Skip to main content

प्रेमकाव्य

माझी पहिली कविता

लेखक रसिका तिलेकर यांनी मंगळवार, 09/07/2013 14:54 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या ओठांच्या कळीवर फुलंलेल हसु म्हणजे तु... माझ्या बंद पापण्या मधे तु.... मी डोळे बंद न करता पाहिलेले स्वप्न म्हणजे तु... माझ्या श्वासात भिनलेला गंध म्हणजे तु... माझी प्रेरणा तु.... माझा आत्मा तु... मी म्हणजे फक्त तु अणि तुच...

पूल

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी रविवार, 19/05/2013 04:30 या दिवशी प्रकाशित केले.
हा पूल कधीच शांत नसतो ---- कधी 'तो' असतो तिथे धुकेही असते त्याच्या बरोबर हो, रात्रिचे गर्द धुके... गुढ... बर्‍याचदा 'ति'चा आवाज गारुड करतो त्या धुक्यातून त्याच्या पोटात एकच प्रश्न या धुक्यात आवाज'सुद्धा' अडकतो? हम्म.. हा पूल कधीच शांत नसतो ---- कधी 'ती' असते तिथे त्याने दिलेले पिंपळपान घेऊन जिर्ण, जर्जर, जाळीदार अन् गडद खुप जपलयं तिने ते पान ऊन-वार्‍यापासून, पावसापासून कधी कधी तिला प्रश्न पडतो तिच्या हातातले पिंपळपान जास्त जिवघेणी शिक्षा, कि, तिच्या डोळ्यातली डबडबलेली 'त्या'ची प्रतिक्षा? पूलावरचा मिणमिणता दिवा थकुन थरथरत क्षीण झाल्यावर ती निघुन जाते दिवा तसाच तिथे फडफडत असतो हम्म...

रेघ

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी मंगळवार, 14/05/2013 15:18 या दिवशी प्रकाशित केले.
पिकासोपासून हुसेनपर्यंत कोणाचेही कुठलेही चित्र ऊचलून पहावे प्रत्येक चित्रात एक विविक्षित रेघ असते खरं तर भव्य कॅनव्हासवर ती अगदीच लहानशी असते अहो ते पिकासो अन् हुसेनही जाऊ दे मोरपीस पाहिलयं कधी निरखुन? त्या सुंदर रंगसंगतीतही एक बारीक रेघ असते पिसाच्या बरोब्बर मधोमध बर्‍याचदा या रेघेचा संदर्भ चित्रकारालासुद्धा समजलेलाच असतो असेही नाही पण त्या रेघेशिवाय चित्र मात्र अपूर्ण असते माझ्या असण्यामध्ये तुझे अस्तित्व त्या रेघेसारखे आहे ---- एकाकी तळ्याच्या नितळ पाण्यात दिसण्यार्‍या सूर्याच्या प्रतिबिंबासारखी आहेस तू सूर्यचं पण तरी शितल, पाण्यात आहे ना... सुस्पष्ट, स्वच्छ, निव्वळ तेज अन् याच तेजाने ऊजळ
काव्यरस

शोध

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी गुरुवार, 09/05/2013 17:53 या दिवशी प्रकाशित केले.
काही शे वर्षांपूर्वी कोणीतरी एक शोध लावला म्हणे चंद्र हा सूर्याचे तेज वाहतो नाही असेल खरे, सिद्धही झाले होते म्हणे . . बहुदा ज्याने हा शोध लावला त्याने कधी तुला पहिलेच नसेल पहिले असते तर . . नको जाऊ दे झाले ते बरेच झाले . . काय तर म्हणे चंद्र सूर्याचे तेज वाहतो असेल असेल :) |- मिसळलेला काव्यप्रेमी -| (खुप दिवसांपूर्वी लिहीलेली कविता)

तू

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी सोमवार, 29/04/2013 00:11 या दिवशी प्रकाशित केले.
ओठांवर चिकटलेल्या मधाच्या थेंबासारखी तू . पापण्यांच्या काठावर तरळणार्‍या पाण्यासारखी तू . पहाटेच्या वेळी झाडावरुन घरंगळलेल्या प्राजक्तासारखी तू . कमळाच्या पानावरुन नुकतेच गळालेल्या दवथेंबासारखी तू . हिवाळ्यातल्या थंडीत गारठलेल्या खिडकीखाली थरथरणार्‍या मांजराच्या पिलासारखी तू . टळटळीत दुपारी तापलेल्या ढगांखालून वाहणार्‍या थंड वार्‍याच्या झुळकीसारखी तू . सूर्यास्ताच्या वेळी सागराच्या त्या दुसर्‍या टोकावर दिसणार्‍या परिघरेघेसारखी तू . मनातल्या शेवटच्या कप्प्यातल्या लपवलेल्या सोनगुपितासारखी तू .... तू, तू आणि तू ... सांग गं सखे, हो तूच तू कुठे नाहीस? |- मिसळलेला काव्यप्रेमी -| (२८/०४/२०१३)

प्रेम

लेखक दिपक वायळ यांनी बुधवार, 24/04/2013 19:35 या दिवशी प्रकाशित केले.
मन माझे केले तु damage बदलुन टाकली तु माझि वेडी वाकडी image कधीच नव्हती कुणासाठी आता आहे तुझ्यासाठी craze आयुष्याच्या माझा चालु आहे हा sensitive phase कुठे हि पाहता मला दिसते फ्क्त तुझि image बोलायला तुझ्याशी आणतो उसनं courage तुझ प्रेम म्हण्जे एक alcholic be average सुंदर रंगित पक्श्याचे मखमली plumage valentineday ला देशील म्ह्टल सुंदरसं package नाहि मिळले कहि तेव्हा ह्रुदयास लावले bandage तुझ्याशीवाय होणार नाहि प्रिये कुणाशीहि engage माझ्यासाठी ठेवशील ना तु तुझ्या ह्रुदयाचे passage नाहि माझा मोठा बंगला आहे छोटा cottage प्रेमासाठी करशील का तु त्याच्याम्धे manage चटकन होकार दे आणि भरुन टाकु आ

मत आणि मु*

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी सोमवार, 08/04/2013 14:12 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा http://www.misalpav.com/node/24432 मत आणि मु* दोन्ही नव्हे हो समान मत मिळताच नेते टांग वरती करीती खाल मानेने मेंढरे त्यांना पुन्हा मत देती पाण्यातुन पैसा नेता भारंभार काढी कापलेली करंगळी धरे त्याच धारे खाली मु*ल्या सारखे कधी मत टाकायाचे नाही की होणारे वाटोळे, तूला दिसतच नाही मत मागायाला येता, मु* द्यावे आपणही असे केल्या वीना मूजोरी, यांची संपायची नाही पैजार ठाकरे

नायक क्रमांक एक

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी मंगळवार, 02/04/2013 16:17 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या आगामी " नायक क्रमांक एक" या चित्रपटातले शिर्षक गीत खास आमच्या चाहत्यांसाठी. या चित्रपटाची पटकथा, संवाद आणि गीते आम्ही स्वतः लिहिली आहेत याची वाचकांनी कॄपया नोंद घ्यावी. (कंसातल्या सुचना दिग्दर्शकासाठी असुन, नायक नायिकेने कंसाबाहेरच्या शब्दांचे गायन करत नॄत्य करायचे आहे. चित्रीकरण सुरु करण्या आधी कॅमेरामॅनच्या कॅमेर्‍याची बॅटरी चार्ज आहे कि नाही ते तपासावे) (ज्याच्या कडे बर्‍यापैकी कपडे असतील त्यालाच नायक म्हणुन घेण्यात यावे. नायिका आम्ही आधिच निवडली आहे.

कविता

लेखक इरसाल यांनी शनिवार, 30/03/2013 16:53 या दिवशी प्रकाशित केले.
मला जेव्हा वाटले सत्यं ब्रूयात प्रियं ब्रूयात सत्यं अपि अप्रियं न ब्रूयात मी विकट गडावर चढायला सुरुवात केली, अंड्याचे फंडे चा छंद जेव्हा उत्तर ध्रुवीय प्रदेशा च्या सफरीवर गेलो तेव्हाच लागला पण सहाशेपन्नास रुपये, पिडा - चोर अन शीलाकी बुद्धिमानीने जेव्हा गृहखात्याची इमेज खराब व्हायला लागली व दुबईची काळी बाजू, ती का झाली तर बॉईल्ड एग्ज मधुन निघणार्‍या एच टु एस ह्या वायुने, आता टोमॅटोपुरीने जर डुक्कर आणि दारुडा नवीन वर्षाचा संकल्प करत असतील तर एकत्र कुटुंब ....जबाबदारी कोणाची त्यात दारू - म्हणजे काय रे भाऊ विचाराल म्हणजे तुम्ही गुंडाच....झालं आपलं कालाय तस्मे नमः या उप्पर जर तुमच्या अ‍ॅन्ड्रॉ

रात्रीच्या पावसाने

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी गुरुवार, 28/03/2013 20:41 या दिवशी प्रकाशित केले.
काल रात्रीच्या पावसाने खूपच गोंधळ केला . तुझ्या घरातील काही गळक्या कौलांना वाहून घेऊन आला वाहत वाहत त्या कौलांनी माझ्या घराशी आधार घेतला त्यांनी माझ्या मनाचा नकळत ठाव घेतला . . पाणी वाहते असले तर किती गोष्टी धुतल्या जातात नाही? . काल रात्रीच्या पावसाने खूपच गोंधळ केला . सारे अंगण मनासारखेच भिजवून गेला भिजल्या मनाने भिजल्या अंगणात जीव कासावीस झाला अंगणातून कुंपणाजवळ धावाधाव करत राहिला . . घरांना कुंपण असणे किती आवश्यक असते नाही? . काल रात्रीच्या पावसाने खूपच गोंधळ केला . येतांना बरोबर वाऱ्याला घेऊन आला विझणाऱ्या निखाऱ्यांना धग देऊन गेला अन् वरची राख तेवढी उडवून गेला . . वारा तरी कसा
काव्यरस