दिलीप प्रभावळकरांनी साकारलेल्या माझ्या आवडत्या भूमिका... भाग एक
दिलीप प्रभावळकर म्हणजे एकदम भन्नाट चतुरस्त्र अभिनेता.रंगमंच, टीव्ही, सिनेमा सर्व माध्यमांमध्ये ते लीलया वावरले आणि प्रेक्षकांची मने जिंकली.
dilipprabhawalkar.com या त्यांच्या संस्थळावरती त्यांच्या सर्व भूमिकांचा तपशील उपलब्ध आहे.
त्यातली बरीचशी नाटके पाहिली आहेत... प्रत्यक्ष आणि व्हिडिओवरती.
त्यांनी लिहिलेले ’एका खेळियाने’ हे त्यांच्या भूमिकांबद्दलचे आत्मकथनपर पुस्तक नुकतेच वाचले... परत परत वाचले.आधी त्या पुस्तकाची ओळख करून देणारा लेख लिहिणार होतो.
( हे पुस्तक म्हणजे अभिनय प्रवासाची कथा आहे. अलबत्या गलबत्यातल्या चेटकिणीपासून ते बटाट्याच्या चाळीपर्यंतचा प्रवास यात आहे... आबा टिपरे आणि अप्पा नि बाप्पामधले तर्कटी अप्पा या भूमिकांबद्दल (का कोण जाणे विस्तारभयास्तव ?) यात लिहिलेले नाही.भूमिकांच्या अभ्यासाचे वर्णन उत्तम... मात्र गॉसिप, भांडणे, उखाळ्यापाखाळ्या यांचे थोडेही उल्लेख नाहीत.. :) वगैरेवगैरे असे पुस्तकाचे वर्णन लिहिण्यापेक्षा आपण सर्वांनीच त्यांच्या भूमिकांबद्दल लिहिणे अधिक मजेदार ठरेल असे वाटले.
या लेखाच्या निमित्ताने आपल्याला आवडलेल्या त्यांच्या भूमिका आपण आठवूया....
चिमणराव,नातीगोती,हसवाफ़सवी,चौकटराजा,एक डाव भुताचा, कलम तीनशेदोन,वासूची सासू,एक झुंज वार्याशी ही त्यांची काही उल्लेखनीय कामे.
या सार्या भूमिका मला आवडतातच.त्यावर पुष्कळ जणांनी भरपूर लिहिले आहे, चर्चा केल्या आहेत
त्यामुळेच प्रभावळकरांच्या भूमिकांबद्दल लिहिताना त्यांच्या ( तुलनेने कमी माहिती असलेल्या आणि कमी चर्चिल्या गेलेल्या ) काही भूमिकांबद्दल आधी लिहावेसे वाटते...
मला मान्य आहे की ही त्यांची भूमिका ऑल टाईम ग्रेट नाही, पण ज्यावर अधिक चर्चा व्हायला हवी असे वाटते ,अशी निश्चित आहे..
आज मी लिहिणार आहे, ते १९९९ साली दाखवल्या गेलेल्या "गुब्बारें’ नावाच्या ( यात एक तासाच्या गोष्टी असायच्या) झी टीव्ही वरच्या "साथी एक सफ़र का" या कथेमधल्या प्रभावळकरांच्या टायगर देशपांडे या भूमिकेबद्दल. या कथेचे दिग्दर्शन केले होते मुकुल अभ्यंकर यांनी.हा एपिसोड १९९९ मध्ये बर्याच वेळा दाखवला गेला होता. त्यातल्या दोन वेळा मी पाहिला होता..पण आता अगदी सारे तपशील आठवत नाहीत.कष्टाने काही फोटोही मिळवले.
कथेची सुरुवात होते ती देशपांडे नावाच्या एका साध्यासुध्या सरळमार्गी क्लार्कला त्याचा बॉस एका बिझनेस ट्रिपसाठी रेल्वेने पाठवायचे ठरवतो... आणि या रंगेल बॉसने आधीच त्या रात्रीच्या प्रवासामध्ये देशपांडेसाठी एका एस्कॉर्ट सर्व्हिस गर्ल (निकी अनेजा)ची सोबत मुक्रर केली आहे.या गोष्टीची देशपांडेला कल्पना नाही.
तो त्या अलिशान फ़र्स्ट क्लास कंपार्टमेंटमध्ये सेटल होईपर्यंत ही आधुनिक पेहरावातली मुलगी तिथे येते...तिला हे नेहमीचंच, देशपांडे फ़र्स्ट क्लासची सवय नसल्याने थोडा गांगरलेला... टीसी येऊन तिकिटे चेक करून जातो, देशपांडेकडे 'मजाय बुवा तुमची” असे अर्थपूर्ण कटाक्ष टाकून जातो....तो गेल्यावर देशपांडेची झोपण्याची तयारी सुरू होते..पाण्याची बाटली, घड्याळ वगैरे..आणि त्याला कपडे बदलायचे आहेत, म्हणून तो तिला विनंती करतो की तुम्ही बाहेर जा...ती सहजपणे म्हणते की ’मी थांबते इथे” तरी देशपांडे तिला जाण्यास सांगतो...तिला हसू फ़ुटते,आणि ती बाहेर जाते...बाहेर तिला तिचा पूर्वीचा प्रवासातला साथीदार दिसतो.तो पुन्हा कधी भेटणार असं तिला विचारतो..ती आत आल्यावर देशपांडे बाहेर जातो, तिला कपडे बदलण्यासाठी... तिच्या लक्षात येते की हा माणूस नेहमीसारखा नाही.वेगळाच आहे....
त्यांच्या गप्पा सुरू होतात. देशपांडे त्याच्या मध्यमवर्गीय जगण्याच्या नेहमीच्या गोष्टी सांगतो....चाळ, नोकरी , लोकलचा प्रवास ...
...हळूहळू तिचा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलतोय, व्यावसायिक कृत्रिम सहजता आता गेली आहे आणि ती त्याच्यातल्या माणसामध्ये रस घेत त्याला बोलायला उद्युक्त करतेय, त्याच्या इच्छा आकांक्षा आवडी निवडी ऐकत आहे....
तोच देशपांडेचा चेहरा एकदम बदलतो, डोळे चमकायला लागतात, तिच्याकडे अर्थपूर्ण कटाक्ष टाकून तो म्हणतो की दिवा बंद करून माझ्या शेजारी येऊन बस, तुला एक गंमत दाखवायची आहे... तिचा चेहराच पडतो; हाही त्यातलाच निघाला या विचाराने ती क्षणभर दु:खी... पण ती त्याच्या शेजारी जाऊन बसल्यानंतर तो तिला अंधारात चमकणारे पोस्टाचे स्टँप दाखवतो....देशोदेशीची पोस्टाची तिकिटे जमवणे हा माझा छंद आहे म्हणतो...तिला हायसं वाटतंय हे तिच्या चेहर्यावर स्पष्ट दिसतं.... तीही त्याला स्वत:बद्दल थोडंसं सांगते...तो आपल्या पत्नीची नक्कल करून दाखवतो, सोसायटीच्या गणपती उत्सवाबद्दल सांगतो.मराठी गाणं म्हणतो..तीही पंजाबी टप्पा म्हणून दाखवते....तिला आता झोप यायला लागलीय... तो काहीतरी बडबडत असतानाच त्याच्या लक्षात येतं की ही त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपून गेलीय.
देशपांडेही ब्लॆंकेट घेऊन झोपून जातो....सकाळ होते.. रेल्वे स्टेशनवर या सरळमार्गी सहप्रवाशाचा निरोप घेताना तिचे डोळे भरून आलेले आहेत आणि त्याचा चेहरा मुलीला निरोप देणार्या बापासारखा का बरं दिसतोय?...

वाचने
25397
वाचनखूण
प्रतिक्रिया
44
सह्ही!!!
In reply to सह्ही!!! by बिपिन कार्यकर्ते
असेच म्हणतो
In reply to सह्ही!!! by बिपिन कार्यकर्ते
मास्तर "एक
सही
मास्तर..
In reply to मास्तर.. by नाटक्या
मी गूगलून
In reply to मी गूगलून by भडकमकर मास्तर
मास्तर नावाचे आहात तुम्ही
सही
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
In reply to सही by नंदन
असेच
गुब्बारें’
मास्तर,
रात्र आरंभ
ही कथा बघितल्याचे आठवत नाहीये!
अगदी असंच
In reply to अगदी असंच by मेघना भुस्कुटे
+१
छान लेख.
In reply to छान लेख. by क्रान्ति
साळसूद?
In reply to साळसूद? by मैत्र
सहमत..
In reply to साळसूद? by मैत्र
साळसूद
व्वा..
मास्तर हा
पोर्ट्रेट!
In reply to पोर्ट्रेट! by पिवळा डांबिस
प्रिन्स वाटुंग पिन पिन :)
मास्तर..
वा मास्तर,
साळसूद-बरोबर
मास्तर ..माफ करा..
मास्तर ..माफ करा..
दिलीप प्रभावळकर
शेवरी
दिप्ती-प्रभावळकर-पटेल-लुमुम्बा
लेख आवडला .
ही घ्या youtube लिंक
मास्तरांचा हा लेख वाचलाच
In reply to मास्तरांचा हा लेख वाचलाच by किसन शिंदे
मास्तरांचा हा लेख वाचलाच
In reply to मास्तरांचा हा लेख वाचलाच by दिव्यश्री
@मिसळीच्या तर्रीत >>> तर्री
सुरवातीपासून आजपर्यंत पुढच्या
रात्र आरंभ
... बस्स....रात्र आरंभ सर्वीत्तम .....
मध्यंतरी स्पीलबर्गच्या एका चित्रपटासाठी त्यांचा विचार
पुनप्पा आवडे आठ्वतोय का कुणाला
In reply to पुनप्पा आवडे आठ्वतोय का कुणाला by मीउमेश
एनकांऊंटर
दिलीप प्रभावळकर म्हणजे चौकट
साळसूद
दिलीप प्रभावळकर - आबा टिपरे