मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

नाट्य

हबीब तन्वीर

मुक्तसुनीत ·
लेखनविषय:
ख्यातनाम हिंदी नाटककार , दिग्दर्शक , आणि अभिनेते हबीब तन्वीर यांचे सोमवारी भोपाळ येथे निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. "आग्रा बझार", "चरणदास चोर" इत्यादि प्रसिद्ध हिंदी नाटके त्यांनी लिहिली आणि केली. स्वातंत्र्यपूर्व काळात मार्क्सिस्ट विचारांनी प्रभावित असलेल्या पीढीचे ते महत्त्वाचे साक्षीदार असे म्हणता येईल. त्यांनी "नाटक" हाच एक ध्यास घेतल्यासारखे संपूर्ण आयुष्य काढले. त्याना अनेक पुरस्कार मिळाले. - १९६९ सालचा "संगीत नाटक अकादेमी पुरस्कार" - १९८३ साली पद्मश्री - २००२ साली पद्मभूषण याशिवाय अन्य अनेक विदेशी पुरस्कारांनी त्यांचा सन्मान झाला होता.

कवितांचे मंचीय (नृत्य - नाट्यात्मक) अविष्कार :

भडकमकर मास्तर ·
लेखनप्रकार
हे कवितांचे मंचीय अविष्कार करायची फ़ॆशन कधीपासून आलीय बुवा? पावसाच्या कविता, निसर्गाच्या कविता, झाडांच्या कविता... वैताग साला.. (आधीच सुमार निसर्गकविता माझ्या डोक्यात जातात.. त्यात सूर्य, चंद्र,पाऊस,आभाळ असे शक्य तितके हावभाव करत गिटारच्या झिन्गझिन्ग झिन्गझिन्ग ठेक्यावर कोणी कविता उभं राहून गायला लागलं तर काय होईल?... आमच्या प्राथमिक शाळेत एक बाई कायम अशा प्रकारच्या कविता घेऊन नृत्य बसवायच्या... हिरवे हिरवे गार गालिचे( हिरव्या फ़्रॊकमधल्या दहा मुली या विन्गेतून त्या विन्गेत पळाल्या ) हरित तृणांच्या ( पाच बोटं एकत्र करून आकाशाकडे दाखवत उघडमीट करणारी चार पोरं ..

मिसळपाव प्रतिष्ठान..!

विसोबा खेचर ·
लेखनप्रकार
राम राम मंडळी, संगीत, साहित्य, व कला आदींना वाहिलेली 'मिसळपाव प्रतिष्ठान' या विश्वस्त संस्थेची आम्ही नोंदणी केली आहे.

तु !

दशानन ·
एका प्रेमवीराची मानसीक अवस्था जेव्हा त्याची ती त्याला असेच मध्ये सोडून जाते तेव्हा तो प्रेमवीर काय विचार करत असेल ह्यांची एक कल्पनामात्र... ************************************ किती सोपा शब्द आहे नाही, पण ह्यांचा अर्थ माझ्यापेक्षा कोण जाणेल.. ह्या शब्दांचे! तुझ्या शिवाय माझे अस्तिव काय ?

मनाच्या कुपितले - स्टेज आणि मी

विनायक पाचलग ·
लेखनप्रकार
मनाच्या कुपितले या सदरातला हा पंधरावा आणि अंतिम लेख
मी आणि स्टेज
(माझा आत्तापर्यंत झालेला स्टेजप्रवास) तशी अंगात स्टेजवर जावुन बडबडायची होउस दांडगी ,त्यामुळे दिसली स्पर्धा की घे भाग अस नेहमीच व्ह्यायच(नंबर यायचा नाही हा भाग सोडा,पण बोंबलायचो)अगदी बालवाडी पासुन .तेव्हाचे फोटो अजुन आहेत, आता ते पाहिल्यावर माझे मलाच हसु येते पण चालायचेच स्वतःवर हसण्यात जी मजा असते ती दुसर्‍याला हसण्यात नाही हे मात्र खरे ..असो , तर असे करत मी ४थीत आलो ,आणि कधी नव्हे ते मला शाळेसमोर भाषण करायची संधी मिळाली विषय होता ल

दिलीप प्रभावळकरांनी साकारलेल्या माझ्या आवडत्या भूमिका... भाग एक

भडकमकर मास्तर ·
लेखनप्रकार
दिलीप प्रभावळकर म्हणजे एकदम भन्नाट चतुरस्त्र अभिनेता.रंगमंच, टीव्ही, सिनेमा सर्व माध्यमांमध्ये ते लीलया वावरले आणि प्रेक्षकांची मने जिंकली. dilipprabhawalkar.com या त्यांच्या संस्थळावरती त्यांच्या सर्व भूमिकांचा तपशील उपलब्ध आहे. त्यातली बरीचशी नाटके पाहिली आहेत... प्रत्यक्ष आणि व्हिडिओवरती. त्यांनी लिहिलेले ’एका खेळियाने’ हे त्यांच्या भूमिकांबद्दलचे आत्मकथनपर पुस्तक नुकतेच वाचले... परत परत वाचले.आधी त्या पुस्तकाची ओळख करून देणारा लेख लिहिणार होतो. ( हे पुस्तक म्हणजे अभिनय प्रवासाची कथा आहे.

खोया खोया चांद.... (अर्थात गिफ्टची देवाणघेवाण) माझ्या एका दीर्घांकातला भाग

भडकमकर मास्तर ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
( मनीष आणि माधवी मैदानावरती गप्पा मारत बसले आहेत) माधवी : ( एकदम उठत) चल निघूया.. मनीष : पण कुठे? माधवी : मला कॉफ़ी प्यायचीय.. मनीष : मग मागवूयात की इथेच... माधवी : नको.. मनीष : खरंच.. अगं या अण्णाची कॉफ़ी कसली उच्च असते , तुला माहित नाही... माधवी : काय रे तू? कॉफ़ी म्हणजे अगदी कॉफ़ी नकोय मला.. मनीष : अरे आत्ता पाहिजे म्हणतेस , मग नाही म्हणतेस.. माधवी : मला ना खरंतर शॉपिंगला जायचंय.. मनीष : कशाला? माधवी : आज काय आहे सांग? मनीष : म्हणजे? माधवी : आज काय घडलं होतं? मनीष : २७ जून... ( विचार करत पुटपुटतो)..

एक संवाद ..भाग १..( मी आणि ती)

भडकमकर मास्तर ·
लेखनप्रकार
एका नातेवाईकाच्या लग्नसमारंभामध्ये होणार्‍या बायकोला घेऊन आलेल्या मुलाचा लग्नघरात तिच्याशी झालेला संवाद.... _____________ मगाशी भेटल्या त्या सगळ्या आत्या माझ्या..त्या बर्‍या आहेत.. म्हणजे? भोचक प्रश्न कमी विचारतात.. असं होय? पण मला नाही हं सगळी माणसं लक्षात राहायची... जमेल तशी थोडीथोडी ठेव लक्षात... ओके.. तशी आमच्याकडे चक्रम माणसांची कमी नाही... असू दे.. मला सवय आहे.. हे बघ, ती जी दिसतेय ती ... कोण? अगं, ती काय...पैठणी घातलेली... हॅ..ती काय पैठणी आहे होय? नसेल मग..

बेगम बर्वे - एक डोक्यावरून गेलेले नाटक

मनिष ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
परवाच (१ मार्च) सतिश आळेकरांचे प्रचंड गाजलेले 'बेगम बर्वे' नाटक मूळ संचात (स्वतः आळेकर, चंद्रकांत काळे, मोहन आगाशे वगैरे) पहायचा योग आला. नाटकाची खूप किर्ती ऐकली होती, त्यामुळे अगदी उत्सुकतेने ते नाटक पाहिले, पण फारसे झेपले नाही! :( खूप प्रश्न पडलेत -- इथे मिपावर जाणकार माहिती देतील अशी आशा आहे. हे नाटक प्रामु़ख्याने स्त्री भुमिका करणार्‍या, बालगंधर्वांना आदर्श मानणार्‍या पुरुष कलावंताची शोकांतिका आहे. पण मग काही प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीच. नलावडे बाई म्हणजेच बर्वे - हे कसे काय? पुढे तिचे/त्याचे लग्न, एकत्र राहणे ह्या सगळ्या गोष्टी कल्पनेत आहे का? शिवाय ते दिवस राहणे??