Skip to main content

प्रेमकाव्य

द विनर टेक्स इट ऑल........

लेखक विजुभाऊ यांनी गुरुवार, 09/08/2012 14:40 या दिवशी प्रकाशित केले.
द विनर टेक्स इट ऑल........ काही गाणी जगावेगळीच असतात. त्यातलं नक्की काय आवडतं ते नक्की सांगता येत नाही. पण ती आतमधे कुठेतरी थेट भिडतात . हे गाणं ही त्यातलच एक . ७० आणि ८० च्या दशकात स्वीडीश ग्रुप " ABBA " खूप गाजत होता त्यांची गाणी मेलडी आणि हार्मनी यांचे एक मजेदार मिश्रण असायची. Björn Ulvaeus आणि Benny Andersson यानी लिहीलेले Agnetha Fältskog ही गायलेले. खरतंर ही एका विभक्त होत असलेल्या जोडप्याची कहाणी. गाणे जेंव्हा लिहीले गेले तेंव्हा Björn Ulvaeus आणि Agnetha Fältskog हे दोघेही याच अवस्थेतुन जात होते.

दोशी मोहित मर्जर... (भाग १)

लेखक अन्तु बर्वा यांनी मंगळवार, 24/07/2012 22:13 या दिवशी प्रकाशित केले.
"परदेसी परदेसी जाना नही...मुझेऽऽऽ छोडके... मुझे छोडके" स्वारगेट बस स्ट्यांड्च्या ३ नंबरच्या प्लाट्फार्म वर 'दोशी वडेवाले' या पुण्याच्या दोन नंबरच्या वडापाव सेन्टरच्या मालकाचा; गायधनी दोशीचा नोकिआ १२०० मोबाइल वाजला. अनोळखी नंबर मोबाईल स्क्रीन वर बघून तो बावचळला. पर्वतीहून तो फोन आला होता. गायधनी दोशी: "ह्यालो...?" पलीकडचा आवाज: "गायधनी, मी मोहित नाइक बोलतोय. एक कर्त्यव्य म्हणुन तुम्हाला कॉल केलाय. उद्या मोहित वडेवाले तुमच्या उपहारग्रूहामधे काम करणार्या सगळ्या पोरांना डबल पगाराची खुल्ली आफर देणार आहे. " क्लिक! (गायधनीने कॉल कट केला.) मोहित नाईक: "आयला! काय उमजेनासं झालयं...

तुझ्या विना

लेखक आनंद भातखंडे यांनी सोमवार, 23/07/2012 11:23 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्या विना ही रात्र माझी सरते काळी काळी तुझ्या विना मी लावून आलो संसाराची होळी || तुझ्या विना हा अल्लड वारा रुंजी घालत नाही तुझ्या विना या पाउसधारा रुसून गेल्या काही || तुझ्या विना हा कुंद मोगरा गंध सांगत नाही तुझ्या विना या मैफलीचा रंग रंगत नाही || तुझ्या विना बघ उडून गेले रांगोळीचे रंग तुझ्या विना मी करत बसतो आठवणींशी संग || तुझ्या विना मी शोधात आहे जगण्याची आशा तुझ्या विना मज अवगत नाही प्रेमाची भाषा || तुझ्या विना हे सुटतच नाही विरहाचे कोडे तुझ्या विना हे मन म्हणते ‘श्वास उरले थोडे’ ||
काव्यरस

अंतरीची हूरहूर ....

लेखक स्वर भायदे यांनी शुक्रवार, 29/06/2012 10:39 या दिवशी प्रकाशित केले.
अंतरीही हूरहूर वाटे तू माझी होशिल का ? जीवनाच्या गीताला या सूर तू देशील का ? वाळवंटासम आयुष्याचा नूर तू होशिल का ? बावरलेल्या या मनाला धीर तू देशिल का ? अंतरीही हूरहूर वाटे सखे तू माझी होशिल का ? जीवनाच्या हर क्षणास अर्थ तू देशील का ? अमावस्येच्या आंधारातील चांदणे तू होशिल का ? अंतरीही हूरहूर वाटे प्रिये तू माझी.......... होशिल का ?

तुम इक गोरख धंदा हो

लेखक यकु यांनी गुरुवार, 07/06/2012 09:21 या दिवशी प्रकाशित केले.
नवरत्न नाथांनी दीक्षा दिलेल्या क्षणापासून त्यांचा देह सोडून झाल्यानंतर, दरम्यानच्या काळात केलेल्या जगावेगळ्या सर्जरीचं सार नुस़रत फतेह अली खान यांनी गायलेल्या या कव्वालीतून पोहोचलं, पोहोचवलं गेलं. नवरत्न नाथ या साध्याभोळ्या, छक्केपंजे समजू न शकणार्‍या, नव्हे तसल्या गोष्‍टींची गरजच नसलेल्या माणसाने, नव्हे नवरत्न नाथ नावाच्या गुपचूप नजरेआड झालेल्या जादुगाराने ही जादू करुन दाखवलीय. जटील संकल्पना, लंब्याचौड्या बाता वगैरे गोष्‍टी हा नाथांचा स्वभाव नव्हता. साधं, पण थेट बोलायचे.

एन डी तिवारींची सत्वपरीक्षा

लेखक आशु जोग यांनी मंगळवार, 29/05/2012 21:18 या दिवशी प्रकाशित केले.
कॉग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री, आंध्रचे माजी राज्यपाल एन डी तिवारी (वय ८६) यांची आग्नि परीक्षा होते आहे. याबाबतची हकीकत अशी रोहित शेखर यांच्या पितृत्वाच्या वादावरून डीएनए चाचणीस नकार देणारे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते एन. डी. तिवारी यांच्या रक्ताचे नमुने आज (मंगळवार) डीएनए चाचणीसाठी घेण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाने तिवारी यांना डीएनए चाचणीसाठी आजपर्यंत रक्‍ताचे नमुने देण्याचा आदेश दिला होता.

कातर वेळ

लेखक अनिरुद्धशेटे यांनी गुरुवार, 24/05/2012 20:17 या दिवशी प्रकाशित केले.
आवरलेल्या मनातुन सावरलेले क्शण आहेत तुझ्यासाठीच राखुन ठेवलेले काही गुलाबी पण आहेत तुझ्याशिवाय दिवस साजरे करण्याची सवय आता मला करुन घ्यायला हवी कारण रात्रींमध्ये तुझ्याच आठवणींची स्पंदनं आहेत फक्त मला भिती वाटत राहते संध्याकाळ्ची कारण या कातर वेळी तुझ्यावर दुसर्याच कोणाची तरी राखण आहे . . . . अनिरुद्ध
काव्यरस

रमतारामाची आरती

लेखक नाना चेंगट यांनी शुक्रवार, 18/05/2012 12:37 या दिवशी प्रकाशित केले.
वडिलांची किर्ती गाऊ नये, धर्माच्या फुकाच्या गप्पा मारु नये, सारासार विचार करुन वागावे असा आम्हा रात्रंदिन उपदेश करणार्‍या रमतारामांचे आमच्यावर थोर उपकार आहेत. आम्हास ज्ञान देणारा आम्हाला देवासमान असतो. त्यामुळे रमताराम आमचे देव आहेत. साहजिकच त्यांची आरती करणे अतिशय गरजेचे आहे. आरतीनंतर प्रसाद मिळेल. प्रसादासाठी कोणतीही गडबड करु नये. देव रागवतो. शिस्त ही आवश्यक आहे. चला तर आरती करुया...
काव्यरस

मुंबई कट्टा :- १९ /२० मे २०१२

लेखक स्पा यांनी बुधवार, 16/05/2012 12:34 या दिवशी प्रकाशित केले.
हाय लोक्स.. १९ मे किंवा २० मे रोजी मुंबईत (ठाणे नव्हे हा ;) ) कट्टा करण्याचे योजिले आहे. ठिकाण : veg alweys परळ एस टी डेपोजवळ गोखले रोड , प्रभादेवी , मुंबई (http://www.zomato.com/mumbai/restaurants/central/prabhadevi/veg-always-…) वेळ : १९ मे शनिवार संध्याकाळ बरोबर ६ वाजता कळावे, आपला नम्र जिलबीपाडू स्पा