Skip to main content

बैठकीची लावणी: करीते मी विडा

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 08/04/2010 07:45 या दिवशी प्रकाशित केले.
रसीक मंडळी, खास आपल्यासाठी बैठकीची लावणी सादर आहे. दाद द्या खालील रचनेतील धृपद घोळवून घोळवून म्हटले असता आपसूक चाल बांधली जाते.
बैठकीची लावणी: करीते मी विडा
कळीचा चुना लावूनी काथ करीते मी विडा हा विडा खावूनी वेळ द्या मजला थोडा कळीचा चुना... ||धृ||
हिरवं पान हे घेवूनी हाती बैठकीत मी बसली असता अवचीत तुम्ही मागं येवूनी जवळ मला का ओढता ||१||
हा विडा खावूनी वेळ द्या मजला थोडा कळीचा चुना... ||धृ||
विडा घेवूनी जवळी बसता विचार करते रातंदिवसा विडा खावूनी ओठ रंगवूनी गुलछबू तुम्ही की हो दिसता ||२||
हा विडा खावूनी वेळ द्या मजला थोडा कळीचा चुना... ||धृ||
"कळीचा चुना" असा शब्दप्रयोग पानासंदर्भात वापरणार्‍या चुन्याचा केला जातो. वर "कळीचा चुना" या समेवर येण्यासाठी ऐवजी "पांढरा चुना" कसे वाटेल? अर्थात त्याने चालीत काही फरक पडत नाही, पण "पांढरा चुना" यात एक प्रकारचा जोर येतो असे माझे निरीक्षण आहे. - पाषाणभेद (दगडफोड्या) ०८/०४/२०१०
काव्यरस

वाचने 1737
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया

विडा घेवूनी जवळी बसता विचार करते रातंदिवसा विडा खावूनी ओठ रंगवूनी गुलछबू तुम्ही की हो दिसता लै भारी. लगे रहो...! -दिलीप बिरुटे [गुलछबू ]