मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

बस्स इतकेच..

मिसळलेला काव्यप्रेमी · · जे न देखे रवी...
तुझ्यापासून दूर होऊन अमाप काळ लोटला दु:ख हलकं नाही झालयं पण सहन करण्याची ताकद वाढलीये.. बस्स इतकेच.. ---- आता दारावरचा पारीजात ओसंडून बरसला तरी त्याचा हेवा वाटेनासा झालायं फक्त एक हलकिशी कळ आली काल छातीत जेव्हा त्याचे एक फुल पायाखाली आले बस्स इतकेच.. ---- परवा अलमारी उचकतांना तुझे एक पैंजण हाताला लागले छन्न झालं एकदम आपल्या जोडीदाराअभावी एकाकी,केविलवाणे वाटले बस्स इतकेच.. ---- तिथेच बाजूला आपला एक अल्बम सापडला 'त्या' तस्बिरीतले तुझे डोळे आणि त्या डोळ्यातले ते काजळ.. बघता बघता कां कोण जाणे टचकन डोळ्यात पाणिच तरारले एकदम बस्स इतकेच.. ---- तुझी आठवण आजही येते अगदी नित्यनेमाने काही ठोके चुकतात परत मार्गी लागतात बस्स इतकेच.. पण तू गेलीस तेव्हाचे चुकलेले चुकार ठोके अजुनही परतलेले नाहीत बस्स इतकेच.. ---- हम्म.. दु:ख हलकं नाही झालयं पण सहन करण्याची ताकद वाढलीये.. बस्स इतकेच.. इतकेच... |- मिसळलेला काव्यप्रेमी -| (१०/१२/२०१४)

वाचने 6718 वाचनखूण प्रतिक्रिया 31

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 10/12/2014 - 20:07
आवडली कविता. अवांतर : हम्म, खटकतंय. पण चालायचंचं. -दिलीप बिरुटे

मदनबाण 10/12/2014 - 23:12
तुझ्यापासून दूर होऊन अमाप काळ लोटला दु:ख हलकं नाही झालयं पण सहन करण्याची ताकद वाढलीये.. बस्स इतकेच.. वाह...क्या बात हयं... :)

मदनबाण.....

आजची बदलेली स्वाक्षरी :- Chamak Cham Cham... { Sitaron Mein Tu Hi :-Yesudas }

मुक्त विहारि 10/12/2014 - 23:48
परत एकदा, एका संवेदनशील मनातून उतरलेली, जबरदस्त कविता. (वाचतांना, काही विधूर नातेवाईक, डोळ्यासमोर आले, अन अक्षरेच अंधूक झाली.)

आतिवास 11/12/2014 - 00:37
आवडली . अवांतरः ''इतकेच' ऐवजी 'इतकंच' शब्द अधिक परिणामकारक वाटेल असं वाटतंय.

स्पा 11/12/2014 - 16:17
पेस्शाल मिका टच चायला हे असले काही वाचले म्हणजे जीव हैराण होतो असो एकदम खास उतरलंय जियो !!!!!

सस्नेह 11/12/2014 - 22:31
एवढ्यातच बस्स ? नो नो अजून येऊ द्या..

ज्ञानोबाचे पैजार 12/12/2014 - 09:54
मिका रॉक्स, बस इतकेच, पैजारबुवा,

कवितानागेश 12/12/2014 - 22:12
उघड्या पुन्हा जहाल्या, जखमा उरातल्या.... याची आठवण आली. पूर्वी साधारण अशाच अर्थाच्या २ ओळी लिहिल्या होत्या मी,.... खुश थे के खत्म हो गयें, आँसू, आहे, और यादेभी, कल अचानक लबोंने पुकार लिया, तो चौंक गये।