Skip to main content

प्रेमकाव्य

"ह्या बेहोशितचं जगणं असतं"

लेखक रसायन यांनी सोमवार, 19/11/2012 16:41 या दिवशी प्रकाशित केले.
खूप दिवसांनंतर मी, पुन्हा तुझ्यासाठीच लिहिणार आहे माझ्याच नकळत मी आज तुझ्याशी बोलणार आहे तु कोण आहेस?कशी आहेस?...माहित नाही ह्यां शबदांत तुला पाहण्याचा प्रयत्न मी करणार आहे असशील तु हसरी,थोडी लाजरी स्वप्नांमध्ये रमणारी असशील तु ही माझ्यासारखीच भावविश्वात जगणारी तुझ्याशी भेट होईल की नाही..? हे मलासुद्धा ठाऊक नाही ह्या मनःपटलावरचे चित्र पुसता पुसल्या जात नाही तुला आठवुण तुझ्यावर लिहिणं हेच तर कवितेचं कारण असतं ! खरं सांगु, तु नसताना तुला अनुभवणं "ह्या बेहोशितचं जगणं असतं"

वर्तुळ

लेखक ह भ प यांनी शुक्रवार, 16/11/2012 10:20 या दिवशी प्रकाशित केले.
सहजपणे तुझे माझ्या जीवनात येणे, घेउन आले माझ्या साठी आनंदाचे लेणे.. वरचेवर आपल्या भेटी आता नित्य होउ लागल्या, तुझ्याच आठवणीत हरएक रात्री जागू लागल्या.. समजुनही उमजत नव्हतं ह्या नात्याला काय म्हणावं, सहजचं तू म्हणाली "ते मैत्रीसारखं असावं.." तितक्याच सहजपणे मी ते नातं स्विकारणं जमणारं नव्हतं मला तुझ्याशी नातं नाकारणं.. गुलमोहोरासवे आपली मैत्रीही बहरली, नकळतपणे तुलाही माझ्या अंतरीची ओढ लागली.. तुही माझ्या सारखीच हरएक रात्र जागू लागली, माझ्याच आठवणीत तू आता कूस बदलू लागली.. आपले नाते ना 'ते' राहिले माझी जीवनसाथी बनुन, "तू एक वर्तुळ पुर्ण केले.." कवीमित्र: अजय शे

कितीक दिवस हे

लेखक कौस्तुभ आपटे यांनी शनिवार, 10/11/2012 19:13 या दिवशी प्रकाशित केले.
कितीक दिवस हे दुरुन दुरुन पहाणे मनातिल गुपीते सारीत सारीत बोलणे सोंग हे पांघरुन गुज मनी दडवून उगीच उगीच हासणे कितीक दिवस हे... हले ना ओठ जरी भाषेचा आड काही लपत्ये श्वासांची माळ तुझी कुणाचे नाव उरी जपत्ये,जपत्ये,जपत्ये कसल्याशा कळेला दाबीत दाबीत जगणे कितीक दिवस हे... सुनेसे गाव जसे, मनात भाव तसे दाटले भवती भिड जरी,एकटा जीव असे भासले,भासले,भासले आपुल्याच जीवाला जाळीत जाळीत रहाणे कितीक दिवस हे... फुटु दे बांध आता, मुखाचे बंध से सुटू दे भारला सूर उरी, जाऊ दे पार नभी भिडू दे, भिडू दे, भिडू दे हवे हवे असताना टाळीत टाळीत वागणे कितीक दिवस हे... गीत -- कौस्तुभ आपटे हे गाणे खालील लिंकवर ऐकू शक
काव्यरस

आणि अचानक त्या वेळी..

लेखक ह भ प यांनी शुक्रवार, 09/11/2012 13:23 या दिवशी प्रकाशित केले.
त्या दिवशी अचानक तुझी पुन्हा भेट झाली, तुला पाहताच माझ्या मनी जुन्या आठवणींची कालवाकालव झाली.. आठवले ते मोरपंखी दिवस तुझ्या सहवासात घालवलेले, आठवले ते सोनेरी क्षण तुझ्या परीसस्पर्शाने बहरलेले.. आठवले ते तासन-तास तुझ्याच प्रतिक्षेत घालवलेले, आठवली ती प्रेमपत्रे तुझ्या मैत्रिणींद्वारे तुला धाडलेली.. प्रेमाचा शिडकावा करुन तु नकळत मला सोडुन गेलीस, आणि आज इतक्या महिन्यांनी पुन्हा माझ्या सामोरी आलीस.. आज तुला असं समोर पाहुन काय बोलावं तेच कळत नाही, तुझी खुशाली विचारायला साधा शब्दसुद्धा सुचत नाही.. वाटलं माझ्या मनाला विचारावं तुला 'सोडन का गेलीस मला?' आणि अचानक त्या वेळी तुच म्हणालीस मला, खुप

एकच मागणे....

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी शुक्रवार, 26/10/2012 16:48 या दिवशी प्रकाशित केले.
तुझी माझी भेट झालेलं प्रत्येक ठिकाण परत परत जाऊन पाहिलंय मी........ पण निरव आणि निशब्द शांततेशिवाय आता तिथे काहीच उरलेलं नाही...... तू माझ्याशी तिथे बोललेले मोजकेच शब्दही त्याच शांततेत कुठेतरी विरून गेले आहेत.. पण विरता विरता माझ्या मनात कायमचे घर करून गेले आहेत.. तिथल्या प्रत्येक गोष्टीकडे तुझे माझे हरवलेले क्षण मी सतत मागतो.... तुझ्या आठवणीची प्रत्येक रात्र मी तळमळत एकटाच जागतो.......... आता फक्त एकच मागणे आहे...एकदा तरी तिथेच परत ये..... हरवलेले माझे क्षण माझ्यापुरते तरी परत दे.......!

एकापेक्षा एक.

लेखक मृत्युन्जय यांनी मंगळवार, 09/10/2012 17:55 या दिवशी प्रकाशित केले.
स्थळ: मुंबै (आणी आश्चर्यकारकरित्या मराठी दुकानदार) "एक ** साइझ ची अंडरवेयर द्या ह"" "कोणाला हवी आहे" - दुकानदार "मलाच" - मी आश्चर्याने (ऐश्वर्या रायला हवी असेल तर मी कशाला येइन मरायला. हे मनात) "** ची घ्या. ** होणार नाही तुम्हाला" - इति दुकानदार (दुकानातल्या इतर ३-४ गिर्‍हाइकांसमोर) " ("भोसडिच्या" हे मनात) अंडरवेयर मी घालतो तर साइझ मला माहिती असणार ना?" " लोक मुद्दाम कमी सांगतात. आणी मग बदलुन मागतात" "तुम्ही वापरलेली अंडरवेयर बदलुन देता?" " आमी नाहिच देत हो. पण कष्टमर येतात त्याला काय करायचे?" "("ढेकण्या" हे परत मनात) मग तुमी द्या ना.

कायच्या काय

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी गुरुवार, 13/09/2012 12:18 या दिवशी प्रकाशित केले.
बोलु नको काय, तुझे ऐकणार नाय बोलु नको काय, तुझे ऐकणार नाय दादा आज आम्ही बसणार हाय काळ्या काळ्या ओल्डमाँकची आणली आहे बाटली चौकोनाची बाटली पाहुन पोर सारी पेटली पेटलेल्या पोरांना चकणा पुरणार नाय दादा आज आम्ही बसणार हाय दोन पेग पोटी जाता डॉन होती सारे झोपी जाती काही काही मोजतात तारे वकार युनुसचा काही भरवसा नाय दादा आज आम्ही बसणार हाय सकाळी डोके दुखता हवा एक उतारा जमले नाही त्याने तर लिंबुपाणी मारा ऑफीस मात्र उगाच चुकवायचे नाय दादा आज आम्ही बसणार हाय बाटलीधर,

वाटतं, जागवावं, कुशीत घ्यावं

लेखक बहुगुणी यांनी शुक्रवार, 17/08/2012 23:21 या दिवशी प्रकाशित केले.
हळू हळू येतेय बिनपावली तुझ्या खांद्यामागे सकाळ सोनसळी पांढूरल्या तावदानात धीट होत, सूर्य येतोय आत उशीवर बरसताहेत तुझे केस तू अजूनही झोपेतच आहेस! वाटतं, जागवावं, कुशीत घ्यावं सांगितलेलं गुपित, पुन्हा सांगावं बघ, मी सकाळ देतोय तुला हा दिवसही घे, माझ्या फुला! येतील हलत्या पडद्यामागे सूर्याची किरणे फडफडणाऱ्या पापण्यामागे स्वप्नांचे फिरणे झोपेत तुझे स्वप्नांना बिलगणे सुखाचे क्षण आठवून ओठांचे विलगणे वाटतं, जागवावं, कुशीत घ्यावं सांगितलेलं गुपित, पुन्हा सांगावं बघ, मी सकाळ देतोय तुला हा दिवसही घे, माझ्या फुला!