा स्पंद फुलण्याचा

दत्ता काळे · · जे न देखे रवी...
उन्मादूनी उसळतो आनंद अंतरीचा सारी नवी उ भारी, हा स्पंद फुलण्याचा हातात पावसाची ओली फुले उमलती पाण्यात नाचताना जणू थेंब ताल होती झाडांतूनी पसरतो नवश्वास पालवीचा सारी नवी उ भारी, हा स्पंद फुलण्याचा आरश्यात पाहताना प्रतिबिंब रोज हासे माझे मलास सांगे, हे दिवस श्रावणाचे अंगातूनी फिरे मग, स्वरनाद बासरीचा सारी नवी उ भारी, हा स्पंद फुलण्याचा लपुनी पुन्हा पुन्हा मी, मलाच साद देई थरकून पैंजणांना, हलकेच नाद देई लडीवाळ स्पर्श होतो, गालांवरी फुलांचा सारी नवी उ भारी हा स्पंद फुलण्याचा

वाचने 2986 वाचनखूण प्रतिक्रिया 6

मनीषा गुरुवार, 11/06/2008 - 16:02
सुंदर कविता .. लयबद्ध ... आणि अर्थपूर्ण !!

मीनल गुरुवार, 11/06/2008 - 18:10
आवडली . थरकून पैंजणांना, हलकेच नाद देई मस्त आहे . मीनल.