('नाही कळले कधी' गाण्याच्या चालीवर आधारित)
प्रित ही.. अंतरी.. उमलली साजिरी.. मोहरली गोजिरी.. पाहता ती परी..
तुच ती सुंदरी.. तुच ती सुंदरी..
ऐक ना साजणे
हाक ती साजिरी
तुच माझी सखी
तुच ती सुंदरी..
प्रित ही.. अंतरी.. उमलली साजिरी.. मोहरली गोजिरी.. पाहता ती परी..
मंद ते हासणे.. धुंद ते बोलणे..
उतरले अंतरी.. लाजरे चांदणे..
संगतीने तुझ्या.. जडली प्रिती उरी..
तुच माझी सखी.. तुच ती सुंदरी..
तुच माझी प्रिया.. तु असे तारिका..
गर्द तार्यांतली.. तु असे चंद्रिका..
पाहता सुर्यही.. लाजला अंबरी..
तुच माझी सखी.. तुच ती सुंदरी..
ऐक ना साजणे..
प्रित ही.. अंतरी.. उमलली साजिरी.. मोहरली गोजिरी.. पाहता ती परी..(
| लेखनविषय: |

वाचने
4436
प्रतिक्रिया
24
मिसळपाव
प्रतिक्रिया
*वरील कवितेची रेसिपी*
एक नेहमीचाच प्रश्न
In reply to *वरील कवितेची रेसिपी* by पुंबा
अंडं चालेल पण मग गोडपणा कमी
In reply to एक नेहमीचाच प्रश्न by चांदणे संदीप
अर्धा वाटी मध
In reply to अंडं चालेल पण मग गोडपणा कमी by पुंबा

<ऐक ना भवाने>

ऐक ना भवाने>
होतीच ती.. खातरी.. उगवली भुवरी.. आठवली खंजीरी.. पाहता ही सुरी.. तुच ती डंगरी.. तुच ती डंगरी.. ऐक ना भवाने हाक ही दबकी तुच माझी दावणी तुच ती नाटकी. होत ही.. खातरी.. खुपसली खंजीरी.. आठवली भिंगरी.. पाहता ही नुरी.. तुच ती डंगरी.. तुच ती डंगरी.. मंद ते सम्जणे.. फुंद ते बोलणे.. उमजले नंतरी.. काढते भांडणे.. संगतीने तुझ्या.. नुरली प्रिती उरी.. तुच गाजा पट्टी.. तुच ती डंगरी.. तुच माझी दशा.. तु भासे त्राटीका.. उच्च वादातही.. तु दिसे चंडिका.. पाहता दैत्यही.. लाजला अंतरी.. तुच गाजा पट्टी.. तुच ती डंगरी.. ऐक ना भवाने होतीच ती.. खातरी.. उगवली भुवरी.. आठवली खंजीरी.. पाहता ही सुरी.. तुच ती डंगरी.. तुच ती डंगरी..=))
In reply to
<ऐक ना भवाने>
by नाखु
तुच गाजा पट्टी..
In reply to
<ऐक ना भवाने>
by नाखु
छे छे
In reply to तुच गाजा पट्टी.. by बोका-ए-आझम
बरोबर.
In reply to छे छे by नाखु

In reply to बरोबर. by बोका-ए-आझम
=)) फारच हसवलत आज!!!!
In reply to
<ऐक ना भवाने>
by नाखु
याच डंगरीबद्दल चर्चा सुरू आहे
In reply to
<ऐक ना भवाने>
by नाखु
@डंगरी››› लै दिसानी ऐकला
In reply to याच डंगरीबद्दल चर्चा सुरू आहे by आदूबाळ
अगाबाबौ.... जबरदस्त हो नाखु
In reply to
<ऐक ना भवाने>
by नाखु
नाखुकाका रॉक्स!
In reply to
<ऐक ना भवाने>
by नाखु

पार चोता केला राव चांगल्या
प्रगती आहे !
@'जीव आवळून' चिडणारे तुम्हीच
In reply to प्रगती आहे ! by सस्नेह
@'जीव आवळून' चिडणारे तुम्हीच
णवकवींना प्रोतसाहाण दिले
छान लिहिले आहे.
धन्यवाद..
"नाही कळले कधी" हे गाणं आहे?