Skip to main content

प्रेमकाव्य

शतजन्म शोधिताना.....

लेखक पराग देशमुख यांनी मंगळवार, 24/01/2017 17:07 या दिवशी प्रकाशित केले.
ठरवून मुलुख सारा,भिजवून परतलो मी कळ आतल्या जीवाची,चेतवून परतलो मी | अतृप्त आर्त वारा,त्रासून प्राशिला मी मर्जी नसे मनाची,भिजवून चाललो मी || बेरंग या जगाला, रंगून टाकताना रुधीरार्त आर्त माझे हलकेच सांडताना | तुज रंग रंजीताचा,रक्तरंज हा दिसेना मनी माझिया सखी हे,काहूर हासवेना || न्हावून घे बरे तू ,आसुसल्या सुखाने दुखवू कसा पुन्हा मी बोलू कुण्या मुखाने? कोंडून दुःख सारे,विस्फोट आज व्हावे हे देह संचिताचे,भेदून लखलखावे || येशील का जगी तू,बनुनी पुन्हा धरा ती मी मूक (कि मुक्त )मेघ नभीचा,बरसेल बेहीसाबी | सोसून वेड सारे,रुजूदे पुन्हा मलाही समजू नकोस काटा,मी पुष्प ते गुलाबी || रुजुनि तुझ्या ऊराश

ती एक वेडी

लेखक निओ यांनी रविवार, 22/01/2017 17:26 या दिवशी प्रकाशित केले.
ती एक वेडी जुन्या आठवणींचा कोष मनाच्या कोपऱ्यात ठेवणारी एक दिवस तिच्याही नकळत हा कोष जाणिवेत आला बघता बघता त्यातनं एक सुंदर फुलपाखरू निघालं तिच्या तळहातावर अलगद बसलं अगदी विश्वासानं ती कुतूहलाने त्याच्याकडे पाहत राहिली त्याची ओळख पटवू पाहू लागली हळूच त्याने पंख मिचकावले तिला वाटलं ते काहीतरी बोलतंय मिश्कीलपणे ओळख पटली ती हसली तिच्या कल्पनेपेक्षाही ते आकर्षक निघालं त्याच्या रूपानं हरखून गेली जुन्या आठवणीत हरवून गेली एकटेपणी त्याच्याच विचारात डुंबून गेली पुन्हा एकदा नवथर प्रेमाची चाहूल लागली तीच तरुणपणातील धडधड तीच हुरहूर तीच ओढ़ तिचा विश्वास बसेना स्वतःवर पण ती तिच्या भावनांशी प्रामाणि

बोलू नकोस काही

लेखक किरण कुमार यांनी बुधवार, 11/01/2017 11:29 या दिवशी प्रकाशित केले.
बोलू नकोस काही मज कळतात भावना त्या नको आठवू पुन्हा मज स्मरतात यातना त्या तू शब्द होवूनी यावे मजसंगे बोलायाला मी स्तब्ध उभा केव्हाचा तूजसंगे चालायाला तू गीत होवूनी यावे त्या माझ्या वाटेवरती मी आतूर उभा केव्हाचा अन काटे अवतीभवती मी झिजलो आहे येथे भिजण्याच्या त्या आशेने मी रडलो आहे येथे विरहाच्या त्या भाषेने येणा-या झुळकेपाठी मी असाच का मग फसतो पाहूनी माझी प्रतिमा मज भास तूझा हा असतो आता उगाच क्षणभर मी डोळे मीटूनी बसतो ह्रदय खोलूनी माझे मी तूला भेटूनी हसतो

एका लग्नाची ऐकीव गोष्ट.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी सोमवार, 09/01/2017 10:18 या दिवशी प्रकाशित केले.
(गद्य,पद्य वेचे.) तू मला पहायला आला होतास सफेद प्यॅन्ट अन सफेद फुल शर्ट काळा सावळा असलास तरी दिसलास स्मार्ट तू नेसली होतीस अंजरी साडी ब्लाऊझवर होती नक्षी वाकडी तिकडी गोरीपान होतीस अन दिसलीस फाकडी मी कांदेपोहे घेऊन आले होते तू मान खाली करून बसला होतास दोन चमचे खाल्यावर वर बघून हसलास उजव्या गालावरच्या खळीमुळे मोहक दि़सलास जाताना मी गेलो पोपटाच्या पिंजर्‍या जवळ तुच पोपटाला विचारत होतीस कोण रे तो? पोपट मला म्हणाला चोर चोर ते ऐकून तू जोरात हसलीस मी मनात म्हणाले होते माझं हृदय चोरणारा तूच तो चोर तुझा चेहरा पाहून माझ्या हसण्यावर माझा मीच घातला चटकन आवर मी रागावलो नसतो अजीबात तुझ्यावर का नाही
काव्यरस

प्रीत भेटेल का गं...

लेखक सुर्यान्श यांनी शनिवार, 07/01/2017 18:31 या दिवशी प्रकाशित केले.
हरवलेले गीत भेटेल का गं प्रथम नेत्रीची प्रीत भेटेल का गं बघ भावनांचा कल्लोळ झाला आज तरी वेळ भेटेल का गं ।। व्यवहारी विचारी पेलून सारी ह्रद्याशी ह्रद्य खेटेल का गं ।। तु ग्रृहलक्ष्मी मी अन्नदाता तु मायाममता मी इःकर्तव्यता मेळ दोघांचा होईल का गं ।। गलित तन झाले मन न झाले आज तरी चांद उगवेल का गं ।। -सुर्यांश
काव्यरस

दुसरे ट्विटर मराठी भाषा संमेलन २०१७ :: ३ ते ६ फेब्रूवारी २०१७ रोजी वापरा #ट्विटरसंमेलन

लेखक स्वप्निल_शिंगोटे यांनी गुरुवार, 05/01/2017 16:48 या दिवशी प्रकाशित केले.
" प्रकट व्हा, अभिव्यक्त व्हा !! " ट्विटर हे एक जागतिक व्यासपीठ आहे.ह्या व्यासपीठावर रोज करोडो लोक आपले मत आपल्या भाषेत नोंदवत असतात.एकेकाळी फक्त इंग्रजी भाषेचा बोलबाला असणारे ट्विटर आज जगातील प्रत्येक लिपी असणारी भाषा सामावून घेत आहे.मग अशा ह्या ट्विटरवर मराठीचे अस्तित्व किती आहे ? असा तुम्हाला प्रश्न पडेल.सध्या मराठीचे ट्विटरविश्व जरी उगमावस्थेत असले तरी त्याचे भविष्य उज्जवल आहे.

Naate

लेखक Savnil यांनी सोमवार, 02/01/2017 11:30 या दिवशी प्रकाशित केले.
लहरिच आणि किनाऱ्याच नात जगावेगळ असत जवळ असले तरीही मिलन नाशिबि नसत लहरिवर लहर सतत त्याला असते भेदत तरीही प्रेम करतो किनारा बिन प्रश्न विचारत किनाऱ्याच्या नशिबी फ़क्त वाळूच लेण असत लहरिला वेध मात्र त्याला स्वतःत सामावून घेण असत आलिंगन देऊन लहरिला परत फिरायच असत दुःख विरहाच मात्र किनाऱ्यान सोसायच असत जेव्हाहि जातो किनारयाजवळ तेव्हा हेच विचारावस वाटत प्रेम म्हणजे हे असत तर आम्हा माणसात अस का नसत ????

घर गळतंय माझं.....

लेखक अबोली२१५ यांनी शनिवार, 24/12/2016 19:16 या दिवशी प्रकाशित केले.
घर गळतंय माझं तस ते नेहमीच गळत पण पाऊस आला कि उडतात छतावरच्या दोन चार काड्या अन पाऊस येतो आत येतो जोराचा घर गळतंय माझं थेंबाच शहर झालाय पाण्याने तुंबलंय वाट पाहतेय निचरा होण्याची छताला भोक आहेच पण जमिनीला करतेय निचरेल ...
काव्यरस

कळले नाही

लेखक सोहम कामत यांनी मंगळवार, 29/11/2016 00:08 या दिवशी प्रकाशित केले.
कळले नाही कोठे चाललो मी.. तुझ्याच दारी जणु भुललो मी.. प्रेमात तुझ्या जरी पडलो परि.. अंतरी तुझ्या पार हरलो मी.. संपले दुवे सारे संपली आशा.. आभाळी कोठे धुंद विरलो मी.. आकांक्षा सार्या गेल्या उडूनी माझ्या.. स्वप्नात फक्त आता उरलो मी.. होतीस तेंव्हा तूच मनाची आस.. अजूनी का तुझ्यात अडलो मी?...
काव्यरस

ऐक ना साजणे

लेखक सोहम कामत यांनी बुधवार, 23/11/2016 21:15 या दिवशी प्रकाशित केले.
('नाही कळले कधी' गाण्याच्या चालीवर आधारित) प्रित ही.. अंतरी.. उमलली साजिरी.. मोहरली गोजिरी.. पाहता ती परी.. तुच ती सुंदरी.. तुच ती सुंदरी.. ऐक ना साजणे हाक ती साजिरी तुच माझी सखी तुच ती सुंदरी.. प्रित ही.. अंतरी.. उमलली साजिरी.. मोहरली गोजिरी.. पाहता ती परी.. मंद ते हासणे.. धुंद ते बोलणे.. उतरले अंतरी.. लाजरे चांदणे.. संगतीने तुझ्या.. जडली प्रिती उरी.. तुच माझी सखी.. तुच ती सुंदरी.. तुच माझी प्रिया.. तु असे तारिका.. गर्द तार्यांतली.. तु असे चंद्रिका.. पाहता सुर्यही.. लाजला अंबरी.. तुच माझी सखी.. तुच ती सुंदरी.. ऐक ना साजणे.. प्रित ही.. अंतरी.. उमलली साजिरी.. मोहरली गोजिरी..