मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

प्रेमकाव्य

दाराआडचे घड्याळ

चित्रगुप्त ·
. एक घड्याळ दाराआडून बघते आहे बाहेर किती बाहेर ? स्वतःच्या बाहेर, शतकानुशतकांच्या पार... जिथे आहे एक लंबकाचे घड्याळ... . आणि एक वाळूचे घड्याळ... . अजुनही मागे मागे.... जिथे आहे घंगाळात तरंगणारे घटिका पात्र

(दाराआडची आंटी)

प्रसाद गोडबोले ·
एक आंटी दाराआडून बघते आहे बाहेर किती बाहेर? फोटोरुमच्या बाहेर, एडिटिंग्च्या टेब्लावर जिथे एक मुलगा बसला आहे एडिटिंग करत.... करत असेल का तो खरेच एडिटिंग ? की पहात असेल तो हिडन कॅमेराचे लाईव्ह फीड, लपवलेल्या टॅबमागे? आंटी दाराआडून बाहेर येऊ शकत नाही... मग ती त्यालाच बोलावते फोटो रुम मध्ये, ते डोळे डोळ्यात भरुन घेऊन मुलगा खाडकन जागा होतो .... भान हरवलेली आंटी निसरड्या रस्त्यावरुन घसरत रहाते एकेक पाऊल... घसरतच राहते.... -"जिंदा दिल"(चा एक फॅन )

- वैजू वहिनी माहीत नसलेल्यांनी पोगो पहा =))))

दाराआडची मुलगी

शिव कन्या ·
एक मुलगी दाराआडून बघते आहे बाहेर किती बाहेर? स्वत:च्या बाहेर, समुद्राच्या पार जिथे एक मुलगा बसला आहे स्तब्ध.... करत असेल का तो ही तिचा विचार? जात असेल का तो ही स्वत:च्या बाहेर, समुद्राच्या पलीकडे? मुलगी दाराआडून बाहेर येऊ शकत नाही... मग ती तिचे संपूर्ण डोळे पाठवते, ते डोळे डोळ्यात घेऊन मुलगा शांतपणे जागा राहतो.... डोळे हरवलेली मुलगी घर नसलेल्या दाराआडून बघत राहते... बघतच राहते.... -शिवकन्या

कोरडं रान

पाषाणभेद ·
किती भाग्यवान तुह्या पैंजणाचं घुंगरू ग मी आसा दुर अन ते तुह्यापाशी राहतं ग नको निघू भर दुपारचं उन्हातानाची ग कमरेवर जरी पाणी तरी डोईवरी आग ग चालतांना चाल तुही लचकेदार ग रानामधी धावती हारीणी नाजूक ग सगळीकडं आसती काटेरी बाभळी ग तु रानामधी उगवलं गुलाबाचं फूल ग किती वाटतं दोन शब्द तुह्याशी बोलू ग पन बोलतांना वठी नाही काही येत ग तुह्या नजरंला जवा नजर माझी भिडती ग ढगातली वीज पडं लक्कन काळजात ग एकडाव तरी तु माह्यासंग मनातलं बोल ग तुझ्या बोलानं फुटलं मह्या काळजाचं डेकूळ ग किती सांगू माझी रामकथा माह्याचं तोंडून ग सारीकडं पावसाचं पानी पन माह्य रानं कोरडं ग - पाषाणभेद ३/४/२०१९

चौथयांदा झालेल पाहिलं प्रेम

chittmanthan.OOO ·
काही दिवांपूर्वी लायब्ररी मध्ये एक नवीन मुलगी आली. पहला प्यार बार बार आणि लगातार होण्यामागे ज्या मुली असतात त्यातलीच एक... जेमतेम पावणेपाच फूट उंचीची..

मैत्री

तृप्ति २३ ·
मैत्री मैत्री असावी एकमेकांना जपणारी पण नसावी कधी एकमेकांना विसरणारी मैत्री असावी चांदण्यांसारखी रात्री च्या त्या अंधारात अथांग पसरलेली मैत्री असावी फुलासारखी कितीही काटे बोलले तरी सुगंध मात्र देणारी मैत्री असावी सागरासारखी कितीही आल वादळ तरी मात्र किनाऱ्यालगत येणारी मैत्री असूदेत कितीही अबोल पण असावी एकमेकांना समजून घेणारी मैत्री मध्ये नसली जरी रोजची ती भेट तरीही हक्काने एकमेकांना साथ देणारी... तृप्ती समीर टिल्लू https://www.truptiskavita.com तुम्ही आमची मैत्री कविता YouTube वर पाहू शकता . हि YouTube विडिओ ची लिंक आहे. https://youtu.be/9ymedoNB-5s

ते दोघे

शिव कन्या ·
पानगळीने रेखीव झालेल्या त्या प्रचंड वृक्षातळी ते दोघे होते मघामघाशी तर! मी पाहीले त्यांना बराच वेळ खाली मान घालून एकमेकांमध्ये साखरेइतके अंतर ठेवून चालताना, कुठेही न थांबता त्यांना एकमेकांकडे बघताना, अन् तेव्हा रस्ता हसताना... मी पाहिले त्या दोघांना , हात हातात घेताना 'बाहों के बाहर नजरों से ओझल होना ही लकिरों पे लिखा है तो वो लकिरे ही मिटा देते हैं' त्याने एवढेच म्हणलेले मला ऐकायला आले नंतर मला ते दिसले नाहीत... पानगळीने रेखीव झालेल्या प्रचंड वृक्षामागे मला नंतर कुणीच दिसले नाही... -शिवकन्या

आजही...

नायकुडे महेश ·
आजही स्वप्नात मी त्या बावऱ्या परीच्या आजही कुशीत मी ओलावल्या सरीच्या ।। आजही वेड्या मनाला याद येते तिची आजही ओल्या सरीतून साद येते तिची आजही हृदयात मी त्या लाजऱ्या कळीच्या आजही कुशीत मी ओलावल्या सरीच्या ।। आजही ते थेंब ओले झेलण्या आतुर मी आजही ते क्षण गुलाबी छेडण्या आतुर मी आजही प्रेमात मी त्या गोजिऱ्या परीच्या आजही कुशीत मी ओलावल्या सरीच्या ।। महेश नायकुडे

प्रपोज डे

अविनाशकुलकर्णी ·
प्रपोज डे -------------- बेसावध,धुंद क्षणी मनात तिचा विचार आला तिच्या आठवणी ने वेडा जीव व्याकुळ झाला * ताटातूट झालेली ,ती तिच्या मार्गाने ,मी माझ्या वॉट्सपले भेटू यात का? संध्याकाळी एखाद्या * भेटणे तर असंभव होते मार्ग निराळे झालेले होते ती मेसेजली भेटू यात संध्याकाळी एखाद्या * मी पण म्हणालो भेटू यात संध्याकाळी एखाद्या माहीत होते, ना तिला वचन पाळणे शक्य होते, ना मला

लाजणे

अविनाशकुलकर्णी ·
. प्रेमातला लाजणे हा सर्वात सुंदर भाग आहे, नजर खाली झुकवणे, गाल आरक्त होणे, चेहरा ओंजळीत लपवणे, डोळे झाकून घेणे, ओढणीने चेहरा लपवणे किंवा तोंड वळवून पाठमोरे बसणे .. एक ना अनेक प्रकार प्रेमातला तो लज्जा भाव खूप रोमँटिक असतो हे सगळं नसतं तर प्रेम अगदी शुष्क व नीरस झालं असतं .. कवीने म्हटलंच आहे जणू रात्र काळी तिचे केस अन् पुरा चंद्र होता तिचा चेहरा... तिचे हासणे चांदण्याचा चुरा,तिचे लाजणे अमृताचा झरा! भावना व्यक्त तर कराव्याश्या वाटतात पण लज्जेने डोळ्यास ड