मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

हबीब तन्वीर

मुक्तसुनीत · · जनातलं, मनातलं
ख्यातनाम हिंदी नाटककार , दिग्दर्शक , आणि अभिनेते हबीब तन्वीर यांचे सोमवारी भोपाळ येथे निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. "आग्रा बझार", "चरणदास चोर" इत्यादि प्रसिद्ध हिंदी नाटके त्यांनी लिहिली आणि केली. स्वातंत्र्यपूर्व काळात मार्क्सिस्ट विचारांनी प्रभावित असलेल्या पीढीचे ते महत्त्वाचे साक्षीदार असे म्हणता येईल. त्यांनी "नाटक" हाच एक ध्यास घेतल्यासारखे संपूर्ण आयुष्य काढले. त्याना अनेक पुरस्कार मिळाले. - १९६९ सालचा "संगीत नाटक अकादेमी पुरस्कार" - १९८३ साली पद्मश्री - २००२ साली पद्मभूषण याशिवाय अन्य अनेक विदेशी पुरस्कारांनी त्यांचा सन्मान झाला होता. हिंदी रंगभूमीच्या या भीष्माचार्याला भावपूर्ण श्रद्धांजली.

वाचने 3533 वाचनखूण प्रतिक्रिया 14

अवलिया 08/06/2009 - 18:07
हिंदी रंगभूमीच्या या भीष्माचार्याला भावपूर्ण श्रद्धांजली. मुसुशेट, हबीब तन्वीरांच्या एखाद्या नाटकाचा परिचय या निमित्ताने आला तर ती समयोचित आदरांजली होईल असे वाटते. --अवलिया

In reply to by अवलिया

आनंदयात्री 08/06/2009 - 18:18
हेच म्हणतो .. येउद्या एखादा फर्मास लेख ओळखीचा. श्रद्धांजली.

In reply to by अवलिया

आनंदयात्री 08/06/2009 - 18:24
प्रकाटाआ.

मेघना भुस्कुटे 08/06/2009 - 18:38
हिंदी रंगभूमीच्या या भीष्माचार्याला माझीही भावपूर्ण श्रद्धांजली. आवर्जून ही माहिती दिल्याबद्दल आणि इतक्या महत्त्वाच्या गोष्टीची दखल मिपावर घेतल्याबद्दल मनापासून धन्यवाद. अवांतरः मी हबीब तन्वीर यांची नाटकं वाचलेली वा पाहिलेली नाहीत. ते नाट्यक्षेत्रातले अग्रणी आहेत, इतकं(च) माहीत होतं. नाना पाटेकरच्या 'प्रहार'मधे माधुरीच्या सासर्‍याचं काम केलेलं त्यांनी पाहिलं, तेव्हा एकदम 'ऐशप्पथ, ते हे होय?' असा धक्का बसलेला आठवतो.

नीधप 08/06/2009 - 19:54
त्यांची 'चरणदास चोर' आणि छत्तीसगढी फॉर्ममधील 'मुद्राराक्षस' ही दोन्ही नाटके मी पाह्यली होती. भारावून गेले होते. त्यांनी केलेले प्रयोग, त्यामागचा त्यांचा विचार सगळ्यातच प्रचंड शिकण्यासारखं होतं. त्यांना सादर प्रणाम! - नी http://saaneedhapa.googlepages.com/home

वाहीदा 09/06/2009 - 01:15
सर्वात आधी मुक्तसुनीत यांनी या बातमीची दखल घेतल्याबध्द्ल धन्यवाद !! १सप्टेंबर १९२३ ला रायपूर ला जन्मलेले हबीब अहेमद खान 'तनवीर' हे यांच्या नाटकात समाज व्यवस्थेविरोधातील विद्रोह दिसून येतो नागपूर हून BA ची डीग्री मिळविल्यानंतर तनवीर यांनी अलीगढ मुस्लीम युनीवरसीटीहून मास्टर डिग्री मिळविली . १९४५ ला तनवीर यांना AIR मध्ये प्रोडूसर ची नोकरी ही मिळाली पण फक्त हिंदी सिनेमांसाठी गाणी न लिहीता त्यानी त्यात अभीनय ही केला अन नाटके ही लिहली Progressive Writers' Association (PWA) join केले अन Indian People's Theatre Association (IPTA) या संस्थेचे मानाचे रंगदर्शी अभीनेता ही बनले नंतर जेव्हा ब्रिटीश रुल या व्यवस्थे विरुध्द बंड पुकारणार्याना या संस्थेच्या मान्यवरांना कारावास होऊ लागला त्या वेळी त्यांनी या संस्थेचा पदाधिकार सांभाळला १९५४ मध्ये जैदी याचे Hindustani Theatre जओइन् केले अन लहान मुलांसाठी असंख्य नाटके ही लिहीली अन त्यात कामही केले. त्याच काळात त्यांनी आगरा बाजार रंगमंचावर आणले . एक मंत्रमुग्ध करणारे नाटक आगरा बाजार ! ज्या वेळी आगरा हे शहर ईंग्रजांच्या ताब्यात गेले त्या वेळी अंग्रेजी हुकूमत च्या विरोधात असलेले शहर आगरा . तेथील समाज त्या समाजाची घुसमट विचार त्यांनी प्रभावी पणे मांड्ले. आगरा शहर ... उसका समाज उसकी सोच और उसका सलीका ... अतिशय संवेदनशील असणारे हबीब तनवीर यांच्या नाटकात प्रगतिशील लेखन तर पहायला मिळतेच पण प्रवाहा विरुध्द जाणारा विद्रोह ही जाणवतो नाजायज व्यवस्था के खिलाफ उठनेवाली आवाज म्हणजे हबीब तनवीर १९५५ साली तनवीर यांनी England ला Royal Academy of Dramatic Arts (RADA) चे ट्रेनींग घेतले अन दिग्दर्शनाचे ट्रेनींग त्यांनी Bristol Old Vic Theatre School मधून घेतले . तिथे ते भरपूर पैसे ही कमवू शकले असते he never surrendered himself to the world of financial glitterati. नवीन थीएटर भोपाल मध्ये उभे केले. ते परत आपल्या मातीत आले ...आपल्या मायभूमीत परतून त्यांनी दर्जेदार नाटके दिली अश्या प्रतिभावंत रंगकर्मीला सलाम ! HATTS OFF !! आमच्या सारख्यानी त्यांच्या बध्द्ल काही लिहणे म्हणजे आफताब (सुरज) के आगे दिया दिया जलाने वाली बात है फैज अहमद फैज हे कदाचीत त्यांच्या सारख्याच असंख्य विद्रोहा बदध्ल हे म्हणत असावेत मता-ए-लोहोकलम छिन गई तो क्या गम है , कि खुने दिल में डुबो ली है उंगलीयां मैने !! मता-ए-लोहोकलम - ईश्वराची पाटी अन लेखणी ~ वाहीदा कह रहा है दरीयां से समंदर का सुकुत (शांतता) जिसमें जितना दफ्त (गहराई) है उतना ही वो खामोश है !

In reply to by वाहीदा

प्रमोद देव 09/06/2009 - 18:38
वाहिदाच्या सविस्तर प्रतिसादामुळे बरीच माहिती कळली. शाबास वाहिदा! प्रामाणिकपणे सांगायचे तर हबीब तन्वीर हे नाव मी पहिल्यांदाच ऐकले. हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!

In reply to by वाहीदा

सहज 09/06/2009 - 18:45
वाहीदाजींचा प्रतिसाद आवडला. कित्येक दशकांपासुन हबीब तन्वीर यांचे नाव होते. १९८५-९० या काळात दुरदर्शनवर विविध कार्यक्रमातुन त्यांच्या समर्थ अभिनयाची झलक बघायला मिळाली होती. भावपूर्ण श्रद्धांजली.

In reply to by वाहीदा

नीधप 09/06/2009 - 22:23
आभार वाहीदा! पुण्यात एका फेस्टिव्हल मधे त्यांच्या मुद्राराक्षस नंतरच्या चर्चेत त्यांना बोलताना ऐकलं होतं. तेव्हाच भारावल्यासारखं झालं होतं. - नी http://saaneedhapa.googlepages.com/home

धनंजय 09/06/2009 - 01:36
या रंगकर्मीबद्दल काहीच माहीत नव्हते. यूट्यूबवरती ही एक छोटीशी माहितीफीत सापडली : आणखी काही माहिती, चित्रफिती बघायल्या मिळाल्या तर आवडतील.

संदीप चित्रे 09/06/2009 - 02:40
>> हिंदी रंगभूमीच्या या भीष्माचार्याला भावपूर्ण श्रद्धांजली. माझीही श्रद्धांजली. हबीब तन्वीर यांचं नाव नाट्यक्षेत्रात खूप आदरानं घेतलं जायचं हे ऐकून होतो. इथे काही चांगली माहिती मिळाली.

विसोबा खेचर 09/06/2009 - 09:06
हिंदी रंगभूमीच्या या भीष्माचार्याला भावपूर्ण श्रद्धांजली. आमचीही श्रद्धांजली.. तात्या.

बिपिन कार्यकर्ते 10/06/2009 - 01:14
अजून एक मोठा माणूस गेला... वाईट झालं. त्यांच्या काही काही भूमिका बघितल्या होत्या. पण खूप नवीन माहिती कळली. बिपिन कार्यकर्ते